गॅलॅक्‍सी ए१६ ५जी १८९९९ रूपयांमध्‍ये लाँच

News Service

ट्रिपल कॅमेरासह अल्‍ट्रा-वाइड, ६ वर्षांचे ओएस अपग्रेड्स असलेल्‍या स्‍मार्टफोनसह तुमच्‍या सर्जनशीलतेला अधिक निपुण करा

गुरूग्राम, भारत – ऑक्‍टोबर२०२४: सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रँडने आज भारतात गॅलॅक्‍सी ए१६ ५जी च्‍या लाँचची घोषणा केली. या स्‍मार्टफोनची किंमत १८९९९ रूपयांपासून सुरू होते.

वापरकर्त्‍यांसाठी किफायतशीर दरामध्‍ये सर्वोत्तम नाविन्‍यता देत गॅलॅक्‍सी ए१६ ५जी ने भारतातील मिड-रेंज स्‍मार्टफोन्‍ससाठी नवीन मानक स्‍थापित केले आहे, जेथे या स्‍मार्टफोन ओएस अपग्रेड्सच्‍या ६ जनरेशन्‍स आणि ६ वर्ष सिक्‍युरिटी अपडेट्स आहेत.

सॅमसंग गॅलॅक्‍सी ए१६ ५जी ८ जीबी/१२८ जीबी व ८ जीबी/२५६ जीबी या दोन व्‍हेरिएण्‍ट्ससह गोल्‍ड, लाइट ग्रीन आणि ब्‍ल्‍यू ब्‍लॅक या आकर्षक रंगांमध्‍ये उपलब्‍ध असेल. हा स्‍मार्टफोन आजपासून रिटेल स्‍टोअर्स, Samsung.com आणि ऑनलाइन प्‍लॅटफॉर्म्‍ससह Amazon.in व Flipkart.com वर उपलब्‍ध असेल.

आकर्षक डिझाइन व सर्वोत्तम कार्यक्षमता

सॅमसंग गॅलॅक्‍सी ए१६ ५जी स्लीक व व्‍यावहारिक असण्यासाठी डिझाइन करण्‍यात आला आहे. या डिवाईसची जाडी फक्‍त ७.९ मिमी आहे, ज्‍यामुळे आतापर्यंतचा सर्वात सडपातळ मिड-रेंज गॅलॅक्‍सी ए सिरीज स्‍मार्टफोन आहे. आयकॉनिक ‘की आयलँड’ आकर्षकता, तसेच सुधारित ग्‍लास्टिक बॅक व सडपातळ बेझल्‍ससह हा स्‍मार्टफोन व्हिज्‍युअली आकर्षक दिसतो. आकर्षक डिझाइनव्‍यतिरिक्‍त गॅलॅक्‍सी ए१६ ५जी मध्‍ये शक्तिशाली ५००० एमएएच क्षमतेची बॅटरी आहे, जी दीर्घकाळापर्यंत टिकते आणि वापरकर्ते चालता-फिरता मनोरंजनाचा आनंद घेऊ शकतात. अपग्रेडेड मीडियाटेक डायमेन्सिटी ६३०० प्रोसेसरची शक्‍ती असलेला हा स्‍मार्टफोन हायपर-फास्‍ट कनेक्‍टीव्‍हीटी आणि विनासायास मल्‍टीटास्किंग देतो, तसेच गेमिंग, स्ट्रिमिंग असो किंवा अॅप्‍लीकेशन्‍सदरम्‍यान स्विच करायचे असो सुलभ व विनाव्‍यत्‍यय अनुभव देतो.  

ऑसम कॅमेरा आणि डिस्‍प्‍ले

या डिवाईसमध्‍ये शक्तिशाली व वैविध्‍यपूर्ण ट्रिपल कॅमेरा सिस्‍टम आहे, ज्‍यामध्‍ये ५० मेगापिक्‍सल वाइड, ५ मेगापिक्‍सल अल्‍ट्रा-वाइड आणि २ मेगापिक्‍सल मॅक्रो लेन्‍स आहे. अल्‍ट्रा-वाइड लेन्‍स विशेषत: नयनरम्‍य लँडस्‍केपेस् आणि व्‍यापक शॉट्स कॅप्‍चर करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आली आहे, ज्‍यामुळे वापरकर्त्‍यांना प्रत्‍येक फ्रेममध्‍ये आकर्षक फोटो कॅप्‍चर करत त्‍यांची सर्जनशीलता दाखवता येते. याला पूरक अशा वैविध्‍यपूर्ण सुपर एएमओएलईडी डिस्‍प्‍लेसह मोठी ६.७ इंच फुल एचडी+ स्क्रिन आहे, जी वास्‍तविक रंगसंगती देते, जलद प्रतिसाद देते आणि कॉन्‍ट्रास्‍ट रेशिओ १ दशलक्ष:१ आहे, ज्‍यामुळे कन्‍टेन्‍ट पाहण्‍यासोबत स्ट्रिमिंगचा आनंद घेण्‍यासाठी हा डिवाईस परिपूर्ण आहे.

