‘जिओ क्लाउड पीसी’ घरच्या टीव्हीला बनवणार संगणक

News Service

नवी दिल्ली, १६ ऑक्टोबर, २०२४: रिलायन्स जिओने इंडिया मोबाइल काँग्रेस २०२४ मध्ये एक अस तंत्रज्ञान सादर केल आहे ज्यामुळे घरातील स्मार्ट टीव्ही सहजपणे संगणकात रूपांतरित करता येईल. जिओ क्लाउड पीसी नावाचे हे तंत्रज्ञान केवळ काहीशे रुपयांत टीव्हीला संगणकात बदलू शकते. यासाठी फक्त इंटरनेट कनेक्शन, स्मार्ट टीव्ही, टायपिंग की-बोर्ड, माऊस आणि जिओ क्लाउड पीसी अ‍ॅपची आवश्यकता असेल. ज्या लोकांचे टीव्ही स्मार्ट नाहीत, त्यांचे साधे टीव्ही जिओफायबर किंवा जिओएअरफायबरसह मिळणाऱ्या सेट-टॉप बॉक्सच्या माध्यमातून संगणकात बदलू शकतात.

जिओ क्लाउड पीसी एक असं तंत्रज्ञान आहे ज्यामुळे कोणताही टीव्ही इंटरनेटच्या माध्यमातून क्लाउड कम्प्युटिंगशी जोडला जाऊ शकतो. याचा वापर करणे देखील सोपे आहे, ग्राहकाला फक्त अ‍ॅपमध्ये लॉगिन करावे लागेल आणि क्लाउडमध्ये साठवलेले संपूर्ण डेटा टीव्हीवर दिसायला लागेल. ईमेल, मेसेज, सोशल नेटवर्किंग, इंटरनेट सर्फिंग, शाळेचे प्रोजेक्ट्स, ऑफिस प्रेझेंटेशनसारखी संगणकावर करता येणारी सर्व कामे घराच्या टीव्हीवर करता येतील. सोप्या भाषेत सांगायचे तर सर्व डेटा क्लाउडवर असेल आणि टीव्हीद्वारे सर्व्हर, स्टोरेज, डेटाबेस, नेटवर्किंग, सॉफ्टवेअर आणि अनॅलिटिक्स सारख्या सेवांचा वापर करता येईल.

भारतीय मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी संगणकाची सुविधा मिळणे कठीण असते. अशावेळी हे तंत्रज्ञान एक वरदान ठरू शकते. कारण क्लाउड कम्प्युटिंगची क्षमता आवश्यकतेनुसार कमी-जास्त करता येते. हे केवळ सुरक्षितच नाही, तर सामान्य संगणकांच्या तुलनेत डेटा पुनर्प्राप्ती करणे खूप सोपे आहे. टीव्हीसोबतच हे मोबाईलवर देखील वापरता येईल. तथापि, कंपनीने अद्याप या अ‍ॅपच्या लॉन्च डेटची घोषणा केलेली नाही, परंतु हे पुढील काही महिन्यांत बाजारात आणले जाऊ शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button