अतिरिक्त फायद्यांमध्ये ८०,००० हून अधिक मालमत्तांच्या हॉटेल पोर्टफोलिओची उपलब्धता, फ्लाइट्ससाठी फ्लॅश सेल्स आणि ‘चाइल्ड फ्लाइज फ्री’…
Category: Marathi
टाटा मोटर्सकडून स्मॉल कमर्शियल वेईकल्स आणि पिकअप्सवर सर्वात मोठ्या बोनान्झाची घोषणा
जीएसटी कपातीसोबत ब्लॉकबस्टर मोहिम ‘इस त्योहार पे उपहार’ लाँचएस प्रोची किंमत आता फक्त Rs. 3.67 लाख…
खलासीला मिळालेल्या अद्भुत यशानंतर आदित्य गढवी यंदा सणासुदीच्या काळात कोक स्टुडिओ भारतमध्ये घेऊन येत आहे ‘मीठा खारा’
‘मीठा खारा’ गुजरातमधील आगरिया समुदायाला संगीतमय मानवंदना आहे राष्ट्रीय, सप्टेंबर 2025: कोक स्टुडिओ भारत या भारताच्या…
भारतातील महिलांच्या हृदयाचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी अँजाइनाबाबत जाणून घ्या
कोरोनरी आर्टरी डिसीज (सीएडी) हा आजार बहुतेकदा पुरुषांना प्रामुख्याने प्रभावित करणारा आजार मानला जातो. प्रत्यक्षात, महिलांना…
यामाहा ग्राहकांना दुचाकी श्रेणीवर संपूर्ण जीएसटी दर कपातीचे फायदे देणार
चेन्नई, 10 सप्टेंबर 2025: इंडिया यामाहा मोटर (आयवायएम) प्रा. लि.ने आज घोषणा केली की, कंपनी ग्राहकांसाठी…
सॅमसंगकडून रिडिझाइन केलेला एस पेन आणि गॅलेक्सी टॅब एस११ सिरीज लॉंच
गुरूग्राम, भारत – सप्टेंबर ८, २०२५: सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँडने आज गॅलेक्सी…
कोटक कन्या शिष्यवृत्तीसह सामील व्हा ब्रेन लीग मध्ये – जिथे NIRF च्या उत्कृष्ट विद्वानांना मिळतात असीम शक्यता
9 सप्टेंबर 2025: कोटक एज्युकेशन फाउंडेशन (KEF), जो कोटक महिंद्रा ग्रुपचा सीएसआर अंमलबजावणी करणारा विभाग आहे,…
नोकरी घोटाळ्यांमध्ये वाढ रोखण्यासाठी लिंक्डइनने नवीन पडताळणी वैशिष्ट्ये सादर केली
भारत, सप्टेंबर ८, २०२५: भारतातील रोजगार बाजारपेठ जगातील सर्वात झपाट्याने विकसित होणारी आणि सर्वात डिजिटल आहे.…
अॅजिलेंट टेक्नॉलॉजीज आणि आयसीएआर-नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स यांनी भारतातील अन्न सुरक्षा परिसंस्था मजबूत करण्यासाठी धोरणात्मक सहयोग
पुणे, भारत – सप्टेंबर ८, २०२५ – अॅजिलेंट टेक्नॉलॉजीज इंडिया आणि आयसीएआर-नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स (एनआरसीजी), पुणे यांनी त्यांच्या सहयोगाच्या पुढील टप्प्याची घोषणा केली आहे, ज्याचा प्रगत विश्लेषणात्मक विज्ञान आणि नियामक सहभागाच्या माध्यमातून भारतताील अन्न सुरक्षा पायाभूत सुविधा मजबूत करण्याचा मनसुबा आहे. या उपक्रमामुळे द्राक्षांचा विश्वासार्ह जागतिक निर्यातदार म्हणून भारताचे स्थान अधिक दृढ होईल आणि गुणवत्ता हमीमध्ये पारदर्शकता व विश्वास वाढवून नवीन बाजारपेठेत