ऑक्टोबर २०२४: टीटीके प्रेस्टिज या किचनवेअरमधील आघाडीच्या ब्रॅण्डने स्पिलेज कंट्रोल यंत्रणा असलेल्या स्वच्छ लिड प्रेशर कूकरसाठी नवीन टीव्हीसी लाँच केली आहे, जी ग्राहकांना किचन स्वच्छ व नीटनेटके ठेवण्यासाठी सामना कराव्या लागणाऱ्या दैनंदिन आव्हानांचे निराकरण करते.
डीडीबी मुद्राद्वारे संकल्पना मांडण्यात आलेली ही टीव्हीसी नाविन्यपूर्ण स्वच्छ लिड प्रेशर कूकरला दाखवते, तसेच ग्राहकांना प्रेशर कूकरची शिट्टी, हिस किंवा अचानक ब्रेकेजचा आवाज ऐकल्यानंतर जाणवणाऱ्या भावनांना सादर करते.
ही मोहिम कूकिंगदरम्यान ओव्हरफ्लोइंगमुळे येणाऱ्या अतिरिक्त फेसला प्रतिबंध करण्यासाठी डिझाइन करण्यात आलेले प्रमुख इनोव्हेशन स्वच्छ प्रेशर कूकर व्हिसल इंडेन्टेशनवर लक्ष केंद्रित करते. हे वैशिष्ट्यस्टोव्हटॉप्स स्वच्छ ठेवते आणि सतत देखरेख ठेवण्याची गरज दूर करते, ज्यामुळे वेळ व प्रयत्नांची बचत होते. तसेच, विशेषरित्या तयार करण्यात आलेले डीप लिड डिझाइन उत्तम फिटिंग देते, गळती व स्प्लॅशेस् कमी करते, ज्यामुळे प्रेशर कूकर सहजपणे स्वच्छ करता येतो.
टीटीके प्रेस्टिजचे प्रमुख विक्री व विपणन अधिकारी श्री. अनिल गुरनानी म्हणाले, ”आम्हाला ही टीव्हीसी मोहिम लाँच करण्याचा आनंद होत आहे. या मोहिमेचा भारतातील कुटुंबांमधील सुरक्षितता व सोयीसुविधेला नव्या उंचीवर घेऊन जाण्याचा मनसुबा आहे. स्पिलेज कंट्रोल लिड यंत्रणा असलेल्या स्वच्छ डिझाइनसह ग्राहक प्रेशर कूकर स्वच्छ करण्याच्या त्रासाला दूर करत कूकिंगचा आनंद घेऊ शकतात. हे इनोव्हेशन प्रेशर कूकरच्या लिडमध्ये (झाकण) आहे, जे खोलवर असण्यासोबत कूकिंगदरम्यान कोणत्याही गळतीवर नियंत्रण ठेवते.”