सॅमसंगने भारतात गॅलेक्‍सी स्‍मार्टफोन्‍सवर विशेष किमतींसह उत्‍सवी आनंदामध्‍ये अधिक उत्‍साहाची भर केली

News Service

भारत – सप्‍टेंबर १९, २०२५ – सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रँडने आज निवडक गॅलेक्‍सी स्‍मार्टफोन्‍सवर अभूतपूर्व किमतींची घोषणा केली. विशेष किमतीसह ग्राहक लाँच झाल्‍यापासून आतापर्यंतच्‍या सर्वात आकर्षक दरांमध्‍ये गॅलेक्‍सी स्‍मार्टफोन्‍स खरेदी करू शकतात आणि एआय-समर्थित वैशिष्‍ट्यांचा आनंद घेऊ शकतात, ज्‍यामुळे दैनंदिन अनुभव अधिक सहजसाध्य, सर्जनशील आणि उत्‍पादनक्षम झाले आहेत.

गॅलेक्‍सी एस२४ अल्‍ट्रा, गॅलेक्‍सी एस२४ आणि गॅलेक्‍सी एस२४ एफई
काऊंटरपॉइण्‍ट रिसर्चच्‍या मते, गॅलेक्‍सी एस२४ अल्‍ट्रा भारतातील सर्वाधिक विक्री होणारा प्रीमियम स्‍मार्टफोन आहे. मूळ सुरूवातीची किंमत १,२९,९९९ रूपये असलेला हा स्‍मार्टफोन फेस्टिव्‍ह सेलदरम्‍यान ७१,९९९ रूपयांमध्‍ये उपलब्‍ध असेल. क्‍वॉलकॉम स्‍नॅपड्रॅगन ८ जेन ३ ची शक्‍ती असलेला गॅलेक्‍सी एस२४ फक्‍त ३९,९९९ रूपयांमध्‍ये उपलब्‍ध असेल, तर गॅलेक्‍सी एस२४ सिरीजप्रमाणे प्रगत एआय अनुभवाचा समावेश असलेला गॅलेक्‍सी एस२४ एफई फक्‍त २९,९९९ रूपयांमध्‍ये उपलब्‍ध असेल.

गॅलेक्‍सी ए५५ ५जी आणि गॅलेक्‍सी ए३५ ५जी आता जवळपास ४२ टक्‍के सूटसह उपलब्‍ध
गॅलेक्‍सी ए५५ ५जी २३,९९९ रूपयांच्‍या किमतीमध्‍ये उपलब्‍ध असेल, तर गॅलेक्‍सी ए३५ ५जी फक्‍त १७,९९९ रूपयांमध्‍ये उपलब्‍ध असेल. काऊंटरपॉइण्‍ट रिसर्चच्‍या मते, सॅमसंग गॅलेक्‍सी ए५५ ५जी आणि गॅलेक्‍सी ए३५ ५जी २०२४ मध्‍ये त्‍यांच्‍या किमती श्रेणीमधील पहिल्‍या क्रमांकाचे विक्री होणारे स्‍मार्टफोन होते. गॅलेक्‍सी ए५५ ५जी आणि ए३५ ५जी मध्‍ये आकर्षक ६.६ इंच एफएचडी+ १२० हर्ट्झ सुपर एएमओएलईडी डिस्‍प्‍ले, डॉल्‍बी स्टिरिओ स्‍पीकर्स आणि बाहेरील वातावरणामध्‍ये सुस्‍पष्‍ट, प्रखर व्हिज्‍युअल्‍ससाठी व्हिजन बूस्‍टर आहे. फोटोग्राफीसंदर्भात दोन्‍ही स्‍मार्टफोन्‍समध्‍ये ५० मेगापिक्‍सल मेन कॅमेरासह ओआयएस, अल्‍ट्रा-वाइड व मॅक्रो लेन्‍सेस, तसेच सुधारित नाइटोग्राफी आहे.

गॅलेक्‍सी एम३६ ५जी, गॅलेक्‍सी एम१६ ५जी आणि गॅलेक्‍सी एम०६ ५जी आता जवळपास ३० टक्‍क्‍यांच्‍या सूटसह उपलब्‍ध
गॅलेक्‍सी एम३६ ५जी फक्‍त १३,९९९ रूपयांमध्‍ये उपलब्‍ध असेल. तसेच गॅलेक्‍सी एम१६ ५जी १०,४९९ रूपयांच्‍या सुरूवातीच्‍या किमतीमध्‍ये उपलब्‍ध असेल. गॅलेक्‍सी एम०६ ५जी फक्‍त ७४९९ रूपयांमध्‍ये उपलब्‍ध असेल. भारतातील जनरेशन झेड ग्राहकांसाठी डिझाइन करण्‍यात आलेल्‍या गॅलेक्‍सी एम३६ ५जी मध्‍ये अनेक एआय इनोव्‍हेशन्‍ससोबत विविध विभागातील अग्रणी वैशिष्‍ट्ये आहेत, जसे अधिक टिकाऊपणासाठी कॉर्निंग® गोरिला® ग्‍लास व्हिक्‍टस®+ संरक्षण.

गॅलेक्‍सी एफ३६ ५जी आणि एफ०६ ५जी आता जवळपास ३० टक्‍क्‍यांच्‍या सूटसह उपलब्‍ध
गॅलेक्‍सी एफ३६ ५जी फक्‍त १३,९९९ रूपयांमध्‍ये उपलब्‍ध असेल. गॅलेक्‍सी एफ०६ ५जी ७४९९ रूपयांच्‍या सुरूवातीच्‍या किमतीमध्‍ये उपलब्‍ध असेल. गॅलेक्‍सी एफ०६ ५जी मध्‍ये सर्व टेलिकॉम ऑपरेटर्सचे १२ ५जी बँड्स आहेत, ज्‍यामुळे किफायतशीर दरामध्‍ये परिपूर्ण ५जी अनुभव मिळतो.
गॅलेक्‍सी एस२४ अल्‍ट्रा, गॅलेक्‍सी एस२४, गॅलेक्‍सी एस२४ एफई, गॅलेक्‍सी ए३५ ५जी, गॅलेक्‍सी एम३६ ५जी, गॅलेक्‍सी एम१६ ५जी आणि गॅलेक्‍सी एफ३६ ५जी यावरील ऑफर्स २२ सप्‍टेंबर २०२५ पासून सुरू होतील.

उत्‍पादन मूळ किंमत डिल किंमत
गॅलेक्‍सी एस२४ अल्‍ट्रा रूपये १२९९९९ रूपये ७१९९९
गॅलेक्‍सी एस२४
(आता स्‍नॅपड्रॅगनसह) रूपये ७४९९९ रूपये ३९९९९
गॅलेक्‍सी एस२४ एफई रूपये ५९९९९ रूपये २९९९९
गॅलेक्‍सी ए५५ ५जी रूपये ३९९९९ रूपये २३९९९
गॅलेक्‍सी ए३५ ५जी रूपये ३०९९९ रूपये १७९९९
गॅलेक्‍सी एम३६ ५जी रूपये १९९९९ रूपये १३९९९
गॅलेक्‍सी एम१६ ५जी रूपये १३४९९ रूपये १०४९९
गॅलेक्‍सी एम०६ ५जी रूपये ९९९९ रूपये ७४९९
गॅलेक्‍सी एफ३६ ५जी रूपये १९९९९ रूपये १३९९९
गॅलेक्‍सी एफ०६ ५जी रूपये ९९९९ रूपये ७४९९

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button