अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सयाजी शिंदे या प्रमुख नावांसह विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने २७ स्टार प्रचारकांची घोषणा केली आहे.

News Service

अभिनेते सयाजी शिंदे राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकांच्या यादीत

महाराष्ट्रात २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आज २७ स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे.

स्टार प्रचारकांच्या यादीत राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील यांचा समावेश आहे. पक्षाने नुकतेच पक्षात प्रवेश केलेले ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांचीही निवड यावेळी केली आहे.

मंत्री धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, आदिती तटकरे हेही पक्षाचा स्टार प्रचारक म्हणून प्रचार करणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button