नवीन फोल्‍डेबल्‍सनी ग्राहकांचे लक्ष वेधून घेतले असताना सॅमसंगचे जेबी पर्क म्‍हणाले, ‘भारत धोरणात्‍मक बाजारपेठ आहे’

News Service

भारत – ऑगस्‍ट ५, २०२५: सॅमसंगचे सातव्‍या पिढीमधील फोल्‍डेबल स्‍मार्टफोन्‍स – गॅलॅक्‍सी झेड फोल्‍ड७, झेड फ्लिप७ आणि झेड फ्लिप७ एफई यांना भारतात अनपेक्षित मागणी दिसण्‍यात आली आहे आणि निवडक बाजारपेठांमध्‍ये या स्‍मार्टफोन्सचा साठा संपला आहे, असे कंपनीने सांगितले. सॅमसंगला ९ जुलै २०२५ रोजी गॅलॅक्‍सी झेड फोल्‍ड७, झेड फ्लिप७ आणि झेड फ्लिप७ एफई लाँच झाल्‍यापासून पहिल्‍या ४८ तासांमध्‍ये या स्‍मार्टफोन्‍ससाठी २.१ लाखांहून अधिक प्री-ऑर्डर्स मिळाल्‍या.

या शानदार विक्रीच्या पार्श्वभूमीवर, सॅमसंग साउथवेस्ट आशियाचे अध्यक्ष आणि मुख्‍य कार्यकारी अधिकारी जेबी पर्क म्हणाले की, भारत प्रचंड क्षमता असलेली महत्त्वाची धोरणात्मक बाजारपेठ आहे आणि सॅमसंगच्या जागतिक भविष्यातील महत्त्वाचा आधारस्तंभ आहे.

”सॅमसंगला भारतातील विकासगतीबाबत आशा आहे, ज्‍याला मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया यांसारखे सरकारी उपक्रम आणि प्रबळ डिजिटल परिसंस्‍थेचे पाठबळ आहे. सॅमसंग भारताच्‍या स्‍वावलंबी अर्थव्‍यवस्‍थेच्‍या दृष्टिकोनाशी सुसंगत राहत नाविन्‍यता, उत्‍पादन आणि स्‍थानिक मूल्‍य वाढीमध्‍ये गुंतवणूक करत आहे,” असे पर्क म्‍हणाले.

नवीन फोल्‍डेबल स्‍मार्टफोन्‍स – गॅलॅक्‍सी झेड फोल्‍ड७, गॅलॅक्‍सी झेड फ्लिप७ आणि गॅलॅक्‍सी झेड फ्लिप७ एफई हे सॅमसंगच्‍या नोएडामधील कारखान्‍यामध्‍ये उत्‍पादित केले जात आहेत. बेंगळुरूमध्‍ये सॅमसंगच्‍या आरअँडडी केंद्रामध्‍ये काम करणाऱ्या भारतीय अभियंत्यांनी या नवीन फोल्‍डेबल्‍सच्‍या विकासामध्‍ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे, असे कंपनीने सांगितले

”सॅमसंगची भारताप्रती दीर्घकालीन कटिबद्धता अविरत आहे, जेथे आम्‍ही देशाकडे आमच्‍या जागतिक धोरणाचा आधारस्‍तंभ म्‍हणून पाहतो. दोन उत्‍पादन प्‍लांट्स, तीन आरअँडडी केंद्रे आणि डिझाइन केंद्रासह सॅमसंग इंडिया स्‍थानिक मागणी आणि जागतिक बाजारपेठांच्‍या गरजांची पूर्तता करण्‍यामध्‍ये महत्त्वाची भूमिका बजावते,” असे पर्क पुढे म्‍हणाले.

सॅमसंगच्‍या फोल्‍डेबल्‍ससह उत्क्रांती प्रवासाबाबत पर्क म्‍हणाले, डिवाईसेसचा आकार लहान करण्‍याची संकल्‍पना आहे.

”आम्‍ही ५-इंच स्‍मार्टफोन डिझाइन केला तेव्‍हा आम्‍हाला वाटले की आमचा सर्वात मोठा व सर्वोत्तम स्‍मार्टफोन आहे. आता, स्क्रिनचा आकार ६.९ इंचापर्यंत वाढवण्‍यात आला आहे आणि अधिकाधिक मोठे होत आहे. काही स्‍मार्टफोन्‍स खिशामध्‍ये मावत नाहीत, तसेच ते धरायलाही कठीण जातात. म्‍हणून आम्‍ही या स्‍मार्टफोन्‍सचा आकार कशाप्रकारे लहान करू शकतो याचा विचार करण्‍यास सुरूवात केली. त्‍यामधूनच आम्‍ही या स्‍मार्टफोन्‍सना फ्लिप किंवा फोल्‍ड करण्‍याचे ठरवले. माझ्या मते, हा ट्रेण्‍ड आहे, ज्‍याचे इतर ब्रँड्स अनुकरण करतील,” असे पर्क म्‍हणाले.

गॅलॅक्‍सी झेड फोल्‍ड७ आणि झेड फ्लिप७ मोठ्या डिस्‍प्‍लेसह येतात आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्‍स वैशिष्‍ट्यांचा अनुभव घेण्‍यासाठी सर्वोत्तम मोबाइल डिवाईसेस आहेत, असे पर्क म्‍हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button