भारत, ६ मार्च २०२६: एआयमुळे कामाच्या स्वरूपामध्ये बदल होत असताना जगातील सर्वात मोठे प्रोफेशनल नेटवर्क लिंक्डइन (LinkedIn)च्या संशोधनामधून निदर्शनास येते की, भारतातील महिला प्रोफेशनल्स एआयचा अवलंब करण्यामध्ये आघाडीवर असण्यासोबत एआय आत्मविश्वास व क्षमता निर्माण करण्यामध्ये पुरूषांच्या पुढे देखील जात आहेत.
लिंक्डइन डेटामधून निदर्शनास येते की, भारतातील १० पैकी ९ (९० टक्के) महिला प्रोफेशनल्स म्हणतात, त्या कामाच्या ठिकाणी आत्मविश्वासाने एआय टूल्सचा वापर करतात. तुलनेत हे प्रमाण पुरूषांमध्ये ८६ टक्के आहे. महिला त्यांच्या एआय क्षमता अधिक वाढवण्याबाबत देखील अधिक सक्रिय आहेत, जेथे ३५ टक्के महिला आपल्या रोजगार संधीमध्ये सुधारणा करण्यासाठी एआय कौशल्ये सक्रियपणे अवगत करत आहेत, तुलनेत हे प्रमाण पुरूषांमध्ये २९ टक्के आहे.
हा उत्साह कामाच्या ठिकाणाव्यतिरिक्त देखील दिसून येतो. उद्योजकांमध्ये, भारतातील महिला संस्थापिका (७८ टक्के) कंपनीच्या विकास दृष्टिकोनाबाबत पुरुषांच्या (६६ टक्के) तुलनेत अधिक आशावादी आहेत. अनेक महिला उद्योजिका आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी एआय-आधारित ऑटोमेशन, अधिक स्मार्ट कार्यपद्धती आणि डेटा-आधारित निर्णय प्रक्रियेला प्राधान्य देऊन आपल्या व्यवसायामध्ये डिजिटल परिवर्तन घडवून आणत आहेत.
लिंक्डइन करिअर तज्ञ व भारतातील वरिष्ठ व्यवस्थापकीय संपादिका निरजिता बॅनर्जी (Nirajita Banerjee, LinkedIn Career Expert and India Senior Managing Editor) म्हणाल्या, ”भारतातील श्रमजीवी महिला कामाच्या ठिकाणी आत्मविश्वासाने एआय टूल्सचा वापर करत असल्या तरी कामगार बाजारपेठेतील वास्तविक स्थिती अत्यंत चिंताजनक आहे. लिंक्डइन प्लॅटफॉर्मच्या डेटामधून निदर्शनास येते की, भारतात महिलांचा कर्मचारीवर्गामध्ये सहभाग अजूनही २८.१ टक्के इतका कमी आहे. ही तफावत दूर करण्यासाठी तंत्रज्ञान पुरेसे ठरणार नाही. पण, प्रेरणादायी बाब म्हणजे कर्मचारीवर्गामध्ये कार्यरत असलेल्या अनेक महिला सक्रियपणे एआय कौशल्ये आत्मसात करत आहेत आणि नवीन टूल्ससह प्रयोग करत आहेत. एआयमुळे दैनंदिन कामाचे स्वरूप बदलण्यासह रोजगार पदांना आकार मिळत असताना टेक्निकल क्षमतेसह मानवी कौशल्ये आत्मसात असलेल्या प्रोफेशनल्सना अधिक फायदा होईल. अधिकाधिक महिलांना या संधी उपलब्ध असण्यासोबत त्यामधून फायदा मिळण्याची खात्री घेणे कामाचे अधिक सर्वसमावेशक भवितव्य घडवण्यासाठी महत्त्वाचे असेल.”
