- नवीन तंत्रज्ञान अपग्रेडमध्ये कलर टीएफटी स्क्रिनसह टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशनचा समावेश आहे.
- ३ नवीन आकर्षक रंगांमध्ये उपालब्ध – आइस स्टॉर्म, विविड व्हायोलेट मेटलिक आणि मेटलिक सिल्व्हर सियान
१ ऑगस्ट २०२५: इंडिया यामाहा मोटर (आयवायएम) प्रा. लि.ने आपल्या लोकप्रिय ‘द कॉल ऑफ द ब्ल्यू’ ब्रँड मोहिमेअंतर्गत भारतात नवीन 2025 Yamaha MT-15 Version 2.0 च्या लाँचची घोषणा केली आहे. ही मोटरसायकल दोन व्हेरिएण्ट्समध्ये आणि 1.69 लाख रूपये (एक्स-शोरूम, दिल्ली) सुरूवातीच्या किमतीत उपलब्ध असेल.

2025 MT-15 Version 2 DLX मध्ये लक्षणीय तंत्रज्ञान अपग्रेड करण्यात आले आहे, तसेच या मोटरसायकलमध्ये समाविष्ट करण्यात आलेला कलर टीएफटी डिस्प्ले टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन देतो. राइडर्सना यामाहाच्या वाय-कनेक्ट मोबाइल अॅपच्या माध्यमातून ब्ल्यूटूथ कनेक्टीव्हीटी वैशिष्ट्यामधून फायदा मिळेल, जे MT-15 नवीन मध्ये अपग्रेड करण्यात आले आहे. या अॅपच्या माध्यमातून अनेक वैशिष्ट्ये सहजपणे उपलब्ध होतात, जसे मेन्टेनन्स शिफारसी, पार्किंग लोकेशन, इंधन वापर, बिघाडासंदर्भात अलर्टस्, रेव्ह डॅशबोर्ड आणि अद्वितीय राइडर रँकिंग सिस्टम.
आकर्षकतेमध्ये अधिक भर करत नवीन MT-15 Version 2 DLX दोन नवीन उत्साही व अर्बन कलर पर्यायांमध्ये येते – आइस स्टॉर्म, जागतिक स्तरावर लोकप्रिय एमटी सिरीज शेड, जी आता भारतात पदार्पण करत आहे आणि विविड व्हायोलेट मेटलिकसह विद्यमान मेटलिक ब्लॅक. प्रमाणित व्हेरिएण्टला आकर्षक नवीन मेटलिक सिल्व्हर सियान रंगामध्ये सादर करण्यात आले आहे, ज्यामुळे एमटीची रस्त्यावरील गतीशील व आक्रमक उपस्थिती अधिक दृढ झाली आहे.
या लाँचबाबत मत व्यक्त करत यामाहा मोटर इंडिया ग्रुप ऑफ कंपीनजचे अध्यक्ष श्री. इतारू ओतानी म्हणाले, ”MT-15 Version 2.0 ने गतीशील स्टायलिंग, कार्यक्षमता-केंद्रित अभियांत्रिकी आणि दैनंदिन वैविध्यतेसह स्ट्रीट-नेक्ड सेगमेंटमध्ये प्रबळ ओळख निर्माण केली आहे. आम्ही लोकप्रिय R15M मध्ये टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन वैशिष्ट्य असलेला कलर टीएफटी डिस्प्ले सादर केल्यापासून अशाच सुधारणांसाठी MT-15 च्या ग्राहकांकडून सतत मागणी मिळाली आहे. २०२५ व्हर्जनमधील अपडेटमधून या अपेक्षांची पूर्तता करण्याप्रती आमची कटिबद्धता दिसून येते, जेथे या मोटरसायकलमधील प्रगत वैशिष्ट्ये आणि नवीन उत्साहवर्धक रंग आकर्षकता व राइडर सहभाग वाढवतात. या अपडेट्ससह यामाहा साहसी राइड व व्यावहारिकतेचे संतुलन शोधणाऱ्या तरूण, गतीशील राइडर्सशी संलग्न होणाऱ्या मोटरसायकल्स वितरित करत आहे.”
कार्यक्षमता व दैनंदिन व्यावहारिकतेच्या संतुलनाची मागणी करणाऱ्या राइडर्ससाठी डिझाइन करण्यात आलेल्या 2025 MT-15 Version 2.0 मध्ये लिक्विड-कूल्ड, १५५ सीसी फ्यूएल-इंजेक्टेड इंजिनसह व्हेरिएबल व्हॉल्व्ह अॅक्च्यूएशन (व्हीव्हीए) आहे. हे इंजिन १०,००० आरपीएममध्ये १८.४ पीएस शक्ती आणि ७,५०० आरपीएममध्ये १४.१ एनएम टॉर्कची निर्मिती करते. ६-स्पीड गिअरबॉक्ससह असिस्ट अँड स्लिपर क्लच सहजपणे गिअर शिफ्ट होण्याची खात्री देते आणि जलदपणे गिअर डाऊनशिफ्ट करताना व्हील हॉप कमी करते. ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम विविध रस्त्यांवर राइडरला आत्मविश्वासाने राइडिंगचा आनंद घेण्यास मदत करते.
या मोटरसायकलच्या शक्तिशाली स्ट्रीटफाइटर दर्जाला मोटोजीपी-प्रेरित अॅल्युमिनिअम स्विंगआर्मचे पाठबळ आहे, जे विशेषत: रस्त्यावरील कोपऱ्यांवर व ब्रेकिंगदरम्यान स्थिरता व हाताळणीची खात्री देते. या मोटरसायकलमध्येपेटेण्टेड बॉक्स फ्रेम आहे आणि मोटरसायकलचे वजन १४१ किग्रॅ आहे, ज्यामुळे गतीशीलतेसह सहज नियंत्रणाची खात्री मिळते. या नवीन अपग्रेडसह Yamaha MT-15 Version 2.0 स्ट्रीट-नेक्ड श्रेणीच्या मर्यादांना दूर करत आहे. या मोटरसायकलमध्ये कार्यक्षमता, तंत्रज्ञान व स्टाइलचे सर्वोत्तम संयोजन आहे, ज्यामधून ‘द कॉल ऑफ द ब्ल्यू’चा उत्साह दिसून येतो.
किमती (एक्स-शोरूम, दिल्ली)
MT-15 Version 2.0 STD INR 1,69,550
MT-15 Version 2.0 DLX INR 1,80,500