‘कॉंग्रेसची गॅरंटी’ जाहीर होणार!
मुंबई – इंडिया आघाडीची ‘स्वाभिमान सभा’ उद्या बुधवार दि. ६ नोव्हेंबर रोजी होणार आहे. बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये ५ वाजता होणाऱ्या या सभेत मा. मल्लिकार्जून खरगे, मा. राहूल गांधी, मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे, मा. शरदचंद्र पवार उपस्थित रहाणार आहेत. महाविकास आघाडीची महाराष्ट्रासाठी ‘गॅरंटी’ यावेळी जाहीर होणार आहे.
महाराष्ट्राची दिवसेंदिवस पिछेहाट करणाऱ्या
भाजप आणि महायुतीच्या कारभाराचा पंचनामा करत महाविकास आघाडीचा एल्गार या सभेत होणार आहे. मुंबईकरांचा आवाज या निमित्ताने बुलंद करण्यात येणार आहे.
बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स मधील एशियन हार्ट हॉस्पिटल समोर GTST मैदान येथे ही सभा होईल. या स्वाभिमान सभेत मुंबईकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं, असं आवाहन मुंबई कॉंग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षाताई गायकवाड यांनी केलं आहे.