एचपीने कंटेट क्रिएशनसाठी लॉन्च केले ओम्नीबूक अल्ट्राफ्लिप एआय पीसीएचपी ओम्नीबूक अल्ट्रा एआय पीसीत असलेल्या इन्टेल ल्युनार लेक प्रोसेसर्स उत्पादकता वाढणार आणि भागीदारी आणखी सुरळीत होणार

News Service
  • एचपीच्या या पहिल्या २ इन १ नेक्स्ट जनरेशन एआय पीसी मध्ये एनपीयूमुळे एका सेकंदाला होणार प्रति सेकंद ४८ ट्रिलियन ऑपरेशन्स
  • तब्बल २१ तासाचं बॅटरी लाइफ
  • एआय मुळे होणारे धोके टाळण्यासाठी एचपी वुल्फ सिक्युरिटीचा समावेश असलेला एचपीचा पहिलाच कन्झ्युमर एआय पीसी.

नवी दिल्ली ऑक्टोबर 23, २०२४- एचपीने आज ओम्नीबूक अल्ट्राफ्लिप हा २ इन १ नेक्स्ट जेन एआय पीसी भारतात लॉन्च केला आहे. हा पीसी तरुण फ्रीलान्सर्स आणि क्रिएटर्ससाठी तयार करण्यात आला आहे. उत्तम स्टाइल, उत्कृष्ट परफॉर्मन्स आणि वैविध्यता असलेला हा पीसी आहे. एआयच्या मदतीने क्रिएटिव्ह अनुभव घेण्याची मनीषा बाळगून असलेल्या लोकांसाठी हा पीसी तयार करण्यात आला आहे. एचपी ओम्नीबूक अल्ट्रा फ्लिपमध्ये इंटेलचे लुनार लेक प्रोसेसर्स आहेत. त्यात असलेल्या डेडिकेटेड न्युरल प्रोसेसिंग युनिट (NPU) मध्ये प्रति सेकंद ४८ ट्रिलियन ऑपरेशन्स करण्याची क्षमता आहे. त्यामुळे जनरेटिव्ह एआयच्या मदतीने उत्तम कंटेट तयार करण्यासाठी आणि उत्पादकता वाढेल.

सध्याच्या काळात कामाच्या ठिकाणी उच्च परफॉर्मन्स असलेल्या एआय पीसीची गरज असते. एचपी ओम्नीबूक अल्ट्रा फ्लिप अतिशय नावीन्यपूर्ण असून युजर्सला त्यांना जे हवंय त्याकडे लक्ष केंद्रित करण्यास मदत करतो. हा पीसी क्रिएटर्स आणि फ्रीलान्सर्स लोकांसाठी तयार करण्यात आला आहे. व्हीडीओ एडिटिंग, ग्राफिक डिझाइन, आणि व्हर्च्युल कोलॅबरेशनसाठी या डिव्हाइसचा परफॉर्मन्स  अतिशय उत्तम आहे एआय आधारित वैशिष्ट्ये असल्यामुळे व्हीडिओचा दर्जा, बॅटरी लाइफ, कोलॅबरेशन टूल्सचा दर्जा उंचावतो. त्यामुळे क्रिएटर्स लोकांसाठी हा अतिशय उत्तम पर्याय आहे. त्याचप्रमाणे एचपी ओम्नीबूक अल्ट्रा फ्लिप मध्ये एचपी वुल्फ सिक्युरिटीचा समावेश आहे. त्यामुळे सायबर धोके टाळण्यासाठी आणि डेटा सुरक्षेसाठी अत्याधुनिक सिक्युरिटी फीचर्स मिळतात, या वैशिष्ट्यांमुळे क्रिएटर्स त्यांच्या कामावर लक्ष केंद्रित करू शकतात. 

