- ग्राहक आजपासून Samsung.com, सॅमसंग एक्सक्लुसिव्ह स्टोअर्स आणि निवडक सॅमसंग अधिकृत रिटेल स्टोअर्समध्ये सॅमसंग गॅलेक्सी टॅब एस११ सिरीज प्री-बुक करू शकतात.
- रिडिझाइन केलेला एस पेन लेखन व ड्रॉईंगसाठी अधिक आरामदायीपणा व नियंत्रण देतो, ज्यामुळे वापरकर्त्यांना सर्जनशीलता व उत्पादकतेचा नवीन स्तराचा अनुभव मिळतो.
- ३एनएम प्रोसेसरची शक्ती असलेला गॅलेक्सी टॅब एस११ अल्ट्रा सॅमसंगचा सर्वात सडपातळ टॅब्लेट आहे, जो पोर्टेबल फॉर्ममध्ये गतीशील, सुलभ कार्यक्षमता देतो.
गुरूग्राम, भारत – सप्टेंबर ८, २०२५: सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँडने आज गॅलेक्सी टॅब एस११ अल्ट्रा आणि गॅलेक्सी टॅब एस११ च्या लॉंचची घोषणा केली, ज्यामधून सर्वात इंटेलिजण्ट व प्रगत टॅब्लेट अनुभव वितरित केला आहे. गॅलेक्सी टॅब एस११ सिरीज चालता-फिरता प्रभावी उत्पादकता देण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे, ज्यामध्ये प्रो-ग्रेड हार्डवेअरसह मोठ्या स्क्रिनसाठी सानुकूल केलेले अनुभव आहेत.

गॅलेक्सी टॅब एस११ अल्ट्रा आतापर्यंतचा सर्वात सडपातळ गॅलेक्सी टॅब आहे. कार्यक्षमतेबाबत तडजोड न करता हा टॅब्लेट स्लिम फॉर्म फॅक्टरच्या पलीकडे जात प्रीमियम टॅब्लेटच्या क्षमता दाखवू शकतो. गॅलेक्सी टॅब एस११ अल्ट्रा फक्त ५.१ मिमी जाड आहे आणि वजन फक्त ६९२ ग्रॅम आहे, तुलनेत त्याच्या पूर्वीच्या टॅब्लेटची जाडी ५.५ मिमी आणि वजन ७१८ ग्रॅम आहे.
प्रगत एआयसह दैनंदिन टास्क्सना मदत करतो
वन यूआय ८ सह गॅलेक्सी टॅब एस११ सिरीज मल्टीमोडल एआयला प्रकाशझोतात आणते, वापरकर्ते टाइप करणाऱ्या, म्हणणाऱ्या व पाहणाऱ्या गोष्टींना समजून घेते आणि उपयुक्त सूचनांसह रिअल टाइम प्रतिसाद देते. हे टूल्स काम करण्यासाठी, कन्टेन्ट निर्माण करण्यासाठी आणि सहजपणे टास्क्स पूर्ण करण्यासाठी सोईस्कर मार्ग देतात.
टॅब एस११ सिरीज जेमिनी लाइव्हसह येते, जे रिअल-टाइम स्क्रिन शेअरिंग व व्हिज्युअल इनपुट देते, ज्यामुळे वापरकर्ते ते पाहत असलेल्या गोष्टींबाबत जेमिनीसोबत नैसर्गिकपणे संवाद साधू शकतात. स्क्रिनवरील कन्टेन्ट असो किंवा कॅमेरा नेत एखादी वस्तू दाखवायची असो जेमिनी लाइव्ह वापरकर्ते पाहत असलेल्या गोष्टी जाणून घेत संदर्भीय प्रश्नं व विनंत्यांची हाताळणी करू शकते. उदाहरणार्थ, वर्गामध्ये वापरकर्ते सहजपणे त्यांचे नोट्स स्क्रिनवर शेअर करू शकतात, ज्यानंतर जेमिनीला तक्त्याचे वर्णन करण्यास किंवा अभ्यासाचे स्पष्टीकरण देण्यास आणि माहिती संक्षिप्त रूपात सांगण्यास विचारू शकतात.
साइड बटन प्रेस करून होल्ड करत वापरकर्ते जेमिनी कार्यान्वित करू शकतात आणि सिंगल कमांडसह अॅप्समध्ये कमांड्स चालवू शकतात. उदाहरणार्थ, मोठे लेख वाचण्यासाठी वेळ नसल्यास वापरकर्ते जेमिनीसह लिंक शेअर करू शकतात आणि म्हणू शकतात की ‘या लेखाचे संक्षिप्त रूप करा आणि सॅमसंग नोट्समध्ये सेव्ह करा’, ज्यामुळे कालांतराने ते पाहता येऊ शकते. हे वैशिष्ट्य गुंतागूंतीच्या कृती सोपे करते, ज्यामुळे वापरकर्ते टास्क्सशी संलग्न राहू शकतात.
