ॲड. प्रकाश आंबेडकर : पोलीस आणि राजकारण्यांकडून दिशाभूल
मुंबई : बाबा सिद्दीकी यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी पोलीस आणि राजकारणी लोकांची दिशाभूल का करत आहेत? लॉरेन्स बिश्नोई टोळीने कॉन्ट्रॅक्ट किलिंग घडवून आणले हे खरे आहे. पण ते कोणाच्या सांगण्यावरून झाले? असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटद्वारे केला आहे.
ॲड. आंबेडकर यांनी बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी अनेक सवाल उपस्थित केले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, ही राजकीय हत्या होती का? पोलीस कोणाला वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत? लॉरेन्स बिश्नोईचे लक्ष वेधण्यासाठी बाबा सिद्दीकी यांनी कोणत्या काळ्या हरणाची शिकार केली?
बाबा सिद्दीकी यांची हत्या झाल्यानंतर ॲड. आंबेडकर यांनी महाराष्ट्र सरकारवर कायदा आणि सुव्यवस्था ढासळल्याचे म्हणत हल्ला चढवला होता. त्यांनी सरकारच्या राजीनाम्याची मागणी केली होती