झूम फोन आता भारतातही उपलब्ध

News Service

– बहुराष्ट्रीय संस्था आणि उद्योगांना आता भारतीय दूरसंचार विभागाकडून (डीओटा) परवाना मिळालेल्या झूम इंडियाच्या पहिल्या क्लाउड फोन मिळणे शक्य

मुंबई: ‘झूम व्हिडिओ कम्युनिकेशन्स, इंक.’ने (एनएएसडीएक्यू : झेडएम) आज भारतातील उद्योग क्षेत्रातील आघाडीचा ‘झूम फोन’ लॉन्च केल्याची घोषणा समीर राजे-‘झूम’च्या भारत आणि सार्क प्रदेशाचे सरव्यवस्थापक आणि प्रमुख आणि उत्पादन आणि अभियांत्रिकी विभागाचे अध्यक्ष वेलचामी शंकरलिंगम यांनी केली. त्यानुसार महाराष्ट्र टेलिकॉम सर्कलमध्ये (पुणे) मूळ भारतीय फोन नंबरसह ही झूम फोन सेवा आता उपलब्ध होणार आहे. झूम फोन बहुराष्ट्रीय संस्थांना (एमएनसीज्) देशांतर्गत उपस्थिती, स्वदेशी कंपन्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांमध्ये अतुलनीय साधेपणा आणि आधुनिक कार्यक्षमता आणण्यास मदत करते. तसेच ५० देश आणि केंद्रशासित प्रदेशांशी जागतिक व्याप्तीही मिळवून देते.

झूम फोनची मूळ फोन नंबर सेवा महाराष्ट्र दूरसंचार मंडळ (पुणे), त्यानंतर कर्नाटक (बंगळुरू), तामिळनाडू (चेन्नई), आंध्र प्रदेश (हैदराबाद), मुंबई आणि दिल्ली दूरसंचार मंडळासह (टेलिकॉम सर्कल) उपलब्ध असेल, ज्यामध्ये भारतातील सर्व प्रमुख तंत्रज्ञान केंद्रांचा समावेश आहे. ‘झूम इंडिया’ला एप्रिल २०२३ मध्ये भारत सरकारच्या दूरसंचार विभागाकडून (डीओटा) पूर्ण भारतातील एकत्रित परवाना आणि दूर अंतराचे परवानेही मिळाले. त्यानंतरच ‘झूम इंडिया’ने भारतात झूम फोनसाठी देशांतर्गत पायाभूत सुविधा स्थापन करण्यावर आणि नियामक आवश्यकतांचे पालन करण्यावर लक्ष केंद्रित केले. भारतासाठी स्थानिक फोन नंबर्ससह प्रथमच परवानाकृत क्लाउड ‘प्रायव्हेट ब्रांच एक्सचेंज’ (पीबीएक्स) सेवा सुरू करण्याचे हे प्रयत्न ‘झूम’ला या क्षेत्राचे नेतृत्व करण्यास सक्षम करते.

‘झूमची क्लाउड पीबीएक्स सेवा भारताच्या एकत्रित दूरसंचार परवान्याच्या आवश्यकता पूर्ण करते. त्यासाठी नियामक आवश्यकतांनुसार समर्पित स्थानिक अंतर्जोडणीतील पायाभूत सुविधा निर्माण करणे आवश्यक आहे. त्यामुळे झूम फोनचे हे पाऊल आमच्या ग्राहकांना हवी असलेली विश्वासार्ह सेवा आणण्यासाठीची वचनबद्धता दर्शवते,’ असे झूमचे उत्पादन आणि अभियांत्रिकी विभागाचे अध्यक्ष वेलचामी शंकरलिंगम म्हणाले. ‘आम्ही झूम फोन भारतात आणण्यास उत्सुक आहोत, आणि त्यातही प्रथम तो महाराष्ट्र दूरसंचार मंडळात (पुणे) आणत आहोत. तसेच गतिमान कार्यशैलीसाठी, कर्मचाऱ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी आणि ग्राहकांच्या अनुभवात सुधारणा करण्यासाठी बहुराष्ट्रीय उद्योगांना आणि सर्व प्रकारच्या स्वदेशी कंपन्यांचे सक्षमीकरण करण्यासही उत्सुक आहोत,’ असे ‘झूम’च्या भारत आणि सार्क प्रदेशाचे सरव्यवस्थापक आणि प्रमुख समीर राजे यांनी सांगितले.

‘झूम फोनची उपलब्धता ही अत्यंत वेळेत झाली असून, जी भारतातील एक दूरसंचार सेवा म्हणून एकत्रित संवादाच्या मागणीचा कल दर्शवते. व्यावसायिक वैशिष्ट्यांसह एकच व्यासपीठ उपलब्ध करून, झूम फोन भारतातील स्थानिक कंपन्या आणि जागतिक व्यवसायांच्या वाढत्या आधुनिक सहकार्याच्या गरजांना संबोधित करते. जे कर्मचारी आणि ग्राहक संवाद  माध्यमाला एक भक्कम पाया देण्याचा प्रयत्न करतात,‘ असे फ्रॉस्ट अँड सुलिव्हन’चे ज्येष्ठ उद्योग संचाल कृष्णा बैद्य म्हणाले. त्याचबरोबर एका व्यासपीठावरील संवाद प्रणाली सुव्यवस्थित करण्याव्यतिरिक्त झूम फोन त्यांची मापनीयता, सुरक्षितता वाढवते, असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button