मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विविध क्षेत्रातील तज्ज्ञ पुढे सरसावले

News Service

सदिच्छादूत करणार मतदान करण्याचे आवाहन

 मुंबई: विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा, मतदान हक्काचे महत्व सांगण्यासाठी निवडणूक आयोगाच्यावतीने मतदारजागृतीचे विविध उपक्रम राबविले जात आहेत. मतदार जागृतीच्या या उपक्रमांना कला, क्रीडा, साहित्य आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची ‘सदिच्छादूत’ म्हणून साथ लाभली आहे. हे सदिच्छादूत मतदारांना मतदान करण्यासाठी आवाहन करणार आहेत.

            समाज माध्यमे, मुद्रित माध्यमे आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांबरोबरच जाहिरात फलक, भित्तीपत्रकाद्वारे हे सदिच्छादूत लोकशाही सुदृढ करण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन करीत आहेत. राज्यस्तरीय सदिच्छादूतांमध्ये पद्मभूषण अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, अभिनेते प्रशांत दामले, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, अभिनेत्री डॉ. निशिगंधा वाड, अभिनेत्री उषा जाधव, महिला क्रिकेटपटू स्मृती मनधना, सुवर्णपदक विजेती नेमबाज राही सरनोबत, अर्जुन पुरस्कार सन्मानित महिला धावपटू ललिता बाबर, अर्जुन पुरस्कार सन्मानित जलतरणपटू वीरधवल खाडे, तृतीयपंथी कार्यकर्त्या श्रीगौरी सावंत, तृतीयपंथी प्रणीत हाटे, तृतीयपंथी झैनब पटेल, दिव्यांग कार्यकर्ता निलेश सिंगीत, दिव्यांग कार्यकर्ती व साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या लेखिका सोनाली नवांगुळ यांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button