लावाने ड्युअल एमोलेड डिस्प्लेसह ‘अग्नी ३’ लॉन्च केला

News Service

मुंबई,  ऑक्टोबर २०२४: लावा इंटरनॅशनल लिमिटेड या भारतातील आघाडीच्या स्मार्टफोन निर्माता कंपनीने या उत्सवाच्या काळात त्यांचा अत्याधुनिक लावा अग्नी ३ हा उच्च तंत्रज्ञानयुक्त स्मार्टफोन बाजारात उपलब्ध होत असल्याचे जाहीर केले. आजच्या तंत्रज्ञान-समज असलेल्या पिढीसाठी उत्कृष्टतेचे नवे मापदंड प्रस्थापित करून, रु. १९,९९९* या प्रारंभिक आकर्षक किंमतीमध्ये उपलब्ध आहे. सेगमेंट फर्स्ट ड्युअल एमोलेड डिस्प्ले आणि शक्तीशाली मीडियाटेक डायमेंसिटी ७३००एक्स प्रोसेसर अशा विभागातील नाविन्यपूर्ण वैशिष्ट्यांसह अग्नी ३ ची रचना करण्यात आली आहे.

मुख्य उत्पादनांच्या श्रेणीचा विस्तार करत नवीन स्मार्टफोन अत्याधुनिक हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरचा मिलाफ करून अभूतपूर्व वापरकर्ता अनुभव देऊ करतो. हा स्मार्टफोन ८ जीबी +१२८ जीबी चार्जरशिवाय, ८ जीबी +१२८ जीबी चार्जरसह आणि ८ जीबी+२५६ जीबी चार्जरसह या तीन प्रकारांमध्ये बाजारात उतरवण्यात आला आहे. हिथर ग्लास आणि प्रिस्टीन ग्लास या दोन रंगांमध्ये सादर करण्यात आला असून ९ ऑक्टोबरला रात्री १२ वाजल्यापासून अग्नी ३ विक्रीसाठी उपलब्ध होईल. 

लावा इंटरनॅशनल लिमिटेडचे प्रॉडक्ट-हेड श्री. सुमित सिंग म्हणाले, “अग्नी 3 श्रेणीची व्याख्या करणाऱ्या नव्या कल्पना आणि उत्कृष्टतेच्या ज्वलंत भावनेचे मूर्तिमंत उदाहरण आहे. हा केवळ एक स्मार्टफोन नाही; तर भारताच्या तंत्रज्ञानविषयक कौशल्याचा आणि भारतात निर्माण करण्यात आलेली अतुलनीय वापरकर्ता अनुभव देऊ करणारी दर्जेदार उत्पादने देण्याच्या आमच्या बांधिलकीची ही साक्ष आहे.  मला आशा आहे की,  अत्याधुनिक वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असलेल्या नव्या  श्रेणीसह अग्नीची लोकप्रियता वाढेल आणि या विभागातील स्मार्टफोन अनुभवांची नव्याने व्याख्या तयार केली जाईल.”

क्रांतिकारी ड्युअल एमोलेड डिस्प्ले: लावा अग्नी 3 मध्ये या विभागातील पहिला एमोलेड डिस्प्ले आहे- एक पुढच्या बाजूला आणि एक मागच्या बाजूला.  प्राथमिक डिस्प्ले हा आकर्षक ६.७८ इंच १.५ के ३ डी वक्राकार एमोलेड आहे.  हा १२० हर्ट्झ  रिफ्रेश रेट, एचडीआर आणि वाईडवाईन एल१ सपोर्टसह १.०७ अब्ज रंग आणि १२०० निट्स लोकल पिक ब्राईटनेस देऊ करतो.  मागच्या बाजूला १.७४ इंचाचा २ डी एमोलेड दुय्यम डिस्प्ले आहे.  मागच्या कॅमेराचा वापर करून सेल्फी घेण्यासाठी, फोन कॉल्स घेण्यासाठी, त्वरित नोटीफिकेशन्स मिळवण्यासाठी आणि संगीत नियंत्रण, चालणे आणि कॅलरी ट्रॅकर, रेकॉर्डर इ. सारख्या अॅप्लिकेशन्सचा वपार करण्यासाठी हा अतिशय उपयोगी आहे. 

मीडियाटेक डायमेंसिटी ७३००एक्ससह अद्वितीय कामगिरी: अग्नी 3 मध्ये या विभागातील पहिलाच मीडियाटेक डायमेंसिटी ७३००एक्स ऑक्टा-कोअर प्रोसेसर देण्यात आला असल्याने  अद्वितीय कामगिरी, उर्जा क्षमता आणि अखंडिपणे अनेक कामे एकाचवेळी करता येतात. ४ एनएम प्रक्रीयेनुसार तयार करण्यात आलेल्या प्रोसेसरमुळे  हा फोन सर्वाधिक मागणी असणारे अॅप्स आणि गेम्स सहजपणे हाताळू शकतो. अग्नी ३ गेम्ससाठी खराखुरा खिळवून ठेवणारा अनुभव देतो.  तीस-या पिढीच्या २९००एनएम² वेपर चेंबर कुलिंग तंत्रज्ञान सुसज्ज आणि स्पर्श तसेच गतीच्या ज्ञानासाठी फ्लॅगशिप एक्स-एक्सिस लिनिअर मोटरने सुसज्ज असणारा हा स्मार्टफोन जास्त गरम न होता उत्कृष्ट कामगिरी पार पडतो आणि अचूक प्रतिसादात्मक माहिती देतो.  

दर्जेदार छायाचित्रण: लावा अग्नी ३ मध्ये बहुआयामी ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे.  यात आश्चर्यकारक छायाचित्रणासाठी ओआयएससह ५० एमपी सोनी क्वाड-बायर सेन्सर, ३एक्स ऑप्टीकल आणि ३०एक्स सुपर झूम क्षमता असणारी ८ एमपी टेलीफोटो लेन्स आणि ११२-अंशाचे दृश्य दाखवू शकणारा ८ एमपी अल्ट्रावाईड कॅमेरा आहे.  ईआयएसने सुसज्ज १६.८ एमपी फ्रंट कॅमेरा भेदक आणि स्थिर सेल्फिजची हमी घेतो.  हे कॅमेरा उद्योगातील सर्वाधिक प्रगत एआय सुपर नाईट आणि पोर्ट्रेट सॉफ्टवेअर अल्गोरिदमने समर्थित आहेत. 

बॅटरी आणि चार्जिंग: या स्मार्टफोनमध्ये ६६व्ही सुपर-फास्ट चार्जिंगसह ५०००एमएएच  ली-पो बॅटरी आहे.  ती १० तासांचा युट्युब प्लेबॅक वेळ देते आणि १९ मिनिटांपेक्षा* कमी वेळात ५०% चार्ज होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button