सॅमसंगकडून भारतात गॅलॅक्‍सी झेड फ्लिप७ आणि झेड फ्लिप७ एफईवर आकर्षक ऑफर्सची घोषणा

News Service

भारत – ऑगस्‍ट ११, २०२५ – सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रँडने आज नुकतेच लाँच करण्‍यात आलेले गॅलॅक्‍सी झेड फ्लिप७ व झेड फ्लिप७ एफई या स्‍मार्टफोन्‍सवर मर्यादित कालावधीसाठी आकर्षक ऑफर्सची घोषणा केली. या नवीन ऑफर्स, जवळपास १२००० रूपयांची बँक कॅशबॅक किंवा अपग्रेड बोनससह गॅलॅक्‍सी झेड फ्लिप७ फक्‍त ९७,९९९ रूपयांमध्‍ये उपलब्‍ध असेल. तसेच, गॅलॅक्‍सी झेड फ्लिप७ एफई फक्‍त ८५,९९९ रूपयांमध्‍ये उपलब्‍ध असेल, जेथे जवळपास १०,०००० रूपयांची बँक कॅशबॅक किंवा अपग्रेड बोनस आहे.

गॅलॅक्‍सी झेड फ्लिप७ व झेड फ्लिप७ एफई खरेदी करण्‍याची इच्‍छा असलेल्‍या ग्राहकांसाठी डिल अधिक उत्‍साहित करण्‍यासाठी बँक कॅशबॅक आणि अपग्रेड बोनस ऑफर्ससोबत २४ महिन्‍यांचा नो-कॉस्‍ट ईएमआय पर्याय देखील मिळू शकतो.

सॅमसंगच्‍या सातव्‍या पिढीतील फोल्‍डेबल स्‍मार्टफोन्‍सना भारतात अनपेक्षित मागणी मिळाली आहे, जेथे कंपनीने जुलै २०२५ मध्‍ये गॅलॅक्‍सी झेड फ्लिप७ व झेड फ्लिप७ एफई लाँच केल्‍यापासून पहिल्‍या ४८ तासांमध्‍ये या स्‍मार्टफोन्‍ससाठी २.१ लाखांहून अधिक प्री-ऑर्डर्सची नोंद केली आहे.

गॅलॅक्‍सी झेड फ्लिप७ मल्‍टीमोडल क्षमता असलेला सुसंगत एआय फोन आहे, ज्‍यामध्‍ये नवीन फ्लेक्‍सविंडो आहे. हा स्‍मार्टफोन सहजपणे खिशामध्‍ये मावतो, पण सक्षम असून उत्तमरित्‍या साह्य करतो. या स्‍मार्टफोनमध्‍ये गॅलॅक्‍सी एआयसह नवीन एज-टू-एज फ्लेक्‍सविंडो, प्रमुख स्‍तरीय कॅमेरा आणि अत्‍यंत सुसंगत व प्रख्‍यात डिझाइन आहे. सर्वोत्तम वॉइस एआयपासून सर्वोत्तम सेल्‍फी क्षमतांपर्यंत गॅलॅक्‍सी झेड फ्लिप७ खिशाला परवडणारा सर्वोत्तम सोबती आहे, जो विनासायास परस्‍परसंवाद आणि दैनंदिन विश्वसनीयतेसाठी डिझाइन करण्‍यात आला आहे. फक्‍त १८८ ग्रॅम वजन आणि फोल्‍ड केला असताना जाडी फक्‍त १३.७ मिमी असलेला गॅलॅक्‍सी झेड फ्लिप७ आतापर्यंतचा सर्वात स्लिम गॅलॅक्‍सी झेड फ्लिप आहे.

