जहांगिर आर्ट गॅलरीत वैभव ठाकूर यांचे ‘ऱ्हिदम ऑफ सिटी लाईफ’ हे चित्र प्रदर्शन

News Service

चित्रकार: वैभव ठाकूर
स्थळ: जहांगिर आर्ट गॅलरी, काळा घोडा, मुंबई
कालावधी: १२ ते १८ नोव्हेंबर २०२४
वेळ: सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत

सुप्रसिद्ध चित्रकार वैभव ठाकूर यांचे ‘ऱ्हिदम ऑफ सिटी लाईफ’ हे एकल प्रदर्शन जहांगिर आर्ट गॅलरीत
मुंबईसारख्या गजबजलेल्या महानगरातील जीवनाची लय व तिचे वैविध्यपूर्ण पैलू कलात्मक रीतीने आपल्या तंत्रशुद्ध शैलीत दर्शवणारे सुप्रसिद्ध चित्रकार वैभव ठाकूर यांचे ‘ऱ्हिदम ऑफ सिटी लाईफ’ हे एकल प्रदर्शन जहांगीर कलादालन, महात्मा गांधी मार्ग, मुंबई ४००००१ येथे १२ ते १८ नोव्हेंबर २०२४ या दरम्यान भरणार आहे. ते सर्वांना तेथे रोज सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत विनामूल्य बघता येईल. त्या प्रदर्शनात ठेवलेली त्यांची ॲक्रिलिक रंगसंगती वापरून कॅनव्हासवर काढलेली विविधलक्षी चित्रे मुंबईसारख्या महानगरातील जीवनशैलीचे व त्यातील संघर्षमय वैशिष्ट्यांचे एक नितांतसुंदर दर्शन सर्वांना घडवतात.

वसई विकासिनी कॉलेज ऑफ व्हिज्युअल आर्ट, वसई येथे कला अध्यापक म्हणून कार्यरत आहेत.

प्रस्तुत प्रदर्शनातील त्यांची ॲक्रिलिक रंगसंगतीतील कॅनवासवरील चित्रे मुंबई शहरातील गतिमान जीवन, तेथील नागरिकांची व कष्टकरी वर्गाची संघर्षमय जीवनपद्धती व शैली यांचे एक रम्य दर्शन सर्वांना घडवतात. मुंबईतील ऑफिसेसमध्ये डबा पोहोचविणाऱ्या डबेवाल्यांचे कष्टप्रद व संघर्षमय जीवनपद्धती, अहोरात्र गर्दीमध्ये रस्ते आणि त्यावरील रहदारी, सकाळपासून मध्यरात्रीपर्यंत तेथील जीवनशैलीत आढळणारी गतिमानता व त्यात सहभागी असणाऱ्यांची मानसिकता, जिद्द व सदैव कष्ट यांचे कलात्मक दर्शन त्यांनी या चित्रमाध्यमातून सर्वांना घडवले आहे.

त्यांची चित्रे मुख्यतः ‘टिफिन सर्विस’- डबेवाले व त्यांचे कष्टमय जीवन ‘सायकल ऑफ लाईफ’- शहरातील रस्त्यावर पादचारी, सायकलस्वार, स्कूटरस्वार, विविध वाहने आणि त्यातून संभवणारी अहोरात्र वाहतुकीची कोंडी आणि ”सिटी लाइट्स’ – नेहमी सकाळी प्रातःकाळापासून मध्यरात्रीपर्यंत कार्यव्यग्र असणाऱ्या कष्टकरी बांधवांची जीवनशैली व त्यांची कामावरील निष्ठा आणि कामाच्या पूर्ततेचा निर्धार वगैरे पैलू प्रकर्षाने दर्शवणारी आहेत.

VaibhavThakur2

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button