प्रोफेशनल्स या सर्वसमावेशक क्षेत्रामधून जात असताना एआय आपल्या कामाचा शोध घेण्याच्या, संधी जाणून घेण्याच्या आणि आपल्या क्षमता दाखवण्याच्या पद्धतींना नवीन आकार देत आहे. कामाच्या पद्धतींमध्ये बदल करण्यासाठी एआयचा अवलंब करण्याकरिता लिंक्डइनच्या टिप्स पुढीलप्रमाणे:
● दैनंदिन कामे एआयवर सोपवा: डेटा प्रोसेसिंग आणि वारंवार कराव्या लागणाऱ्या कामांसाठी एआयचा वापर करा. यामुळे वाचलेला वेळ तुमच्यामधील मानवी कौशल्ये सिद्ध करण्यासाठी वापरा, अशी कामे जी एआय करू शकत नाही, जसे माहितीचे सखोल विश्लेषण करणे, धोरणात्मक निर्णय घेणे आणि सहानुभूतीने नेतृत्व करणे.
● एआयला तुमच्या शिक्षणाचे माध्यम बनवा: नवीन क्षेत्रे शोधण्यासाठी, नवीन संकल्पना त्वरित समजून घेण्यासाठी किंवा तुमच्यातील कौशल्यांची कमतरता ओळखण्यासाठी एआयचा वापर करा. लिंक्डइन लर्निंगच्या एआय-आधारित कोचिंग सारखे टूल्स तुमची भूमिका, ध्येये व कौशल्यांनुसार काय शिकावे यासंदर्भात मार्गदर्शन करतात, ज्यामुळे सुरुवात कुठून करावी हा संभ्रम दूर होतो.
● तुमच्यामधील मानवी कौशल्ये अधिक प्रभावी करा: एआयकडे तुमचा सहकारी म्हणून पहा, जो तुमच्यामधील क्षमता अधिक निपुण करेल. तुमच्या संकल्पनांची चाचणी घेण्यासाठी, नवनवीन उपाय शोधण्यासाठी किंवा परिणामांचा अंदाज घेण्यासाठी एआयचा वापर करा. एआयसोबत सहयोग तुमच्या तार्किक विचारांना उंचीवर घेऊन जाईल आणि तुमच्या संकल्पनांना डेटाचा प्रबळ आधार देऊन अधिक प्रभावी बनवेल.
● प्रॉम्प्ट देण्यामध्ये प्रभुत्व मिळवा: एआयचा उत्तमपणे वापर करणे ही काळाची गरज बनली आहे, पण खरी प्रगती एआयला योग्य दिशा देण्यामध्ये आहे. प्रभावी प्रॉम्प्ट्स तयार करण्यासाठी वेळ द्या. हे कौशल्य तुम्हाला हायब्रिड प्रोफेशनल बनवेल, ज्यामुळे कोणत्याही क्षेत्रात तुमचे महत्त्व अनन्यसाधारण असेल.
● फक्त कामासाठीच नाही, तर करिअरच्या प्रगतीसाठी एआय वापरा: एआयचा वापर फक्त ईमेल लिहिण्यापुरता मर्यादित ठेवू नका. तुमच्या व्यावसायिक भविष्याचे नियोजन करण्यासाठी एआयचा उपयोग करा. लिंक्डइनच्या एआय-आधारित जॉब सर्च (LinkedIn’s AI-powered Job Search) सारख्या टूल्सचा वापर करून, तुम्ही तुमची ध्येये व कौशल्यांनुसार योग्य रोजगार शोधू शकता आणि लिंक्डइनचे जॉब मॅच (Job Match) तुम्ही रोजगारासाठी किती पात्र आहात, याबाबत सांगेल.
एआय तुम्हाला तुमचे काम अधिक कार्यक्षमतेने करण्यास मदत करण्यासोबत संधी देखील उपलब्ध करून देते, ज्यामुळे तुम्ही तुमच्या भावी वाटचालीवर लक्ष केंद्रित करू शकता. बदलत्या काळाच्या प्रवाहाशी जुळवून घेणाऱ्या व्यावसायिक महिलेसाठी एआयचा स्वीकार करणे फक्त करिअरमधील फायद्यापुरते मर्यादित नाही तर इच्छित करिअर घडवण्याच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे.