- V3 आणि V4 मोबाईलची किंमत प्रति फोन 1099 रुपये ठेवण्यात आली आहे.
- 455 हून अधिक लाईव्ह टीव्ही चॅनेल्स उपलब्ध असणार
- फक्त 123 रुपयांमध्ये महिन्याचा रिचार्ज
इंडिया मोबाइल काँग्रेस 2024 मध्ये रिलायन्स जिओने दोन नवीन 4जी फीचर फोन लाँच केले आहेत. V3 आणि V4 हे दोन्ही 4जी फीचर फोन जिओभारत सीरिजअंतर्गत लाँच केले गेले आहेत. हे नवीन मॉडेल्स 1099 रुपयांच्या किंमतीत बाजारात उपलब्ध असतील. गेल्या वर्षी जिओभारत V2 मॉडेल लाँच करण्यात आले होते, ज्याने भारतीय फीचर फोन मार्केटमध्ये खळबळ उडवली होती. कंपनीच्या मते, लाखो 2जी ग्राहक जिओभारत फीचर फोनच्या माध्यमातून 4जीमध्ये शिफ्ट झाले आहेत.
या पुढील पिढीच्या 4जी फीचर फोनमध्ये आधुनिक डिझाइन, 1000 mAh ची दमदार बॅटरी, 128 GB पर्यंतचे एक्सपेंडेबल स्टोरेज आणि 23 भारतीय भाषांचे सपोर्ट आहे. जिओभारत फोनसाठी फक्त 123 रुपयांमध्ये मासिक रिचार्ज करता येईल, ज्यामध्ये अनलिमिटेड वॉइस कॉल आणि 14 GB डेटा देखील मिळेल.
V3 आणि V4 दोन्ही मॉडेल्स जिओ-टीव्ही, जिओ-सिनेमा, जिओ-पे आणि जिओ-चॅट या काही उत्कृष्ट प्री-लोडेड अॅप्ससह येतील. 455 हून अधिक लाईव्ह टीव्ही चॅनेल्ससह चित्रपट, व्हिडिओ आणि खेळ सामग्री ग्राहकांना एका क्लिकवर उपलब्ध होईल. दुसरीकडे, जिओ-पे सोप्या पेमेंटसाठी आणि जिओ-चॅट असीमित वॉइस मेसेजिंग, फोटो शेअर आणि ग्रुप चॅटचे अनेक पर्याय देतो.
जिओभारत V3 आणि V4 लवकरच सर्व मोबाइल स्टोअर्समध्ये तसेच जीओमार्ट आणि ऍमेझॉन वर उपलब्ध होतील.