बदलापूरमध्ये किसन कथोरेंचा प्रचाराचा झंझावात

News Service

डॉ. अतुल अनिल नेरपगार

बदलापूर : विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने मुरबाड मतदारसंघातून यंदाही लोकप्रिय आमदार किसन कथोरेंना उमेदवारी दिल्याने मुरबाडसह बदलापूरमध्ये जनतेत उत्साह संचारला आहे. विविध विकास कामांमुळे लोकप्रिय झालेले आ. कथोरे यांनी इतर उमेदवारांच्या तुलनेत प्रचारात देखील आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे.
किसन शंकर कथोरे उर्फ आप्पा यांना त्यांच्या विधानसभा क्षेत्रात विकास पुरुष म्हणून तर ओळखले जातेच परंतु कल्याण ते कसारा ,मुरबाड, माळशेज, शहापूर ,श्री मलंग गड, अंबरनाथ ,आणि बदलापूर या भागात त्यांचे विकास कार्य दिसून येत आहे. मुरबाड विधानसभा ही तशी मुंबईपासून जवळच असली तरी देखील आजवर दुर्लक्षित असं क्षेत्र होते. परंतु आप्पांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये बदलापूर मुरबाड याचा संपूर्ण विकास आराखडा तयार करून तसा विकास घडवून आणण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आणि हा नुसता प्रयत्न असून विकास झालेला आहे तसे लोकांना दिसून येत आहे. सध्या किशन शंकर कथोरे यांच्या विरुद्ध राजनीतिक षड्यंत्राची चर्चा आपल्याला ऐकायला मिळते, विरोधक नको ती अफवा पसरवत आहेत परंतु महाराष्ट्रातले एकमेव असे आमदार असतील की जे अपक्ष म्हणून तरी उभे राहिले असते तरी त्यांचे समर्थक आणि संपूर्ण मुरबाड विधानसभा त्यांच्या पाठीशी उभी राहील आणि त्यांना विजय मिळवून देईल . आज त्यांच्याविरुद्ध अनेक विरोधक षड्यंत्राची कट कारस्थान रचत आहेत परंतु आप्पांच्या विकास कार्य समोर त्याचा कुठवर निभाव लागेल हे निवडणुकीनंतर दिसून येईल.
किसन शंकर कथोरे यांनी सदैव आपल्या विधानसभा क्षेत्रातील सर्व लोकांसाठी ते सेवेसाठी तत्पर राहतात त्यांच्याकडे गेलेल्या लोकांमध्ये त्यांनी कधीही भेदभाव केला नाही कुठल्याही पक्षाचा असो जाती-पातीचा असो धर्माचा असो सर्वांची काम त्यांनी मनापासून आणि आपुलकीने केली. त्यामुळे आप्पांच्या बंगल्यावर सकाळी तमाम समथर्कांची गर्दी जमलेली असते . किशन शंकर कथोरे यांनी आपल्या विधानसभा क्षेत्रात सर्वात जास्त विकास निधी आणून तो विकास कामासाठी वापरला त्यांच्या विधानसभा क्षेत्रातील गावागावातील रस्ते हे सिमेंट काँक्रीटचे झालेले आहेत तसेच पाण्याच्या सुख सुविधा गावोगावी त्यांनी पोहोचविल्या केंद्रातल्या बऱ्याच योजना सफल पूर्वक त्यांनी आपल्या क्षेत्रामध्ये राबवल्या आहे. यामुळे त्यांच्याविरुद्ध कितीही विरोधकांनी जोर लावला तरी आप्पांचे विकास कार्य त्यांना या नवडणुकीमध्ये विजयश्री ची माळ गळ्यात घालेल असा विश्वास त्यांच्या सर्व समथर्कांमध्ये आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button