पुणे, भारत – सप्टेंबर ८, २०२५ – अॅजिलेंट टेक्नॉलॉजीज इंडिया आणि आयसीएआर-नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स (एनआरसीजी), पुणे यांनी त्यांच्या सहयोगाच्या पुढील टप्प्याची घोषणा केली आहे, ज्याचा प्रगत विश्लेषणात्मक विज्ञान आणि नियामक सहभागाच्या माध्यमातून भारतताील अन्न सुरक्षा पायाभूत सुविधा मजबूत करण्याचा मनसुबा आहे. या उपक्रमामुळे द्राक्षांचा विश्वासार्ह जागतिक निर्यातदार म्हणून भारताचे स्थान अधिक दृढ होईल आणि गुणवत्ता हमीमध्ये पारदर्शकता व विश्वास वाढवून नवीन बाजारपेठेत संधी निर्माण होतील, अशी अपेक्षा आहे.

भारतातून कृषी निर्यात वाढत असताना विश्वासार्ह, विकासात्मक आणि नियमन पालन करणाऱ्या अन्न चाचणी उपायांची मागणी वाढली आहे. अॅजिलेंट व एनआरसीजी सहयोगाने कीटकनाशकांचे अवशेष आणि धुराच्या विश्लेषणासाठी लक्ष्यित कार्यप्रवाह विकसित करून प्रतिसाद देत आहेत, ज्यामध्ये शाश्वतता, अचूकता आणि जागतिक नियामक संरेखन यावर लक्ष केंद्रित केले आहे. प्रयोगशाळा व भागधारकांना विकसित होत असलेल्या सुरक्षा मानकांची पूर्तता करण्यास आणि भारतातील अन्न पुरवठा साखळीमध्ये आत्मविश्वास वाढवण्यास पाठिंबा देण्यासाठी हे प्रयत्न करण्यात आले आहेत.
हा सहयोग वैज्ञानिक आणि नियामक समुदायासोबत दृढ संबंध निर्माण करण्यासाठी व्यासपीठ म्हणून देखील काम करेल. संयुक्त कार्यशाळा, वेबिनार व तांत्रिक प्रकाशनांच्या माध्यमातून अॅजिलेंट आणि एनआरसीजी यांचा माहितीची देवाणघेवाण वाढवण्याचा, तसेच विश्लेषणात्मक चाचणीमध्ये सर्वोत्तम पद्धतींना चालना देण्याचा मनसुबा आहे. या उपक्रमांमुळे अन्न सुरक्षा व्यावसायिकांमध्ये क्षमता निर्माण होण्यास मदत होईल आणि सरकारी व व्यावसायिक प्रयोगशाळांमध्ये प्रमाणित पद्धतींचा अवलंब करण्यास प्रेरणा मिळेल.
भारतातील कंट्री जनरल मॅनेजर, अॅजिलेंट टेक्नॉलॉजीज नंदकुमार कलाथिल म्हणाले, “आम्हाला एनआरसीजीसोबत आमचा सहयोग वाढवण्याचा आणि स्थिर, भविष्यासाठी सुसज्ज अन्न सुरक्षा यंत्रणांच्या विकासाप्रती योगदान देण्याचा अभिमान वाटतो. हा सहयोग फक्त तंत्रज्ञानासाठी नाही तर विश्वास निर्माण करण्यासाठी आहे, ज्यामुळे परिवर्तनाला गती मिळेल आणि सुरक्षित अन्न उत्पादनामध्ये जागतिक प्रमुख म्हणून भारताच्या भूमिकेला पाठिंबा मिळेल.”
आयसीएआर-एनआरसीजीचे संचालक डॉ. कौशिक बॅनर्जी म्हणाले, “या सहयोगामधून भारतात अन्न सुरक्षा मानक वाढवण्याप्रती आमचा समान दृष्टिकोन दिसून येतो. अॅजिलेंटच्या तंत्रज्ञान क्षमता आणि एनआरसीजीच्या संशोधन नेतृत्वाला एकत्र करत आम्ही आराखडा तयार करत आहोत, जो नाविन्यता, नियामक अनुपालन आणि भागधारक सक्षमीकरणाला पाठिंबा देतो.”
पूर्वी मिळालेल्या यशाच्या आधारावर हा नवीन सहयोग करण्यात आला आहे आणि अन्न चाचणीमध्ये मोठ्या प्रभावाला चालना देण्याप्रती समान कटिबद्धता अधिक दृढ करतो. धोरणावरून अंमलबजावणीकडे वाटचाल करत अॅजिलेंट आणि एनआरसीजी यांनी निष्पत्ती वितरित करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे, ज्यामधून खाद्य उद्योग, नियामक व ग्राहकांना फायदा होईल. वैज्ञानिक दृढता व व्यावहारिक अंमलबजबावणीला एकत्र करत या सहयोगाचा भारतातील अन्न सुरक्षेच्या भविष्याला आकार देण्याचा मनसुबा आहे.