ही ई- एससीव्ही आपली सर्वाधिक रेंज, वेगवान चार्जिंग आणि नव्या वैशिष्ट्यांच्या मदतीने < 2 t 4W इलेक्ट्रिक विभागातील समीकरणे नव्याने प्रस्थापित करण्यासाठी सज्ज
· महिंद्रा झिओजचे ३००+ व्ही हाय- व्होल्टेज आर्किटेक्चरमुळे मिळते जास्त चांगली उर्जा कार्यक्षमता, उच्च श्रेणी आणि चार्जिंगचा वेगवान वेळ
· महिंद्रा झिओला रिजनरेटिव्ह ब्रेकिंग देण्यात आले असून ते १६० किमीपर्यंत वास्तविक ड्रायव्हिंग श्रेणी देते
· महिंद्रा झिओ आपल्या ६० मिनिटांच्या वेगवान चार्जिंग सुविधेच्या मदतीने १००० किलोमीटर श्रेणी देते.
· महिंद्रा झिओची आधुनिक इलेक्ट्रिक मोटर ३० केडब्ल्यू पॉवर आणि ११४ एनएम टॉर्क देते
· लिक्विड कुल्ड २१.३ केडब्ल्यूएच बॅटरी पॅक सर्वोच्च AIS038 हाय- व्होल्टेज बॅटरीचे मापदंड पूर्ण करणारा आहे
· निमो युनिव्हर्सद्वारे फ्लीट्ससाठी फ्लीट मॅनेजमेंट सिस्टीम (एफएमएस) ताफ्यांसाठी आणि वैयक्तिक वापरासाठी नेमो ड्रायव्हर अप
· एआय अनेबल्ड कॅमेरा एडीएएससमध्ये लेन डिपार्चर, पादचारी सुरक्षेसाठी धोक्याचे इशारे व इतर बरंच काही देण्यात आले आहे.
· हिल होल्ड असिस्ट आणि क्रीप फंक्शन भरगच्च ट्रॅफिकमध्ये उपयुक्त
· डिझेल एससीव्हीशी तुलना करता ग्राहकांना सात वर्षांत ७ लाख रुपये वाचवता येणार
नवी दिल्ली, ३ ऑक्टोबर २०२४ – महिंद्रा लास्ट माइल मोबिलिटी लिमिटेड (एमएलएमएमएल) या भारताच्या पहिल्या क्रमांकाच्या इलेक्ट्रिक तीन चाकी कंपनीने आज महिंद्रा झिओ या क्रांतीकारी, नव्या इलेक्ट्रिक चारचाकीचे अधिकृत लाँच करत असल्याची घोषणा केली आहे. झिओ हे नाव ‘झिरो एमिशन ऑप्शन’ वरून घेण्यात आले असून ते इलेक्ट्रिक वाहनाचे पर्यावरणीय फायदे अधोरेखित करते. ही गाडी एमएलएमएमएलच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत वाहतुकीची सोय देण्याच्या आणि ग्राहकांना त्यांच्या आयुष्यात प्रगती करण्यासाठी मदत करण्याच्या तत्वाशी सुसंगत आहे. दोन व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध असलेली एमएलएमएमएल शहरी वाहतुकीच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन बनवण्यात आली आहे. एमएलएमएमएलने महिंद्रा झिओची किंमत ७.५२ लाख रुपये एक्स– शोरूम पॅन भारत ठेवली आहे. त्यामुळे डिझेल एससीव्हीशी तुलना करता ग्राहकांना सात वर्षांत ७ लाख रुपये वाचवता येतील.
ताकदवान कामगिरी
महिंद्रा झिओमध्ये कार्यक्षम हाय– व्होल्टेज ३००+ व्ही आर्किटेक्चर देण्यात आले आहे, जे उच्च प्रतीची उर्जा कार्यक्षमता, मोठी श्रेणी आणि वेगवान चार्जिंग देते. महिंद्रा झिओची आधुनिक मॅग्नेट सिंक्रोनॉस मोटर ३० केडब्ल्यू उर्जा आणि ११४ एनएम टॉर्क देते. यातील जबरदस्त २१.३ केडब्ल्यूएच लिक्विड– कुल्ड बॅटरी जबरदस्त कामगिरी करते. ६० किमीच्या सर्वोच्च वेगासह झिओ प्रवास पटकन संपवत असल्यामुळे मिळकतीचे प्रमाण वाढते.
महिंद्रा झिओची दर्जेदार पेलोड क्षमता ७६५ किलो असून त्यामुळे वेगवेगळ्या व्यावसायिक गरजा पूर्ण करता येतात. २२५० एमएम कार्गो बॉक्समुळे लोडिंग क्षमता वाढते.
दीर्घकालीन श्रेणी
महिंद्रा झिओची वास्तविक ड्रायव्हिंग रेंज १६० किमी आहे. त्याला रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टीममुळे जोड मिळाली असून जी या रेंजला पूरक ठरते.
या वाहनामध्ये इको आणि पॉवर असे दोन मोड्स देण्यात आले आहेत, जे रेंज वाढवतात आणि टर्नअराउंड वेळ कमी करतात. डीसी फास्ट चार्जरसह महिंद्रा झिओसह ६० मिनिटांत १०० किमी रेंज मिळते. महिंद्रा झिओसह वेगवेगळे चार्जर कॉन्फिगरेशन्स उपलब्ध असून त्यात नेहमीच्या पद्धतीनुसार ३.३ केडब्ल्यू पुरवले जातात.
वापरण्यास सोपी
महिंद्रा झिओचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ३२ टक्के ग्रेडेबिलिटी, जी < 2 t इलेक्ट्रिक कार्गोमध्ये सर्वाधिक आहे. यामुळे वाहनाला चढण चढणे सहज शक्य होते. या वाहनातील स्मार्ट गियर शिफ्टर चालकाला ऑटोमॅटिक ट्रान्समिशनची सोय देणारा आहे. त्याशिवाय महिंद्रा झिओमध्ये क्रीप फंक्शन देण्यात आले आहे, जे भरगच्च ट्रॅफिकमध्ये चालकाचा तणाव कमी करते. महिंद्रा झिओचा टर्निंग रेडियस ४.३ एम असून त्यामुळे अरूंद रस्त्यांवर चांगल्या प्रकारे वाट काढता येते.
विचारपूर्वक तयार करण्यात आलेली डॅशबोर्ड- प्लेस्ड ट्रान्समिशन डायल सोयीस्कर वॉकथ्रू केबिनची खात्री करते. टाइप सी युएसबी चार्जिंग स्लॉट आणि लॉकेबल ग्लोव्हबॉक्सही उपयुक्ततेसाठी देण्यात आला आहे. पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोलमुळे चालकला वाहनाची