गॅलॅक्‍सी झेड फ्लिप७ मध्‍ये आकर्षक फ्लेक्‍सविंडो डिस्‍प्‍ले आहे, जो आवश्‍यक गोष्‍टींना पुढे आणतो आणि त्‍वरित मेसेज टाइप करण्‍याची सुविधा देतो. ४.१-इंच सुपर एएमओएलईडी फ्लेक्‍सविंडो आतापर्यंत गॅलॅक्‍सी झेड फ्लिप७ मधील सर्वात मोठी आहे, तसेच एज-टू-एज उपयुक्‍तता वापरकर्त्‍यांना कव्‍हर स्क्रिनवर चित्रे पाहण्‍याची आणि टास्‍क करण्‍याची सुविधा देते. २,६०० नीट्स सर्वोच्‍च ब्राइटनेस असलेल्‍या फ्लेक्‍सविंडोला व्हिजन बूस्‍टरसह अपग्रेड करण्‍यात आले आहे, ज्‍यामुळे सूर्यप्रकाशात देखील स्क्रिनवरील चित्र सुस्‍पष्‍टपणे दिसते आणि वापरकर्ते कुठेही कनेक्‍टेड राहू शकतात. मुख्‍य डिस्‍प्‍ले ६.९-इंच डायनॅमिक एएमओएलईडी २X आहे, जे अत्‍यंत सुलभ, सर्वोत्तम अनुभवासाठी डिझाइन करण्‍यात आले आहे.
गॅलॅक्‍क्‍सी झेड फ्लिप७ च्‍या कव्‍हर आणि मागील बाजूचे कॉर्निंग® गोरिला® ग्‍लास व्हिक्‍टस® २ द्वारे संरक्षण करण्‍यात आले आहे. आर्मर फ्लेक्‍सहिंज मागील जनरेशनवरील हिंजच्‍या तुलनेत सडपातळ आहे आणि सहजपणे फोल्‍ड करता येण्‍यासाठी, तसेच दीर्घकाळपर्यंत टिकाऊपणासाठी पुन्‍हा रचण्‍यात आलेली डिझाइन आणि अत्‍यंत शक्तिशाली साहित्‍य आहेत. शक्तिशाली आर्मर अॅल्‍युमिनिअम फ्रेम स्थिरतेसाठी बाहेरून मजबूती देते. ४,३०० एमएएच बॅटरी गॅलॅक्‍सी झेड फ्लिपवरील आतापर्यंतची सर्वात मोठी आहे, जी सिंगल चार्जमध्‍ये जवळपास ३१ तासांपर्यंत व्हिडिओ प्‍ले टाइम देते.

गॅलॅक्‍सी झेड फ्लिप७ एफईमध्‍ये ६.७-इंच मेन डिस्‍प्‍ले आहे, जो सर्वोत्तम व्‍युइंग अनुभव देतो. ५० मेगापिक्‍सल फ्लेक्‍सकॅम फ्लेक्‍स मोडमध्‍ये उच्‍च दर्जाच्‍या सेल्‍फीज व व्हिडिओ देतो, ज्‍यामुळे डिवाईस ओपन करण्‍याची गरज न भासता वापरकर्ते हँड्स-फ्री कन्‍टेन्‍ट कॅप्‍चर करू शकतात.

गॅलॅक्‍सी झेड फ्लिप७ ब्‍ल्‍यू शॅडो, जेट ब्‍लॅक व कोरल रेड या तीन आकर्षक रंगांमध्‍ये येतो. गॅलॅक्‍सी झेड फ्लिप७ एफई ब्‍लॅक व व्‍हाइट या रंगांमध्‍ये येतो.
उत्‍पादन किंमत प्रभावी किमतीसह मर्यादित कालावधीसाठी ऑफर्स नो कॉस्‍ट ईएमआय
गॅलॅक्‍सी झेड फ्लिप७ १०९९९९ रूपये ९७९९९ रूपये (१२००० रूपये अपग्रेड बोनस किंवा १२००० रूपयांची बँक कॅशबॅक) जवळपास २४ महिन्‍यांसाठी
गॅलॅक्‍सी झेड फ्लिप७ एफई ९५९९९ रूपये ८५९९९ रूपये
(१०००० रूपये अपग्रेड बोनस किंवा १०००० रूपयांची बँक कॅशबॅक) जवळपास २४ महिन्‍यांसाठी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button