सेफर इंटरनेट इंडिया आणि मेटाने ऑनलाइन फसवणूक व घोटाळ्यांचा सामना करण्‍यासाठी सहयोग केला

News Service

राष्‍ट्रीय, 31 जुलै २०२५ – मेटाने तंत्रज्ञान उद्योग संघटना सेफर इंटरनेट इंडियासोबत सहयोगाने क्रिएटर-संचालित जागरूकता उपक्रमाची घोषणा केली आहे. ऑनलाइन फसवणूक आणि घोटाळ्यांच्या वाढत्या धोक्याला प्रतिसाद म्हणून वापरकर्त्यांची सुरक्षितता वाढवण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्‍यात आला आहे. या उपक्रमामध्‍ये क्रिएटर्ससाठी क्षमता-निर्माण व विचारविनियम करणाऱ्या कार्यशाळांचा समावेश असेल, तसेच त्‍यांना नवनवीन घोटाळे ओळखण्‍यासाठी आवश्‍यक कौशल्‍यांसह सक्षम करण्‍यात येईल, मेटा प्‍लॅटफॉर्म्‍समधील डिजिटल सुरक्षा साधने दाखवण्‍यात येतील आणि लक्षवेधक कन्‍टेन्‍ट निर्माण करण्‍यात येईल, जे प्रेक्षकांना घोटाळ्यांना प्रतिबंध करण्‍याबाबत शिक्षित करतील.

मेटाच्या पाठिंब्याने सेफर इंटरनेट इंडियाने नुकतेच ‘क्रिएटर्स फॉर ऑनलाइन ट्रस्ट’ या क्रिएटर-केंद्रित उद्योग कार्यक्रमाचे आयोजन केले होते, ज्यामध्ये डिजिटल क्रिएटर्स, तंत्रज्ञान कंपन्या आणि सार्वजनिक क्षेत्रातील भागधारक एकत्र आले. त्‍यांनी उद्योगाबाबत बहुमूल्‍य माहिती शेअर केली आणि क्षेत्राशी संबंधित केस स्‍टडीजबाबत चर्चा केली. या कार्यक्रमात परस्परसंवादी गोलमेज चर्चा झाली, जेथे सहभागींनी घोटाळ्यांना तोंड देण्यासाठी आणि वापरकर्त्यांमध्ये माहितीपूर्ण डिजिटल वर्तनाला चालना देण्‍यासाठी विश्वसनीय ऑनलाइन आवाजांच्‍या महत्त्वपूर्ण भूमिकेचे परीक्षण केले.

या लाँच कार्यक्रमाप्रसंगी मत व्‍यक्‍त करत मेटामधील काऊंटर फ्रॉडचे जागतिक प्रमुख आणि सिक्‍युरिटी पॉलिसीचे संचालक नॅथनियल ग्‍लेचर म्‍हणाले, ”मेटामध्‍ये आम्‍हाला माहित आहे की, फसवणूका व घोटाळ्यांचा सामना करण्‍याासाठी उद्योगामध्‍ये कृती व सतत माहितीची गरज आहे आणि वापरकर्त्‍यांमध्‍ये याबाबत जागरूकतेचा प्रसार करणे सुरक्षित ऑनलाइन वातावरणाला चालना देण्‍यासाठी महत्त्वाचे आहे. सेफर इंटरनेट इंडियासोबत सहयोगाने आम्‍ही क्रिएटर्सना डिजिटल सुरक्षेबाबत चर्चांमध्‍ये अग्रस्‍थानी राहण्‍यास सक्षम करू इच्छितो. त्‍यांना सर्वसमावेशक साधने, माहिती आणि पाठिंबा देत आम्‍ही सहयोगात्‍मक परिसंस्‍था निर्माण करण्‍याचा प्रयत्‍न करतो, जेथे क्रिएटर्स वापरकर्त्‍यांना घोटाळे ओळखून त्‍यावर प्रतिबंध करण्‍यास शिक्षित करतील, तसेच ग्राहक वर्तणूकींमध्‍ये सुधारणा करतील, ज्‍यामध्ये सुरक्षित व माहितीपूर्ण डिजिटल वर्तनाचा समावेश आहे.”

सेफर इंटरनेट इंडियाचे को-कन्‍व्‍हेनर बर्गेस मालू म्‍हणाले, ”आम्‍हाला क्रिएटर परिसंस्‍थेला प्राधान्य देत हा अर्थपूर्ण उपक्रम सुरू करण्‍याचा आनंद होत आहे. लोकप्रिय ऑनलाइन वॉईसेस् सुरक्षिततेबाबत गुंतागूंतीची माहिती सोपी करत प्रामाणिकपणे सादर करण्‍यास उत्तमरित्‍या सज्‍ज आहेत. ही मोहिम डिजिटली सुरक्षित भारत घडवण्‍याच्‍या आमच्‍या व्‍यापक ध्‍येयामधील महत्त्‍वपूर्ण टप्‍पा आहे, जेथे प्रत्‍येक वापरकर्त्‍याना सक्षम व माहितीपूर्ण असल्‍यासारखे वाटेल.”

मेटाने अनोख्‍या स्‍वरूपात डिजिटल सुरक्षिततेबाबत सूचना देण्‍यासाठी विविध क्रिएटर्ससोबत सहयोगाने नुकतेच अॅण्‍टी-स्‍कॅम मोहिमेची दुसरी आवृत्ती ‘स्‍कॅम से बचो २.०’ लाँच केली. ही मोहिम मुंबईतील काही प्रख्‍यात रस्‍त्‍यांवर सार्वजनिक ठिकाणी घोटाळ्यांबाबत जागरूकता निर्माण करते, जेथे सांस्‍कृतिकदृष्‍ट्या संबंधित व व्हिज्‍युअली प्रभावी कथानकाचा वापर करत लोकांना बनावट कर्ज घोटाळे, तोतयागिरी आणि ओटीपी फसवणूक यांसारख्या सामान्य ऑनलाइन घोटाळ्यांबद्दल माहिती देते.

सेफर इंटरनेट इंडिया ही जवळपास दोन डझन व्यवसायांची संघटना आहे, जी अर्धा अब्जाहून अधिक भारतीय ग्राहकांपर्यंत पोहोचते. भारतीय डिजिटल अर्थव्यवस्थेत वापरकर्त्यांच्या कल्याणाला प्रोत्साहन देणे आणि त्या बदल्यात नवोपक्रम-नेतृत्वांतर्गत वाढ करणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे. या संघटनेमध्ये विशेष व बहुउद्देशीय डिजिटल सेवा, दूरसंचार व इंटरनेट प्रदाते, फिनटेक कंपन्या आणि ऑनलाइन विश्वास व सुरक्षिततेशी संबंधित इतर विशेष संस्थांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button