संधी निर्माण होतील, अशी अपेक्षा आहे. भारतातून कृषी निर्यात वाढत असताना विश्वासार्ह, विकासात्मक आणि नियमन पालन करणाऱ्या अन्न चाचणी उपायांची मागणी वाढली आहे. अॅजिलेंट व एनआरसीजी सहयोगाने कीटकनाशकांचे अवशेष आणि धुराच्या विश्लेषणासाठी लक्ष्यित कार्यप्रवाह विकसित करून प्रतिसाद देत आहेत, ज्यामध्ये शाश्वतता, अचूकता आणि जागतिक नियामक संरेखन यावर लक्ष केंद्रित केले आहे. प्रयोगशाळा व भागधारकांना विकसित होत असलेल्या सुरक्षा मानकांची पूर्तता करण्यास आणि भारतातील अन्न पुरवठा साखळीमध्ये आत्मविश्वास वाढवण्यास पाठिंबा देण्यासाठी हे प्रयत्न करण्यात आले आहेत. हा सहयोग वैज्ञानिक आणि नियामक समुदायासोबत दृढ संबंध निर्माण करण्यासाठी व्यासपीठ म्हणून देखील काम करेल. संयुक्त कार्यशाळा, वेबिनार व तांत्रिक प्रकाशनांच्या माध्यमातून अॅजिलेंट आणि एनआरसीजी यांचा माहितीची देवाणघेवाण वाढवण्याचा, तसेच विश्लेषणात्मक चाचणीमध्ये सर्वोत्तम पद्धतींना चालना देण्याचा मनसुबा आहे. या उपक्रमांमुळे अन्न सुरक्षा व्यावसायिकांमध्ये क्षमता निर्माण होण्यास मदत होईल आणि सरकारी व व्यावसायिक प्रयोगशाळांमध्ये प्रमाणित पद्धतींचा अवलंब करण्यास प्रेरणा मिळेल. भारतातील कंट्री जनरल मॅनेजर, अॅजिलेंट टेक्नॉलॉजीज नंदकुमार कलाथिल म्हणाले, “आम्हाला एनआरसीजीसोबत आमचा सहयोग वाढवण्याचा आणि स्थिर, भविष्यासाठी सुसज्ज अन्न सुरक्षा यंत्रणांच्या विकासाप्रती योगदान देण्याचा अभिमान वाटतो. हा सहयोग फक्त तंत्रज्ञानासाठी नाही तर विश्वास निर्माण करण्यासाठी आहे, ज्यामुळे परिवर्तनाला गती मिळेल आणि सुरक्षित अन्न उत्पादनामध्ये जागतिक प्रमुख म्हणून भारताच्या भूमिकेला पाठिंबा मिळेल.” आयसीएआर-एनआरसीजीचे संचालक डॉ. कौशिक बॅनर्जी म्हणाले, “या सहयोगामधून भारतात अन्न सुरक्षा मानक वाढवण्याप्रती आमचा समान दृष्टिकोन दिसून येतो. अॅजिलेंटच्या तंत्रज्ञान क्षमता आणि एनआरसीजीच्या संशोधन नेतृत्वाला एकत्र करत आम्ही आराखडा तयार करत आहोत, जो नाविन्यता, नियामक अनुपालन आणि भागधारक सक्षमीकरणाला पाठिंबा देतो.” पूर्वी मिळालेल्या यशाच्या आधारावर हा नवीन सहयोग करण्यात आला आहे आणि अन्न चाचणीमध्ये मोठ्या प्रभावाला चालना देण्याप्रती समान कटिबद्धता अधिक दृढ करतो. धोरणावरून अंमलबजावणीकडे वाटचाल करत अॅजिलेंट आणि एनआरसीजी यांनी निष्पत्ती वितरित करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे, ज्यामधून खाद्य उद्योग, नियामक व ग्राहकांना फायदा होईल. वैज्ञानिक दृढता व व्यावहारिक अंमलबजबावणीला एकत्र करत या सहयोगाचा भारतातील अन्न सुरक्षेच्या भविष्याला आकार देण्याचा मनसुबा आहे.
