टोयोटा किर्लोस्कर मोटरने टोयोटा ग्लान्झाची ‘फेस्टिव्हल लिमिटेड एडिशन’ सादर करण्याची घोषणा केली

News Service

–        ग्लान्झाच्या खास ‘फेस्टिव्ह लिमिटेड एडिशन’ ऑफरमध्ये प्रीमियम टीजीए पॅकेजचा समावेश आहे, ज्याचा उद्देश स्टाइल, आराम आणि प्रतिष्ठा आणखी वाढवण्याचा आहे.

–        31 ऑक्टोबर 2024 पर्यंत सर्व टोयोटा डीलरशिपवर सर्व ग्रेडमध्ये मोफत अॅक्सेसरीज  पॅकेज उपलब्ध आहे

बंगळुरू, 19 ऑक्टोबर 2024: सणाचा उत्साह लक्षात घेऊन, टोयोटा किर्लोस्कर मोटरने आज टोयोटा ग्लान्झाची ‘फेस्टिव्हल लिमिटेड एडिशन’ सादर करण्याची घोषणा केली. ग्राहक आता विशेष डीलरद्वारे फिट केलेले टोयोटा जेन्युइन अॅक्सेसरीज  (टीजीए) पॅकेजेसचा आनंद घेऊ शकतात, जे या सणासुदीच्या काळात ग्लान्झाच्या उत्कृष्ट स्टाइल, परफॉर्मन्स आणि आरामासह त्यांचा ड्रायव्हिंगचा अनुभव वाढवण्यासाठी डिझाइन केले आहेत.

अॅडव्हान्स टेक्नॉलॉजी, आकर्षक डिझाइन आणि उच्च इंधन कार्यक्षमतेसाठी 2019 पासून ओळखली जाणारी, टोयोटा ग्लान्झाची लिमिटेड एडिशन  20,567 रुपये किमतीच्या 13 विशेष टीजीए पॅकेजसह येते. या वाहनात क्रोम आणि ब्लॅक बॉडी साइड मोल्डिंग, बॅक डोअर गार्निश क्रोम आणि ओआरव्हीएम गार्निश क्रोम सारखे प्रीमियम वैशिष्ट्ये आहेत. इतर खास फीचर्समध्ये अतिरिक्त आरामासाठी 3D फ्लोरमॅट, डोअर व्हिझर प्रीमियम आणि नेक कुशन (ब्लॅक आणि सिल्व्हर कलर मध्ये) यांचा समावेश आहे. टोयोटा ग्लान्झाचे स्टायलिश आकर्षण रियर बंपर, फेंडर तसेच रियर रिफ्लेक्टर आणि वेलकम डोअर लॅम्प्सवर क्रोम गार्निशने अधिक समृद्ध केले आहे, ज्यामुळे त्याला प्रीमियम टच मिळतो.

श्री सबरी मनोहर – वाइस प्रेसिडेंट, सेल्स-सर्व्हिस-युज्ड कार बिझनेस – टोयोटा किर्लोस्कर मोटर, टोयोटा ग्लान्झाच्या फेस्टिव्हल लिमिटेड एडिशन लाँच करताना म्हणाले, “या सणासुदीच्या काळात टोयोटा ग्लान्झाची ‘फेस्टिव्हल लिमिटेड एडिशन’ सादर करून आमच्या ग्राहकांमध्ये आणखी उत्साह आणण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. डायनॅमिक-स्पोर्टी डिझाइन, अॅडव्हान्स फीचर्स आणि उत्कृष्ट परफॉर्मन्स यांच्या मिश्रणासाठी ग्लान्झाचे नेहमीच कौतुक केले जाते आणि या लिमिटेड एडिशनसह, आम्ही त्याचे आकर्षण आणखी वाढवत आहोत.

अॅक्सेसरीज ग्लान्झाचे केवळ व्हिज्युअल आकर्षणच नाही तर एकंदर आराम आणि उपयुक्तता देखील वाढवतात याची खात्री करण्यासाठी आम्ही खूप काळजी घेतली आहे. ज्यामुळे ते प्रीमियम आणि परिष्कृत ड्रायव्हिंग अनुभव शोधणाऱ्या ग्राहकांसाठी योग्य सहकारी बनले आहे. आम्ही उत्पादनापेक्षा गुणवत्ता आणि मूल्य प्रदान करण्यासाठी वचनबद्ध आहोत, यामुळे विक्रीनंतरच्या विशेष सेवा देण्याची आमची वचनबद्धता आणखी मजबूत होईल ज्यासाठी टोयोटा प्रसिद्ध आहे. आम्हाला विश्वास आहे की ही ‘फेस्टिव्हल एडिशन’ आमच्या ग्राहकांशी मजबूतपणे कनेक्ट होईल, जे त्यांना त्यांच्या आवडत्या टोयोटा मॉडेलच्या परफॉर्मन्सचा आणि प्रतिष्ठेचा आनंद घेताना स्टाईलमध्ये उत्सव साजरा करण्याची संधी देईल.”

टोयोटाची सर्वात परवडणारी एडिशन म्हणून, ग्लान्झा ही असंख्य भारतीय कुटुंबांची एक पसंतीची निवड बनली आहे. गेल्या काही वर्षांत, टेक्नॉलॉजीची जाण असलेल्या ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी हे वाहन सतत विकसित होत आहे आणि कार्यक्षम कामगिरी कायम ठेवत विशेष ड्रायव्हिंग अनुभव देण्याचा वारसा पुढे चालू आहे. आता, फेस्टिव्हल लिमिटेड एडिशन सर्व व्हेरियंटमध्ये उपलब्ध असल्याने, स्टाइल आणि सोयींच्या परिपूर्ण मिश्रणासह मालकीचा अनुभव आणखी वाढवला गेला आहे.

सणासुदीच्या ऑफरचा एक भाग म्हणून, टोयोटा ग्लान्झा फेस्टिव्हल लिमिटेड एडिशनची निवड करणाऱ्या ग्राहकांसाठी मोफत टीजीए पॅकेज 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत उपलब्ध असेल. शिवाय, प्रत्येक अॅक्सेसरीज डीलरशिपवर प्रमाणित टोयोटा टेक्नीशियनद्वारे कुशलतेने फिट केले जाते, जे ग्राहकांना अतुलनीय अनुभव देण्यासाठी गुणवत्ता सुनिश्चित करते. फेस्टिव्हल लिमिटेड एडिशन लोकप्रिय टोयोटाच्या मॉडेलमध्ये केवळ उत्सवाचे आकर्षण वाढवत नाही तर विस्तारित वॉरंटी, अस्सल टोयोटा अॅक्सेसरीज आणि टोयोटाच्या प्रसिद्ध विक्रीनंतरच्या सेवांसह विशेष मूल्य देखील देते, जे ग्राहकांच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाइन केलेले आहेत.

सर्व टोयोटा डीलरशिपवर बुकिंग सुरू आहे. ग्राहक https://www.toyotabharat.com/online-booking/ वर कार ऑनलाइन बुक करू शकतात किंवा त्यांच्या जवळच्या टोयोटा डीलरशिपला भेट देऊ शकतात.

Screenshot

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button