- राज्य शासन आणि संपर्क फाऊंडेशनच्या भागीदारीतून २१७ महापालिका शाळांसाठी एक आगळावेगळा अध्ययन उपक्रम. त्यातून ३०७८ विद्यार्थी आणि ४३४ शिक्षकांना लाभ होणार
- ‘स्मार्ट स्कूल- स्मार्ट ब्लॉक’ मधून विद्यार्थ्यांसाठी मनोरंजक, अभ्यासक्रमावर आधारित स्त्रोत आणि शिक्षक सक्षमीकरण प्रशिक्षण व साधनांच्या माध्यमातून दिले जाईल.
मुंबई, १२ ऑगस्ट २०२५: संपर्क फाऊंडेशनने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) भागीदारीत मुंबईतील २१७ महापालिका शाळांमध्ये ‘स्मार्ट स्कूल स्मार्ट ब्लॉक’ उपक्रम आणला आहे. त्यातून नावीन्यपूर्ण, तंत्रज्ञानावर आधारित उपाययोजनांद्वारे शासकीय शाळांमध्ये उत्तम दर्जाचे अध्ययन परिणाम दिसून येतील, याची काळजी घेतली जाईल. या उपक्रमाचे उद्घाटन बीएमसीचे आयुक्त आणि प्रशासक श्री. भूषण गगराणी (आयएएस) यांच्या हस्ते त्यांच्या कार्यालयात झाले.

या वेळी उपस्थित असलेल्या इतर मान्यवरांमध्ये डॉ. अमित सैनी (आयएएस), अतिरिक्त महापालिका आयुक्त, बीएमसी; श्री. विनीत नायर, संस्थापक आणि अध्यक्ष संपर्क फाऊंडेशन आणि एचसीएल टेक्नॉलॉजीजचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी; आणि डॉ. के. राजेश्वर राव (निवृत्त आयएएस), अध्यक्ष, संपर्क फाऊंडेशन आणि माजी विशेष मुख्य सचिव, नीती आयोग तसेच शिक्षण विभागातील इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या उपक्रमातून २७३ वर्गखोल्यांचे रूपांतर अत्यंत आगळ्यावेगळ्या स्मार्ट शिक्षण वर्गांमध्ये केले जाईल आणि ४३४ शिक्षकांना संपर्कच्या नावीन्यपूर्ण अध्यापन, अध्ययन साहित्य आणि साधनांद्वारे प्रशिक्षित करून ३०७८ विद्यार्थ्यांना त्याचा थेट लाभ मिळेल. याशिवाय चेंबूर, भांडुप, दादर, परळ, भायखळा, घाटकोपर, बोरीवली, कुर्ला, सांताक्रूझ आणि गोरेगाव येथील प्रभागांमधील शाळांमध्ये १५९ स्मार्ट टीव्हीही लावले जातील.
संपर्क फाऊंडेशनच्या महाराष्ट्र शासनासोबतच्या पाच वर्षांच्या सामंजस्य करारावर हा उपक्रम आधारित आहे (२०२३-२०२८). त्याअंतर्गत १३ जिल्ह्यांमधील १३१२८ शाळांमध्ये १४३४४ वर्गखोल्यांचे रूपांतर स्मार्ट क्लासरूम्समध्ये करण्यात आले आहे. त्यातून ९९७२ शिक्षकांना प्रशिक्षण देऊन ६१६७ एलईडी टीव्हीही वितरित करण्यात आले आहेत.
“शिक्षणाची पुढची पायरी ठरणाऱ्या उपक्रमात बृहन्मुंबई महानगरपालिका सहभागी झाली आहे. शिक्षण क्षेत्रातील हा अमुलाग्र बदल आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही अनेक शाळांपर्यंत पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान (एफएलएन) उपकरणे पोहोचविणार आहोत. ही उपक्ररणे वापरण्यास सुलभ असल्यामुळे शिक्षकांनी त्याचा वापर करता येणार आहे. विद्यार्थ्यांना याचा थेट फायदा होणार आहे. हा उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना डिजिटल साक्षर करण्यास मदत होणार आहे. महानगरपालिका हा उपक्रम पुढे नेण्यास सक्षम आहे,” असे मनोगत बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त व प्रशासक श्री. भूषण गगराणी यांनी व्यक्त केले.