टाटा मोटर्स कमर्शियल व्हेइकलच्या ग्राहकांना संपूर्ण जीएसटी कमी केल्याचा लाभ मिळणार
मुंबई, ७ सप्टेंबर २०२५: भारतातील सर्वात मोठी वाणिज्यिक (कमर्शियल) वाहन उत्पादक कंपनी असलेल्या टाटा मोटर्सने आज आपल्या संपूर्ण वाणिज्यिक वाहन श्रेणीवरील अलीकडील जीएसटी कपातीचा संपूर्ण फायदा ग्राहकांना देणार असल्याची घोषणा केली. येत्या २२ सप्टेंबर २०२५ पासून सुधारित जीएसटी दर आणि हा लाभ लागू होईल. टाटा मोटर्सचे कार्यकारी संचालक श्री. गिरीश वाघ म्हणाले की, “वाणिज्यिक वाहनांवरील जीएसटी १८% पर्यंत कमी करणे हे भारताच्या वाहतूक आणि लॉजिस्टिक्सला पुनरुज्जीवित करण्याच्या दिशेने टाकलेले एक धाडसी आणि महत्त्वाचे पाऊल आहे. माननीय पंतप्रधानांच्या स्वप्नातून आणि माननीय अर्थमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली जीएसटी कौन्सिलने जाहीर केलेल्या प्रगतीशील सुधारणांनी प्रेरित होऊन टाटा मोटर्सला आमच्या सर्व व्यावसायिक वाहनांवरील जीएसटी कपातीचा संपूर्ण फायदा देशभरातील ग्राहकांना देताना अभिमान वाटतो. विश्वासाचा समृद्ध वारसा व भविष्यासाठी तयार वाहने आणि वेगवान उपाययोजनांच्या व्यापक पोर्टफोलिओसह आम्ही भारताची प्रगती करणाऱ्यांसाठी एक उत्तम भागीदार आहोत. आम्ही व्यवसाय, गतिशीलता सक्षम करून वाढीला चालना देतो.” वाणिज्यिक वाहने ही भारताच्या आर्थिक इंजिनाच्या पाठीचा कणा आहेत – लॉजिस्टिक्सला चालना देणे, व्यापार सक्षम करणे आणि देशाच्या कानाकोपऱ्यातील समाजाला जोडणे या गोष्टी ती करतात. टाटा मोटर्सचे उद्दिष्ट आमच्या वाणिज्यिक वाहन श्रेणीतील किमती कमी करून वाहतूकदार, फ्लीट ऑपरेटर आणि लहान व्यवसायांसाठी मालकीचा एकूण खर्च आणखी कमी करणे हे आहे. यामुळे प्रगत आणि स्वच्छ गतिशीलता उपायांपर्यंत अधिक प्रवेशासह जलद फ्लीट आधुनिकीकरणाला प्रोत्साहन मिळेल. त्यामुळे वाहतूकदार खर्च कमी करू शकतील, ऑपरेशनल कार्यक्षमता सुधारू शकतील आणि नफा वाढू शकेल. २२ सप्टेंबर २०२५ पासून लागू होणाऱ्या टाटा मोटर्स कमर्शियल वाहनांवरील संभाव्य किमती किती प्रमाणात कमी होतील, त्याची माहिती खालीलप्रमाणे आहे. ग्राहकांना आगामी सणासुदीच्या काळात डिलिव्हरीसाठी त्यांचे पसंतीचे वाहन लवकर बुक करण्यास आम्ही प्रोत्साहित करत आहोत. Product Reduction in price range (Rs) HCV from 2,80,000 to 4,65,000…