“एचपीमध्ये आम्ही प्रगतीत वाढ, सर्जनशीलता आणि अमर्याद नावीन्यपूर्णता याबद्दल वचनबद्ध आहोत. आताच्या काळातले फ्रीलान्सर्स आणि क्रिएटर्सच्या गरजा आम्ही ओळखतो, त्यांना त्यांच्या जीवनशैलीनुसार डिव्हाइसमध्ये पॉवर, फ्लेक्सिब्लिटी आणि सिक्युरिटी यांची नितांत गरज असते. एचपी ओम्नीबूक अल्ट्रा फ्लिप हे या सर्व गरजा पूर्ण करतं. यात उत्तम परफॉर्मन्स, एआयची अत्याधुनिक वैशिष्ट्ये, आणि सिक्युरिटी यांचा समावेश आहे. हे फक्त डिव्हाइस नसून एक उत्तम टूल आहे. त्यामुळे युजर्सना आपल्या कामावर उत्तम पद्धतीने लक्ष केंद्रित करण्यास मदत मिळते.” असं एचपी इंडियाचे वरिष्ठ संचालक (पर्सनल सिस्टिम्स), विनीत गेहानी म्हणाले.

  एचपी ओम्नीबूक अल्ट्रा फ्लिप – फ्लेक्झिबल स्टाइल आणि उत्तम परफॉर्मन्स-

•             प्रेरक रचना- या डिव्हाइसमध्ये असलेल्या अल्ट्रा थिन फॉर्म फॅक्टरमुळे तो लॅपटॉप, टॅबलेट किंवा टेन्ट मोड मध्ये हवा तसा वापरून स्केचिंग, एडिटिंग किंवा क्रिएट करू शकतो. या पीसीला २.८के ओलइडी डिस्प्ले असल्यामुळे विविध रचनांचे अवलोकन करण्यासाठी किंवा तयार करण्यासाठी उत्तम व्हिज्युअल अनुभव मिळतो.  हा जगातील पहिला २-इन-१ नेक्स्ट जेन एआय पीसी असून त्यात असलेल्या हॅप्टिक टचपॅड आणि इन्किंगमुळे हवं तसं कंटेट तयार करता येईल. ९ मेगापिक्सल एआय कॅमेरा आणि पॉली ऑडिओमुळे इतरांशी संवाद साधणं सोपं आणि सुलभ होईल.

•             संतुलित पॉवर आणि परफॉर्मन्स- हे डिव्हाइस शांततेचा अनुभव देण्यासाठी तरी उत्तम परफॉर्म करणारे असल्यामुळे  फिरतीवर असणारे क्रिएटर्स आरामात कंटेट तयार करू शकतात. ओम्नीबूक अल्ट्रा फ्लिप मध्ये  Intel®️ Core™️ Ultra Processor (Series 2) असून त्यात डेडिकेटेड एआय इंजिन आहे. त्यामुळे  बॅटरी २१ तास टिकते. यामुळे अखंड क्रिएशनचा अनुभव मिळेल. 

•             एआय सह विश्वासार्ह सुरक्षा- एचपी वुल्फ सिक्युरिटीमध्ये युनिक सिक्युरिटी चीप आणि सेल्फ हिलिंग पीसी कोअर असल्यामुळे व्यावसायिक दर्जाची सुरक्षा मिळते. डेटा सुरक्षित राहतो आणि सायबर धोक्यापासून संरक्षण मिळते. McAfee Smart AI™️  डीपफेक डिटेक्टर एआय जनरेटेड ऑडिओ डिटेक्ट करून धोक्याची सूचना देतो.

•             कोपायलट+: कोपायलट+ पीसी या वैशिष्ट्यामुळे या पीसींमध्ये क्रिएटिव्हिटीला आणि उत्पादकतेला वाव आहे. तसंच यामुळे  पर्सनलाइज्ड आणि शक्तिशाली कॉम्प्युटिंग अनुभव मिळतो. कोपायलट+ मुळे क्रिएटर लोकांचा प्रत्येक टप्प्यावर प्रगतीला वाव मिळतो.

•             संवाद साधण्याचे उत्तम मार्ग- एचपी ओम्नीबूक अल्ट्रा फ्लिप पीसी मुळे युजर्सना कंटेटबरोबर एकरूप होण्याचे विविध मार्ग उपलब्ध होतात. आवाज कमी करणं आणि वाढवणं तसंच नवीन जेस्चर कंट्रोलमुळे अखंड स्क्रोल अप किंवा डाऊन करणं शक्य होईल.

