सुपरस्टार नागार्जुन, श्रुती हासन आणि गायिका सुबलाक्षिणी यांच्या उपस्थितीत, टीमने बहुप्रतिक्षित रजनीकांत अभिनीत चित्रपटाच्या संगीताचा उत्सव साजरा केला

मुंबई, ११ ऑगस्ट २०२५ – सोमवारी, स्पॉटिफाय इंडियाने मुंबईतील चाहत्यांसाठी एक खास कार्यक्रम आयोजित केला, ज्यात आगामी चित्रपट ‘कूली – द पावरहाउस’च्या बहुप्रतिक्षित संगीताचा उत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात चित्रपटातील कलाकार आणि संगीत टीम एकत्र आली, जिथे संवाद आणि जोशपूर्ण साउंडट्रॅकच्या लोकार्पणासह एक खास संध्याकाळ रंगली.
चित्रपटाच्या १४ ऑगस्ट रोजी होणाऱ्या प्रदर्शना आधी, शानदार कलाकार मंडळींमध्ये नागार्जुन आणि श्रुती हासन यांनी मंचावर येऊन स्पॉटिफाय प्रीमियम चाहत्यांशी, मीडियाशी आणि इन्फ्लुएन्सर्सशी संवाद साधला, कथा सांगितल्या आणि चित्रपटाच्या संगीताचा आणि कथानकाचा दुवा कसा आहे याबद्दल चर्चा केली. नागार्जुन यांनी पहिल्यांदाच खलनायकाची भूमिका साकारताना आलेल्या रोमांचाबद्दल सांगितले, तर श्रुती यांनी सुपरस्टार रजनीकांतसोबत काम करण्याचा अविस्मरणीय अनुभव शेअर केला.

श्रोत्यांना अनिरुद्ध रविचंदर आणि सुबलाक्षिणी यांच्या जबरदस्त थेट सादरीकरणाचा आनंदही घेता आला. संगीतकाराने अल्बममधील अनेक गाणी सादर केली, ज्यामध्ये “पावरहाउस”चे अधिकृत गाणे, “चिकितु”, “मोनिका” आणि इतर हिट गाणी होती.
अल्बम ऐका, फक्त स्पॉटिफायवर.