संपर्क फाऊंडेशनने श्री. विनित नायर यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात मुलभूत शिक्षणाचे दृढी करण करण्यासाठी १०० कोटी रूपयांची वचनबद्धता दर्शवली आहे. त्यांचे उद्दिष्ट शिक्षण अधिक सुलभ, अधिक मनोरंजक आणि प्रभावी करण्याचे आहे. या निमित्ताने बोलताना श्री. नायर म्हणाले की, “महाराष्ट्राप्रती असलेली ही वचनबद्धता माझ्या मनात खूप महत्त्वाची आहे. माझा शिक्षणातील प्रवास नागपूरमधील सरकारी शाळेतून सुरू झाला. शिक्षणाची आमूलाग्र बदल घडवून आणण्याची क्षमता मला इथे कळली. ज्या महाराष्ट्राने मला खूप काही दिले त्याची परतफेड करण्यासाठी मी वचनबद्ध आहे, तसेच या बद्दल मी मनःपूर्वक ऋणी आहे.
तंत्रज्ञान-सक्षम संपर्क स्मार्ट शाळा उपक्रमाचा एक भाग म्हणून १००% ऑफलाइन असलेल्या या उपक्रमात संपर्क एफएलएन टीव्ही आणण्यात आला आहे. त्यातून इयत्ता पहिली ते पाचवीसाठी एक किफायतशीर प्लग-अँड-प्ले इनोव्हेशन मिळेल, जे कोणत्याही नेहमीच्या टीव्हीचे रूपांतर परस्परसंवादी स्मार्ट क्लासरूममध्ये करते. अँड्रॉइड सेट-टॉप बॉक्स आणि रिमोटसह प्रत्येक डिवाईस, राज्य पाठ्यपुस्तके आणि अभ्यासक्रमाशी मॅप केलेले असून त्यात १,००० तासांहून अधिक ऑफलाइन सामग्री प्री-लोडेड आहे. त्यात ज्यामध्ये धडे योजना, शिक्षण संकल्पना व्हिडिओ, विषय- आणि वर्गवार वर्कशीट्स, गेमिफाइड मूल्यांकन प्रश्न, कथा, गाणी आणि कोडी, मेंदूच्या सजगतेसाठी व्हिडिओ, विज्ञान प्रयोग आणि स्पर्धात्मक परीक्षेच्या युक्त्या अशा विविध प्रकारच्या व्हिडिओंचा समावेश आहे.
ही वचनबद्धता शिक्षक, मास्टर ट्रेनर आणि शिक्षण अधिकाऱ्यांसाठी व्यापक प्रशिक्षण कार्यक्रमांना पाठिंबा देईल. त्यामुळे प्रभावी वर्ग एकत्रीकरण, जिल्हा, ब्लॉक आणि विभाग-स्तरीय शिक्षण अधिकाऱ्यांना वापराचे निरीक्षण करणे शक्य होईल. तसेच सुरळीत अंमलबजावणीसाठी जिल्हा आणि तालुका पातळीवर मनुष्यबळ नेमले जाईल. सामुदायिक सहभाग उपक्रमांमध्ये पालक आणि स्थानिक भागधारकांचा सहभाग वाढवून एक मजबूत, सहाय्यक शिक्षण परिसंस्था तयार केली जाईल.
बीएमसीच्या सक्रिय पाठिंब्याने या कार्यक्रमाचा जिल्हा आणि ब्लॉक पातळीवर दरमहा आढावा घेतला जाईल. त्यासोबत अभिनव प्रशिक्षण सत्रे आणि सर्वेक्षणे आयोजित केली जातील. त्यामुळे शिक्षणाच्या निकालांमध्ये बरीच सुधारणा आणि वर्गखोल्यांमध्ये शाश्वत परिणाम दिसून येईल.
संपर्क स्मार्ट शाळा कार्यक्रमाने राष्ट्रीय स्तरावर १.४ लाखांहून अधिक सरकारी शाळांमधील १.८ कोटींहून अधिक मुलांच्या आयुष्यावर प्रभाव टाकला आहे. त्यातून ८.५ लाखांहून अधिक शिक्षकांना प्रशिक्षण दिले आहे आणि ४०,००० हून अधिक स्मार्ट वर्गखोल्या स्थापन केल्या आहेत. या देशव्यापी प्रयत्नामुळे पायाभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र (एफएलएन) निकालांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. २०२४ ते २०२५ दरम्यान शिक्षण पातळी २३% वरून ४३% पर्यंत सुधारली आहे आणि प्रत्येक मुलाला भविष्यातील वर्गखोल्यांमध्ये शिकण्यासाठी, विकास तसेच भरभराटीसाठी साधने, प्रशिक्षण व संधी मिळतील याची खात्री करण्याच्या दिशेने टाकलेले हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.