सीग्रामचा रॉयल स्टॅग बूमबॉक्स ‘जनरेशन लार्ज’ च्या मूळ आवाजासह परत आले आहे. पूर्वीपेक्षाही अधिक भव्य

News Service

त्याच्या चौथ्या सीजनमध्येहा प्रसिद्ध IP कोलकाताविशाखापट्टणममुंबई आणि मोहाली येथे प्रवास करत चाहत्यांना एका अनोख्या थेट संगीत अनुभवासाठी एकत्र आणत आहे.

मुंबई : सीग्रामचा रॉयल स्टॅग बूमबॉक्स हा बॉलीवूडच्या अजरामर सुरांना आणि हिप-हॉपच्या ऊर्जावान तालांना एकत्र आणणारा, संगीतप्रेमींमध्ये खास ओळख असलेला अनुभवाधारित संगीत महोत्सव पुन्हा एकदा आपल्या बहुप्रतिक्षित सीझन फोरसह परतला आहे. मागील सर्व सीझनना मिळालेल्या प्रचंड यशावर उभारलेला हा नवा सीजन यंदा अधिक भव्य आणि महत्त्वाकांक्षी ठरणार असून, भारतातील तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील नामवंत कलाकारांची दमदार फळी यात सहभागी होणार आहे. तरुणाईच्या उत्साहाने भरलेल्या व्हिझाग, कोलकाता, मुंबई आणि मोहाली या चार प्रमुख शहरांमध्ये होणारा हा मल्टी-सिटी टूर संगीतप्रेमींना एक अविस्मरणीय अनुभव देणार आहे.

रॉयल स्टॅग बूमबॉक्स हा आजच्या तरुण पिढीच्या विविध आवडी-निवडींना एकत्र आणणारा, आगळा-वेगळा अनुभव देणारा उपक्रम म्हणून ओळखला जातो. संगीत, फॅशन, खाद्यसंस्कृती आणि गेमिंग अशा तरुणाईच्या आवडत्या क्षेत्रांना जोडणाऱ्या उपसंस्कृतिक घटकांचा सुरेख संगम साधत, हा मंच प्रेक्षकांना वेगळ्या आणि प्रभावी अभिव्यक्तीचा अनुभव देतो.

सीझन 4 ची सुरुवात 21 फेब्रुवारी 2026 रोजी कोलकात्यातून होणार असून, त्यानंतर हा संगीतसोहळा
7 मार्चला विशाखापट्टणम, 21 मार्चला मुंबई आणि 28 मार्चला मोहाली येथे रंगणार आहे. स्थापनेपासूनच या महोत्सवाने बॉलीवूडमधील दिग्गज आवाज आणि ऊर्जावान हिप-हॉप कलाकारांच्या थरारक जुगलबंदीमधून भारताच्या लाईव्ह म्युझिक विश्वाला नवे रूप दिले आहे. यंदाच्या सीझनमध्ये जागतिक ख्यातीचा डीजे ऍलान वॉकर, रॅप सुपरस्टार बादशाह, चार्टबस्टर कलाकार अरमान मलिक आणि डिव्हाईन, तसेच सुमधुर गायिका नीति मोहन, निकिता गांधी, रश्मीत कौर, श्रीराम चंद्रा आणि दिग्गज बँड फॉसिल यांचा दमदार आणि तगडा लाइन-अप प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या संगीत उत्सवाची रंगत आणखी वाढवण्यासाठी हिप-हॉपमधील दिग्गज रफ्तार आणि डिनो जेम्स, तसेच लोकप्रिय डीजे साहिल गुलाटी ही मंचावर धमाल सादरीकरण घेऊन येणार आहेत, चार्टबस्टर गाण्यांची मेजवानी आणि थरारक परफॉर्मन्सचा अविस्मरणीय प्रवास प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. इतक्यावरच थांबत नाही—गेमिंग विश्वातील प्रसिद्ध स्टार पायल धरे हिच्यासोबत होणारा थरारक गेमिंग फेस-ऑफही चाहत्यांना पाहायला मिळणार असून, त्यामुळे हा सीझन खऱ्या अर्थाने एक संपूर्ण, सहभागात्मक आणि भव्य सांस्कृतिक महोत्सव ठरणार आहे.

रॉयल स्टॅग बूमबॉक्स हा भव्य ध्वनी-प्रकाश मांडणी, सहभागी चाहत्यांसाठी खास झोन्स आणि रंगतदार सांस्कृतिक सादरीकरणांचा संगम साधणारे, बहुअंगी आणि अनुभवसमृद्ध कार्यक्रम घडवण्यासाठी प्रसिद्ध आहे, प्रत्येक आयोजन करणाऱ्या शहराची खासियत आणि ऊर्जा टिपत, हा मंच प्रेक्षकांना एक अविस्मरणीय अनुभव देतो.

चारही शहरांसाठी तिकिट विक्री सुरू झाली असूनतुमचे तिकीट आजच या लिंकवर बुक करा: <xx>

लिंक: www.royalstagfan.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button