हाऊसिंग डॉटकॉमने मालमत्ता शोधण्याचा अनुभव अधिक आकर्षक केला

News Service

~ ‘हाऊसिंग स्टोरीज’ आणि ‘हाऊसिंग शॉर्ट्स’ लघु व्हिडिओ सुविधा सुरु केली ~

मुंबई, २१ ऑक्टोबर २०२४: हाऊसिंग डॉटकॉम या भारताच्या नंबर १ रियल इस्टेट अॅपने ‘हाऊसिंग स्टोरीज’ आणि ‘हाऊसिंग शॉर्ट्स’चे अनावरण केले आहे, जी मालमत्तेचा शोध घेण्याची पद्धत बदलण्यासाठी डिझाईन केलेली अभूतपूर्व फीचर्स आहेत. सोशल मीडिया प्रेरित शॉर्ट व्हिडिओ फॉरमॅटसह असलेले हे कल्पक फीचर विकासक आणि ब्रोकर पार्टनर्सना घराचा शोध घेणाऱ्यांशी सहजतेने कनेक्ट होण्यास सक्षम बनवते आणि मालमत्तांचा शोध घेणे अधिक आकर्षक आणि परस्पर-संवादी बनवते.

‘हाऊसिंग स्टोरीज’ ग्राहकांनी शेअर केलेल्या अनफिल्टर्ड व्हिडिओज आणि इमेजिस वापरुन बनवल्या आहेत, ज्या मालमत्तेची अस्सल झलक दाखवतात. या व्यतिरिक्त, ‘हाऊसिंग शॉर्ट्स’ एक परस्परसंवादी एआय अॅंकर प्रदान करतात, जो मालमत्तेच्या हायलाइट्स द्वारे यूझर्सना मार्गदर्शन करतो आणि विकासक किंवा एजंट यांनी दिलेले महत्त्वाचे तपशील सांगतो. हा यूझर फ्रेंडली दृष्टीकोन मालमत्तांचा शोध घेण्याची प्रक्रिया व्यवस्थित करून बघणाऱ्याचा अनुभव अधिक चांगला करतो. त्यामुळे घर विकत किंवा भाड्याने घेण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी हा अनुभव नीटनेटका आणि रंजक होतो.

हाऊसिंग डॉटकॉमचे प्रॉडक्ट आणि डिझाईन प्रमुख श्री. संगीत अग्रवाल म्हणाले, “आम्हाला वाटते की, टेक्नॉलॉजीतील प्रगती आणि उपभोक्त्यांच्या बदलत्या वर्तनामुळे प्रॉपटेक क्षेत्रात मोठे बदल होत आहेत. हाऊसिंग डॉटकॉमची ‘हाऊसिंग स्टोरीज’ आणि ‘हाऊसिंग शॉर्ट्स’ सारखी इनोव्हेशन्स मालमत्ता शोधण्याची प्रक्रिया तर सुलभ करतातच शिवाय, यूझर्सना सोशल मीडिया ब्राऊझिंग करत असल्याप्रमाणे घरांचा शोध घेण्यास सक्षम करतात. याच्यामुळे आम्हाला ग्राहकांच्या प्राथमिकतांबाबत मौल्यवान माहिती समजते, ज्याचा उपयोग आम्हाला अधिक व्यक्तीविशिष्ट आणि आकर्षक अनुभव देणारी ऑफरिंग तयार करण्यासाठी होऊ शकतो.”

लॉन्च-पूर्व टप्प्यात ‘हाऊसिंग स्टोरीज’ स्वीकारणाऱ्यांची संख्या लक्षणीय होती. १००० पेक्षा जास्त ग्राहक या फीचरचा उपयोग करत होते तर १००,००० पेक्षा जास्त घर शोधणाऱ्या व्यक्ती या स्टोरीज सक्रियतेने बघत होत्या. या प्रारंभिक यशामुळे सर्च रिझल्ट्स पेजवरील मालमत्तांची विझिबिलिटी लक्षणीयरित्या वाढली आणि त्यामुळे विशिष्ट लोकेशन्समधील संभाव्य खरेदीदार नेमके टिपता आले.

याचा परिणाम म्हणून सहभागीता ३०% पेक्षा अधिक वाढली आणि त्यातून यूझर्स व मालमत्तांची यादी यांच्यातील कनेक्शन वाढवण्यातील या मंचांची कार्यक्षमता अधोरेखित झाली. तसेच यूझर इंटरॅक्शन आणखी वाढविण्याची या फीचरची सखोल क्षमता दिसून आली.

‘हाऊसिंग स्टोरीज’ आणि ‘हाऊसिंग शॉर्ट्स’ लॉन्च करून हाऊसिंग डॉटकॉमने कल्पकतेच्या आपल्या कक्षा आणखी विस्तृत केल्या आहेत आणि ग्राहकांना खिळवून ठेवण्यासाठी शॉर्ट-फॉर्म व्हिडिओ कंटेंटच्या वाढत्या लोकप्रियतेचा फायदा घेतला आहे. रियल इस्टेट विकासक आणि एजंट यांच्यासाठी खास बनवलेली विकण्याची आणि भाड्याने देण्याची प्रीमियम पॅकेज ऑफर करून हा मंच वेब आणि अॅपवर लोकांना आकर्षित करण्यासाठी दमदार प्रचार साधने प्रदान करतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button