वापरकर्ते ड्रॉईंग असिस्टसह कच्च्या रेखाचित्रांना आकर्षक व्हिज्युअल्समध्ये बदलू शकतात, त्यानंतर सॅमसंग नोट्समध्ये त्यांनी तयार केलेल्या फोटोंमध्ये समाविष्ट करू शकतात, जे विचारविनिमय, व्हिज्युअल नियोजन किंवा सर्जनशील वर्णनासाठी योग्य असतील. राइटिंग असिस्ट स्टाइलला बदलण्यास मदत करते, ज्यामुळे वापरकर्ते लेखनामध्ये सुधारणा करत ईमेल, डॉक्यूमेंट किंवा इतर अॅप्समध्ये समाविष्ट करण्यापूर्वी त्यांचा खरा हेतू स्पष्ट करू शकतात. सर्कल टू सर्च विथ गुगल आता संदर्भ मिळण्यासाठी आणि डिवाईसच्या स्क्रिनवर दिसणाऱ्या गोष्टींबाबत अधिक माहितीसाठी अधिक उपयुक्त आहे.
रिडिझाइन केलेला एस पेन
गॅलेक्सी टॅब एस११ सिरीज नवीन रिडिझाइन केलेल्या एस पेनसह येते, जो केंद्रित कामकाज आणि सर्जनशील अभिव्यक्तीसाठी डिझाइन करण्यात आला आहे. यामधील नवीन शंकू-आकाराचे पेनाचे टोक सर्वोत्तम नियंत्रणासाठी तिरप्या कोनांवर साह्य करते, तर षटकोनी डिझाइन अधिक नैसर्गिक, एर्गोनॉमिक अनुभव देते, जी हातामध्ये आरामदायी व स्थिर राहते. क्विक टूल्स ड्रॉईंग काढताना किंवा फ्लोटिंग अॅक्सेससह एडिटिंग करताना सुलभ सुविधा देतात, तर स्टिकी नोट्स वापरकर्त्यांना अचानक येणारे विचार किंवा यादी प्रत्यक्ष सॅमसंग नोट्समध्ये भर करण्यास मदत करते, जेथे डॉक्यूमेंटचे पुनरावलोकन करताना अॅप स्विच करण्याची गरज भासत नाही.
सुधारित सॅमसंग डीईएक्स
गॅलेक्सी एआय व्यतिरिक्त गॅलेक्सी टॅब एस११ सिरीजमधील सुधारित सॅमसंग डीईएक्स वापरकर्त्यांना अॅप्समध्ये मल्टीटास्किंगच्या वेळी त्यांची उत्पादकता वाढवण्यास, तसेच मीटिंग्जदरम्यान नोट्स घेण्यास किंवा संकल्पना व्यक्त करण्यास सक्षम करते. तुम्ही व्हिज्युअल संकल्पना तयार करणारे डिझाइनर असो किंवा अॅप्स व डिस्प्लेवर ट्रिपचे नियोजन करणारे पर्यटक असो गॅलेक्सी टॅब एस११ सिरीजमध्ये रिसर्चिंग व स्केचिंगपासून सुधारित निष्पत्ती शेअर करण्यापर्यत सर्वकाही आहे.
नवीन सॅमसंग डीईएक्स अपग्रेड्स उच्च स्तरीय उत्पादकता देतात, ज्याची सुरूवात एक्स्टेण्डेड मोडसह होते, जे गॅलेक्सी टॅब एस११ आणि बाह्य मॉनिटरला विनासायास ड्युअल-स्क्रिन सेटअपमध्ये बदलते. हे सेटअप सर्वोत्तम मल्टीटास्किंग आणि उत्तम स्थिरतेसाठी एकाच वेळी दोन्ही स्क्रिन्सवर सॅमसंग डीईएक्स कार्यान्वित करते. वापरकर्ते आता डिस्प्लेदरम्यान अॅप्स ड्रॅग व ड्रॉप करू शकतात किंवा एका स्क्रिनवर कार्यरत असताना दुसऱ्या स्क्रिनवरून डॉक्युमेंटचा संदर्भ देऊ शकतात. तसेच नवीन सॅमसंग डीईएक्ससह वापरकर्ते आता विविध गरजांसाठी जवळपास चार स्वतंत्र, सानुकूल वर्कस्पेसेस तयार करू शकतात. उदाहरणार्थ, एक वर्कस्पेस कामासाठी वापरता येऊ शकतो, दुसरा वर्कस्पेस सर्जनशील प्रकल्पांसाठी आणि तिसरा ट्रिपचे नियोजन करण्यासाठी वापरता येऊ शकतो.
अपग्रेडेड सॅमसंग डीईएक्ससह वापरकर्ते प्रेझेन्टेशनसाठी मीटिंग रूम टीव्हीशी कनेक्ट व्हायचे असो किंवा सुट्टीवर जाण्यापूर्वी एअरपोर्ट लाऊंजवर वर्क डॉक्युमेंटला शेवटचे फिनिशिंग द्यायचे असो कुठूनही व्हर्च्युअली काम करू शकतात.
बुक कव्हर कीबोर्ड स्लिम असलेली गॅलेक्सी टॅब एस११ सिरीज सहजपणे वैयक्तिकृत, मोबाइल वर्कस्टेशनमध्ये बदलते, तसेच समर्पित गॅलेक्सी एआय कीच्या माध्यमातून त्वरित एआय असिस्टण्ट्स उपलब्ध करून देते