- दोन तृतीयांश बी2बी मार्केटर्सना वाटते की जर त्यांनी व्हिडिओमध्ये गुंतवणूक केली नाही, तर ते स्पर्धेत मागे पडतील
- खरेदीदारांचा विश्वास जिंकण्यासाठी आणि त्यांच्या निर्णयांवर प्रभाव टाकण्यासाठी ठोस पाठबळ आणि प्रभावी रणनीती आवश्यक
- लिंक्डइनने आपल्या व्हिडिओ जाहिरात क्षमतेचा विस्तार केला आहे;– फर्स्ट इम्प्रेशन अॅड्स, रिझर्व्ह्ड अॅड्स आणि CTV अॅड्सच्या नव्या सुविधा B2B मार्केटर्सना गर्दीतून उठून दिसण्यासाठी आणि चांगले निकाल मिळवण्यासाठी मदत करतील
भारत, ४ जून २०२५: आजच्या अतिशय स्पर्धात्मक आणि गुंतागुंतीच्या बी2बी वातावरणात, लिंक्डइनच्या नव्या संशोधनातून समोर आले आहे की भारतातील 90% बी2बी मार्केटर्सना त्यांच्या कॅम्पेनद्वारे प्रेक्षकांचे लक्ष वेधणे ही सर्वात मोठी चिंता वाटते. त्यापैकी 62% मार्केटर्सना वाटते की स्पर्धेत टिकून राहण्यासाठी व्हिडिओमध्ये गुंतवणूक करणे अत्यावश्यक झाले आहे.
लिंक्डइनच्या ‘2025 बी2बी मार्केटर सेंटिमेंट रिसर्च’ या अभ्यासात भारतासह १३ देशांतील – ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, अमेरिका, युके, फ्रान्स, जर्मनी, नेदरलँड, स्पेन, इटली, स्वीडन, ब्राझील आणि यूएई – ३००० हून अधिक बी2बी मार्केटर्सचा सर्व्हे करण्यात आला. या संशोधनातून समोर आले की भारतातील 80% बी2बी मार्केटर्सना वाटते की आजच्या वाढत्या स्पर्धेच्या काळात स्वतःला वेगळे सिद्ध करण्यासाठी सर्जनशील रणनीतींमध्ये गुंतवणूक करणे अत्यावश्यक आहे.
तरीही, सर्जनशीलतेला अद्याप बोर्डरूममध्ये पूर्ण मान्यता मिळालेली नाही. वरिष्ठ मार्केटिंग लीडर्सना वाटते की सर्जनशील कल्पना आणि व्हिडिओ खरेदीशी संबंधित निर्णयांवर परिणाम करू शकतात. मात्र, 72% सीएमओ आणि व्हीपी म्हणतात की त्यांचे नेतृत्व जोखमींपासून दूर राहण्याच्या मानसिकतेत आहे आणि त्यामुळे ते नवे प्रयोग करण्याऐवजी पारंपरिक मार्गांवरच अवलंबून राहतात.
बी2बीमध्ये व्हिडिओ आणि इन्फ्लुएंसर मार्केटिंग: थेट विक्रीसाठी सर्वाधिक प्रभावी रणनीती
मर्यादित संसाधनांमध्ये अधिक कार्य करण्याचा दबाव आणि आर्थिक निकाल दाखवण्याची गरज यामध्ये, भारतातील 97% बी2बी मार्केटर्सना वाटते की सध्याच्या परिस्थितीत व्हिडिओ आणि इन्फ्लुएंसर मार्केटिंग थेट विक्री मिळवण्यासाठी सर्वोत्तम साधने आहेत.
बी2बी मार्केटिंगमध्ये शॉर्ट-फॉर्म व्हिडिओ प्रेक्षकांचा विश्वास निर्माण (82%) आणि निर्णय घेणाऱ्या व्यक्तींना पोहोचण्यात (82%) मदत करत आहे. त्याचबरोबर, शॉर्ट-फॉर्म इन्फ्लुएंसर व्हिडिओ कंटेंट हे मार्केटर्ससाठी सर्वोच्च गुंतवणूक प्राधान्य ठरत आहे.
संशोधनातून हेही स्पष्ट झाले आहे की बी2बी मार्केटर्ससाठी एक प्रामाणिक आणि विश्वासार्ह ब्रँड तयार करणे हे सर्वोच्च प्राधान्य झाले असून, यासाठी इन्फ्लुएंसर व क्रिएटर्ससोबत भागीदारी महत्त्वाची भूमिका बजावू शकते. भारतातील 72% बी2बी मार्केटर्सना वाटते की आजच्या घडीला इन्फ्लुएंसर व क्रिएटर्सच्या सहकार्याशिवाय त्यांची मार्केटिंग रणनीती अपूर्ण आहे. त्याचबरोबर 84% जणांना खात्री आहे की वर्षाच्या अखेरीस इन्फ्लुएंसर मार्केटिंग कॅम्पेन थेट विक्री वाढवण्यात मदत करतील.