आज आणि उद्यासाठी शाश्वत- पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी ऊर्जा कार्यक्षम अनुकूल होण्यासाठी एचपी कायमच वचनबद्ध आहे. ओम्नीबूक अल्ट्राफ्लिप ९०% रिसायकल केलेल्या धातूने आणि ५०% ग्राहकांनी वापर केलेल्या प्लास्टिकचा पुर्नवापर करून तयार करण्यात आला आहे तसंच EPEAT®️ गोल्ड सह क्लायमेट+ आणि  ENERGY STAR®️ ने सर्टिफाय केलेल्या रचनेननुसार तयार करण्यात आले आहे.

पर्सनलायजेशन -एचपी एआय कंपॅनियन आणि पॉलि कॅमेरा प्रो.

एचपीच्या २ इन १ नेक्स्ट जेन ओम्नीबूक अल्ट्रा फ्लिप एआय पीसीमध्ये  एआय कम्पॅनियन आणि पॉली कॅमेरा प्रोचा समावेश आहे. त्यामुळे युजर्सचा अनुभव पर्सनलाइज्ड होण्यासाठी, उत्पादकतेसाठी आणि कोलॅबरेशनसाठी फायदेशीर ठरते.

सहज संवाद साधा: एआय कम्पनॅनियन जनरेटिव्ह एआयचा वापर करून लोकांना खासगी फाइल्सचे विश्लेषण करण्यात, माहिती शोधण्यात, कंटेट तयार करण्यात, त्याला अंतिम रूप देण्यात महत्त्वाच्या कामांना जलद व अचूक प्रतिसाद देण्यात मदत करते. परफॉर्म असिस्टंट युजर्सना पीसीची कार्यक्षमता सुधारण्यासाठी, सेटिंग्ज कस्टमाइज करण्यासाठी आणि एचपी उत्पादने दुरुस्त करण्यासाठी साहाय्यभूत ठरते.

•             उत्तम कोलॅबरेशनची संधी- पॉली कॅमेरा प्रो एनपीयूचा वापर करून स्पॉटलाइट आणि बॅकग्राऊंड ब्लर अँड रिप्लेस या फीचर्सचा वापर करून सीपीयूला अधिक चांगल्या पद्धतीने परफॉर्म करण्यास मदत करतं. हे करताना बॅटरीचीही बचत होते.

किंमत आणि उपलब्धता

एचपी ओम्नीबूक फ्लिप १४ नेक्स्ट जेन एआय पीसी अल्ट्रा ७ एचपी ऑनलाइन स्टोअर मध्ये उपलब्ध आहे तसंच त्याचबरोबर अमेझॉन. फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे. ऑफलाइन स्टोअर मध्ये त्याची किंमत १,८१,९९९ पासून सुरू होत असून तो एक्लिप्स ग्रे आणि अटमॉस्फेरिक ब्लू या रंगात उपलब्ध आहे.

•             एचपी ओम्नीबूक फ्लिप १४ नेक्स्ट जेन एआय पीसी अल्ट्रा  एचपी ऑनलाइन स्टोअर मध्ये उपलब्ध आहे तसंच त्याचबरोबर ॲमेझॉन. फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे. ऑफलाइन स्टोअर मध्ये त्याची किंमत १,९१,९९९ पासून सुरू होत असून तो ॲटमॉस्फेरिक ब्लू या रंगात उपलब्ध आहे.

•             एचपी ओम्नीबूक अल्ट्रा ३१ ऑक्टोबर २०२४ पर्यंत विकत घेतल्यास ग्राहकांना ९९९९ रुपयाचे ॲडोब फोटोशॉप एलिमेंट्स आणि प्रीमिअर एलिमेंट्स (PEPE) मोफत मिळतील. 

•             ग्राहक बजाज फायनान्सच्या मदतीने नो कॉस्ट इएमआय १८/० या योजनेचा लाभही घेऊ शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button