स्वयंरोजगार क्षेत्रातील ग्राहकांकडून टर्म इन्शुरन्सच्या मागणीत वाढ: पॉलिसीबाजार.कॉम

News Service

मुंबई ,०९ नोव्हेंबर: स्वयंरोजगार क्षेत्रातील ग्राहकांकडून दर वर्षी घेतल्या जाणाऱ्या टर्म इन्शुरन्सच्या मागणीत ५० टक्के वाढ नोंदविण्यात येत असून, योजनाविक्रीचे प्रमाण ७० टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. स्वयंरोजगारित व्यक्तींकडून टर्म इन्शुरन्स खरेदीत देशात मुंबई अव्वलस्थानी असून, त्यानंतर अनुक्रमे दिल्ली, चेन्नई, लखनौ, बेंगळुरू आणि हैदराबादचा क्रमांक लागतो.

महानगरांमध्ये अन्य शहरांमध्येही मोठ्या प्रमाणावर टर्म इन्शुरन्सला पसंती मिळत आहे. त्यावरून या योजनांची लोकप्रियता लक्षात येते. कंपन्यांनी सादर केलेल्या विशेष टर्म योजना ग्राहकांमध्ये विशेष लोकप्रिय असून, त्यांनी उत्पन्नाच्या दाखल्यांची आवश्यकता संपुष्टात आणली आहे. नवीन पद्धतीमध्ये प्राप्तिकर विवरणपत्राची (ITR) गरज उरलेली नाही. त्यामुळे स्वयंरोजगारितांना विशेष टर्म इन्शुरन्स पॉलिसी सहज उपलब्ध झाली आहे.

‘पॉलिसीबाजार .कॉम’चे टर्म इन्शुरन्स प्रमुख ऋषभ गर्ग म्हणतात,‘ स्वयंरोजगारितांमध्ये टर्म इन्शुरन्स घेण्याचा वाढता कल आर्थिक सुरक्षिततेच्या जागरुकतेचा स्पष्ट संकेत देतो. सध्या उपलब्ध असणाऱ्या सुलभ आणि विशेष योजनांमुळे संबंधितांना कुटुंबाचे संरक्षण करणे आणि त्यांचे आर्थिक भविष्य सुरक्षित करणे पूर्वीपेक्षा खूपच सोपे झाले आहे. आम्ही स्वयंरोजगारित व्यक्तींना या योजनांचा विचार करण्याची आणि त्यांना पुरेसे संरक्षण मिळाले असल्याची खात्री करण्याची शिफारस करतो.’ संबंधित स्वयंरोजगारित व्यक्तींचे आर्थिक स्थैर्य तपासण्यााठी डिजिटल मॅट्रिक्सचा उपयोग केला जातो. मॅट्रिक्स म्हणजे क्रेडिट स्कोअर. हा क्रेडिट स्कोअर संबंधित व्यक्तीच्या कर्ज किंवा क्रेडिट इतिहासावर आधारित असतो.

‘मॅक्स लाइफ’, ‘टाटा एआयए’, ‘एचडीएफसी लाइफ’ आणि ‘बजाज अलायन्झ’ आदी प्रमुख विमा कंपन्यांनी वाढती लोकसंख्या आणि त्यांच्या गरजांचा विचार करून योजनांमध्ये बदल केला आहे. त्यामुळे व्यावसायिक आणि स्वयंरोजगारितांना विमा घेणे आणखी सोपे झाले आहे. सध्या स्वयंरोजगारित व्यक्ती वार्षिक उत्पन्नाच्या दसपट अधिक विमा संरक्षण खरेदी करीत आहेत. उदाहरणार्थ, वार्षिक तीन ते पाच लाख रुपये कमविणारी व्यक्ती ३९ लाख रुपयांच्या संरक्षणाचा पर्याय निवडत आहेत. उच्च उत्पन्न गटातील (वार्षिक १० लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न) व्यक्ती सरासरी एक कोटी रुपयांची विमा पॉलिसी निवडत आहेत.

‘टर्म इन्शुरन्सची खरेदी करणाऱ्यांपैकी ७४ टक्के जणांचे वय २७ ते ३८च्या दरम्यान आहे. डिजिटल प्लॅटफॉर्म आणि आर्थिक साक्षरतेमुळे तरुणांमध्ये टर्म इन्शुरन् खरेदी करण्याचे प्रमाण वेगाने वाढले आहे. हा विमा घेणाऱ्यांमध्ये ८४ टक्के स्वयंरोजगारित पुरुष असून, महिलांचे प्रमाण हळूहळू वाढत आहे. जसजसे महिला व्यवसायात आणि उद्योजकतेत पुढे येतील, तसतसे त्यांचे विमा घेण्याची प्रमाण वाढण्याची अपेक्षा आहे, असेही गर्ग म्हणाले.

Tem Insurance

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button