बी2बी खरेदी प्रक्रिया अधिकाधिक गुंतागुंतीची होत चालली आहे. फॉरेस्टरच्या ‘2025 बी2बी मार्केटिंग अँड सेल्स प्रेडिक्शन्स’ अहवालानुसार, तरुण बी2बी खरेदीदार आता खरेदीसंदर्भातील निर्णय घेताना 10 किंवा त्याहून अधिक बाह्य प्रभावांचा — जसे सोशल मीडिया किंवा सहकाऱ्यांचे नेटवर्क — आधार घेत आहेत.
लिंक्डइन मार्केटिंग सोल्यूशन्स इंडिया चे डायरेक्टर, सचिन शर्मा म्हणतात: “जेव्हा प्रेक्षकांचे लक्ष काही सेकंदात विचलित होते आणि स्पर्धा सातत्याने वाढते आहे, तेव्हा बी2बी मार्केटर्सना केवळ सर्जनशील गोष्टी पुरेशा नसतात. त्यांना अशा प्रकारचा कंटेंट हवा असतो जो लक्ष वेधतो, विश्वास निर्माण करतो आणि कृती करण्यास प्रेरित करतो. सध्या सोशल मीडिया व्हिडिओंना प्रभावी आणि विश्वासार्ह आवाजांसोबत जोडण्याची मोठी संधी आहे. ज्यामुळे अनावश्यक स्क्रोलिंग एका अर्थपूर्ण व्हिज्युअल अनुभवात रूपांतरित होईल आणि शेवटी खरेदी निर्णयापर्यंत पोहोचेल. लिंक्डइनचे नवीन व्हिडिओ सोल्यूशन्स ह्याच दिशेने तयार करण्यात आले आहेत — जेणेकरून मार्केटर्स गर्दीतून उठून दिसू शकतील, आणि त्यांचा ब्रँड विश्वासार्हतेसह जोडता येईल.”
लिंक्डइनने व्हिडिओ जाहिरात क्षमतांचा विस्तार केला; ‘फर्स्ट इम्प्रेशन अॅड्स‘, ‘रिझर्व्ह्ड अॅड्स‘ आणि CTV अॅड्सची नवी रेंज सादर
लिंक्डइनने आज काही महत्त्वाचे अपडेट्स जाहीर केले आहेत, ज्यामुळे मार्केटर्ससाठी व्हिडिओच्या माध्यमातून नवकल्पना सुलभ होतील. त्यात समाविष्ट आहेत:
फर्स्ट इम्प्रेशन अॅड्स:
भारतातील 77% बी2बी मार्केटर्सना वाटते की एखाद्या कॅम्पेनचा पहिला दिवस सर्वाधिक प्रभावी असतो. ह्याच विचारातून लिंक्डइनने ‘फर्स्ट इम्प्रेशन अॅड्स’ हे पूर्ण स्क्रीन, व्हर्टिकल व्हिडिओ फॉर्मॅट सुरू केले आहे, जे फक्त एका दिवसाच्या कॅम्पेनसाठी असते. हे ब्रँडला जास्तीत जास्त दृश्यमानता देण्यास मदत करते, विशेषतः जेव्हा मोठ्या मार्केटिंग मोसमी संधी असतात.
रिझर्व्ह्ड अॅड्स:
जर एखादा ब्रँड कॅम्पेनच्या पहिल्या दिवशी न थांबता पुढेही लीड राखू इच्छित असेल, तर ‘रिझर्व्ह्ड अॅड्स’च्या माध्यमातून तो प्रेक्षकांच्या फीडमध्ये वरच्या भागात (पहिल्या जाहिरातीसारखा) दिसेल. हे अशा प्रकारे आहे जसे कॉन्सर्टमध्ये फ्रंट-रो सीट घेणे – जिथे दृश्यमानता, लक्ष आणि आवाजाचा वाटा सर्वाधिक मिळतो.
CTV अॅड्सची वाढलेली क्षमता:
गेल्या वर्षी लॉन्च झाल्यापासून, CTV अॅड्स पारंपरिक टीव्हीच्या तुलनेत बी2बी प्रेक्षकांपर्यंत चारपट अधिक प्रभावीपणे पोहोचत आहेत (iSpot नुसार). आता ही अॅड्स अमेरिका आणि कॅनडातील खरेदीदारांना टार्गेट करण्यासाठी जागतिक ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत.
नवीन इंटिग्रेशनमुळे वापर अधिक सुलभ
भारतातील 76% बी2बी मार्केटर्स सांगतात की CTV अॅड्समुळे ते अधिक सातत्याने ग्राहकांशी संपर्क साधू शकतात. आता Innovid आणि Sprinklr सोबतच्या नव्या इंटिग्रेशनद्वारे, लिंक्डइन कॅम्पेन डिझाईन, व्यवस्थापन आणि योग्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचणे अधिक सुलभ करत आहे.
उपलब्धता:
CTV अॅड्स सध्या संपूर्ण जगभरातील ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत — जे अमेरिका आणि कॅनडातील प्रेक्षकांना लक्ष करत आहेत. तर, ‘फर्स्ट इम्प्रेशन अॅड्स’ आणि ‘रिझर्व्ह्ड अॅड्स’ वर्षाअखेरीस जागतिक स्तरावर उपलब्ध होतील.