यामाहा ग्राहकांना दुचाकी श्रेणीवर संपूर्ण जीएसटी दर कपातीचे फायदे देणार

News Service

चेन्‍नई, 10 सप्‍टेंबर 2025: इंडिया यामाहा मोटर (आयवायएम) प्रा. लि.ने आज घोषणा केली की, कंपनी ग्राहकांसाठी दुचाकीवर नुकतेच जाहीर करण्‍यात आलेल्‍या जीएसटी दर कपातीचे संपूर्ण फायदे देणार आहे. हे सुधारित‍ दर जाहीर केल्‍याप्रमाणे २२ सप्‍टेंबर २०२५ पासून लागू होतील.
या घोषणेबाबत मत व्‍यक्‍त करत यामाहा मोटर इंडिया ग्रुपचे अध्‍यक्ष इतारू ओटणी म्‍हणाले, ”आम्‍ही दुचाकीवरील जीएसटीमध्‍ये वेळेवर कपात करण्‍यासाठी भारत सरकारचे आभार व्‍यक्‍त करतो. हा पुढाकारामुळे सणासुदीच्‍या काळात दुचाकीसाठी मागणी मोठ्या प्रमाणात वाढेल. दुचाकी अधिक किफायतशीर केल्‍याने प्रत्‍यक्ष ग्राहकांना फायदा होईल, तसेच एकूण वापर वाढेल आणि उद्योगाला सकारात्‍मक गती मिळेल. यामाहामध्‍ये आम्‍हाला संपूर्ण भारतातील ग्राहकांना या कपातीचे संपूर्ण फायदे देण्‍याचा आनंद होत आहे.”
यामाहाच्‍या दुचाकी पोर्टफोलिओमध्‍ये २२ सप्‍टेंबर २०२५ पासून लागू होणाऱ्या संभाव्‍य किमतीमधील कपातीची माहिती खालील तक्त्यामध्‍ये देण्‍यात आली आहे. ग्राहकांना आगामी सणासुदीच्‍या काळात या फायद्यांचा आनंद घेण्‍यासाठी लवकर बुकिंग करण्‍याचे आवाहन करण्‍यात येत आहे.

GST Price Benefit
Ex-showroom, Delhi (INR)
Models Old Price New Price GST Benefit upto
R15 2,12,020 1,94,439 17,581
MT15 1,80,500 1,65,536 14,964
FZ-S Fi Hybrid 1,45,190 1,33,159 12,031
FZ-X Hybrid 1,49,990 1,37,560 12,430
Aerox 155 Version S 1,53,890 1,41,137 12,753
RayZR 93,760 86,001 7,759
Fascino 1,02,790 94,281 8,509

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button