विश्‍वासार्हता आणि विश्‍वसनीयता

सॅमसंग गॅलॅक्‍सी ए१६ ५जी सह विश्‍वसनीयतेला नव्‍या उंचीवर घेऊन जात आहे. या स्‍मार्टफोनमध्‍ये ओएस अपग्रेड्सच्‍या ६ जनरेशन्‍स आणि ६ वर्ष सिक्‍युरिटी अपडेट्स आहे. या कटिबद्धतेने मिड-रेंज बाजारपेठेत धुमाकूळ निर्माण केला आहे आणि त्‍यामधून प्रमुख वैशिष्‍ट्यांचे लोकशाहीकरण दिसून येते. हे उद्योग-अग्रणी अपग्रेड्स व अपडेट्स डिवाईसला अद्ययावत ठेवतात आणि दीर्घकाळापर्यंत सुलभ वापराची खात्री देतात. टिकाऊपणाला सादर करत या डिवाईसमध्‍ये जलरोधक व धूळरोधक आयपी५४ रेटिंग आहे, ज्‍यामुळे प्रत्‍येक आव्‍हानामध्‍ये डिवाईस कार्यरत राहण्‍याची खात्री मिळते. या टिकाऊपणाला पूरक सॅमसंगची नॉक्‍स वॉल्‍ट चिपसेट आहे, जी पिन, पासवर्डस् व पॅटर्न्‍स अशा संवदेनशील डेटाचे संरक्षण करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आली आहे, जी सॉफ्टवेअर व हार्डवेअर धोक्‍यांपासून संरक्षणासाठी स्‍वतंत्र टेम्‍पर-रेसिस्‍टण्‍ट स्‍टोरेजसह येते, ज्‍यामुळे ग्राहकांना समाधान मिळते. गॅलॅक्‍सी ए१६ ५जी मध्‍ये प्रबळ सुरक्षितता व दीर्घकालीन सपोर्टचे उत्तम संयोजन आहे, ज्‍याने स्‍मार्टफोन्‍समधील विश्‍वसनीयतेसाठी नवीन मानक स्‍थापित केले आहे. 

ऑसम गॅलॅक्‍सी अनुभव

गॅलॅक्‍सी ए१६ ५जी मध्‍ये सॅमसंग वॉलेट आहे, ज्‍यामध्‍ये एनएफसी (नीअर फिल्‍ड कम्‍युनिकेशन) द्वारे संचालित विशिष्‍ट ‘टॅप अँड पे’ क्षमता आहे, जी या किमतीच्‍या विभागामधील इतर डिवाईसेसच्‍या तुलनेत या डिवाईसला वरचढ ठरवते. ही कार्यक्षमता पेमेंट सोयीसुविधा देते, ज्‍यामुळे वापरकर्ते विनासायास व कार्यक्षमपणे व्‍यवहार करू शकतात. तसेच, या डिवाईसमध्‍ये भारतीय वापरकर्त्‍यांना लक्षात घेऊन विकसित करण्‍यात आलेले वैशिष्‍ट्य वॉईस फोकस आहे, ज्‍यामधून गोंधळयुक्‍त वातावरणामध्‍ये देखील सुस्‍पष्‍ट संवादाची खात्री मिळते. या विचारशील नाविन्‍यतांच्‍या माध्‍यमातून सॅमसंग प्रगत तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण करत आहे, तसेच किफायतशीर दरामध्‍ये दैनंदिन वापरासाठी तंत्रज्ञानाचा सुलभ व व्‍यावहारिक करत आहे.

उत्तम सुरक्षितता व गोपनीयता

गॅलॅक्‍सी ए१६ ५जी प्रगत नॉक्‍स सिक्‍युरिटी प्‍लॅटफॉर्मच्‍या माध्‍यमातून सुरक्षितता व गोपनीयतेला प्राधान्‍य देतो, ज्‍यामध्‍ये सुरक्षित पासवर्ड व्‍यवस्‍थापनासाठी सॅमसंग पास, वैयक्तिक अॅप्‍स लॉक करण्‍यासाठी पिनअॅप, संवेदनशील फाइल्‍स स्‍टोअर करण्‍यासाठी सिक्‍युअर फोल्‍डर आणि फाइल शेअरिंगवर नियंत्रण ठेवण्‍यासाठी प्रायव्‍हेट शेअर अशी वैशिष्‍ट्ये आहेत. टूल्‍सची ही सर्वसमावेशक श्रेणी वापरकर्त्‍यांना त्‍यांच्‍या डेटाचे सुरक्षितपणे व्‍यवस्‍थापन करण्‍यास सक्षम करते, एकूण अनुभव अधिक उत्‍साहवर्धक करते.

किंमत आणि लाँच ऑफर्स

गॅलॅक्‍सी ए१६ ५जी लाँच ऑफरचा भाग म्‍हणून सॅमसंग इंडिया टॅप अँड पे वैशिष्‍ट्यासाठी स्‍पेशल प्रमोशन देत आहे. सॅमसंग वॉलेटच्‍या माध्‍यमातून पाच टॅप अँड पे व्‍यवहार पूर्ण करणाऱ्या ग्राहकांना ५०० रूपयांचे वाऊचर मिळेल. ही लिमिटेड-टाइम ऑफर ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत वैध आहे. 

  गॅलॅक्‍सी ए१६ ५जीरंगव्‍हेरिएण्‍टमूळ किंमत (रूपयांमध्‍ये)ऑफर्सनिव्‍वळ प्रभावी किंमत (रूपयांमध्‍ये)
ब्‍ल्‍यू ब्‍लॅक, गोल्‍ड आणि लाइट ग्रीन८ जीबी + २५६ जीबी8GB+256GB२१,९९९अॅक्सिस व एसबीआय क्रेडिट कार्ड्सवर जवळपास १,००० रूपयांची बँक कॅशबॅक२०,९९९
८ जीबी + १२८ जीबी१८,९९९१७,९९९

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button