राष्ट्रीय, ३ ऑक्टोबर २०२५: कोका-कोला इंडिया आणि इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल वर्षातील सर्वात बहुप्रतिक्षित क्रीडा इव्हेण्ट ‘विमेन्स क्रिकेट वर्ल्ड कप इंडिया २०२५’मध्ये अद्वितीय उत्साहाची भर करण्यास सज्ज आहेत. हा धोरणात्मक सहयोग त्यांच्या ८ वर्षांच्या भागीदारीवर आधारित आहे, जो क्रीडा क्षेत्रात महिलांना प्रेरित करण्याप्रती आणि खेळाडूंच्या भावी पिढीला सक्षम करणाऱ्या संधी निर्माण करण्याप्रती कंपनीच्या कटिबद्धतेला अधिक दृढ करतो.

अधिकृत बेव्हरेज पार्टनर म्हणून थम्स अप एक्सफोर्स आणि हायड्रेशन पार्टनर म्हणून बॉडीआर्मर लाइट ओआरएस यांच्यासह कोका-कोला इंडिया संपूर्ण आयसीसी विमेन्स क्रिकेट वर्ल्ड कप २०२५ दरम्यान खेळाडूंना व चाहत्यांना उत्साहित व रिफ्रेश ठेवेल. आपल्या प्रबळ क्रीडा वारसाशी संलग्न असलेली कोका-कोला इंडिया गुवाहाटी, इंदौर, विजाग व नवी मुंबई येथे या स्पर्धेचे यजमानी भारताला प्रशंसित करेल, तसेच खात्री घेईल की प्रत्येक सामन्यामधून साहसी उत्साह, आनंद व एकजूटता दिसून येईल. कोका-कोला इंडिया आपल्या पेयांचा संपूर्ण पोर्टफोलिओ देईल, ज्यामधून प्रत्येकाला सामन्याचा आनंद घेण्यासाठी उत्तम सुविधा उपलब्ध असण्याची खात्री मिळेल.
आयसीसी स्पर्धा, ऑलिम्पिक्स व पॅरालिम्पिक्सदरम्यान ‘थम्स अप उठा, इंडिया इंडिया मचा’, #PalatDe, #TaanePalatDe आणि ‘उठा थम्स अप, जगा तूफान’ अशा मोहिमांच्या माध्यमातून खेळाडूंना सक्षम करण्याचा आपला वारसा अधिक दृढ करत थम्स अपने दीर्घकाळापासून क्रीडा उत्साहाला साजरे केले आहे. आता, नवीन नो-शुगर बेव्हरेज थम्स अप एक्सफोर्ससह ब्रँड त्याच धाडसी वृत्तीसह या वारसाला पुढे घेऊन जात आहे. याला पूरक म्हणून कोका-कोलाचे स्पोर्ट्स ड्रिंक बॉडीआर्मर लाइट ओआरएसने आयसीसी विमेन्स क्रिकेट वर्ल्ड कप २०२५ मध्ये खेळाडूंना व चाहत्यांना प्रगत हायड्रेशन देण्याप्रती ब्रँडची कटिबद्धता अधिक दृढ केली आहे.