कोका-कोलाच्‍या आयसीसीसोबतच्‍या ८ वर्षांच्‍या सहयोगाने विमेन्‍स वर्ल्‍ड कप २०२५ दरम्‍यान भारतातील स्‍थानिक नायकांना पाठिंबा दिला 

News Service

नवी दिल्‍ली, १५ ऑक्‍टोबर २०२५: कोका-कोला इंडिया ही इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल (आयसीसी)ची अधिकृत रिफ्रेशमेंट व हायड्रेशन सहयोगी ८ वर्षांच्‍या सहयोगाला साजरे करत आहे, जेथे भारतात नवी मुंबई, गुवाहाटी, इंदौर आणि विजाग येथे आयसीसी विमेन्‍स वर्ल्‍ड कप २०२५ चे आयोजन करण्‍यात आले आहे. कोका-कोला इंडिया या सहयोगाच्‍या माध्‍यमातून देशभरातील लाखो क्रिकेटप्रेमींना थंडगार रिफ्रेशमेंट्स देईल, ज्‍यासह स्‍टेडियम्‍स, आसपासचा परिसर आणि सामुदायिक ठिकाणी क्रिकेटचा उत्‍साह साजरा होण्‍याची खात्री घेण्‍यात येईल.

या महत्त्वपूर्ण टप्‍प्‍यामधून खेळाला पाठिंबा देण्‍याप्रती आणि महिलांचे सक्षमीकरण करण्‍याप्रती, तसेच भारतातील महिला क्रिकेटसंदर्भात परिसंस्‍थेला मजबूत करण्‍याप्रती कंपनीची कटिबद्धता दिसून येते. या स्‍पर्धेव्‍यतिरिक्‍त कोका-कोला इंडिया सामुदायिक उत्‍प्रेरक म्‍हणून आपली भूमिका देखील प्रबळ करत आहे.

स्थिर परिसंस्‍था निर्माण करण्‍याच्‍या स्‍पष्‍ट दृष्टिकोनामधून प्रेरित होत कंपनी रोजगाराला चालना देत आहे, उत्‍पन्‍न वाढ करत आहे आणि यजमानी शहरांमध्‍ये शाश्वत परिणाम निर्माण करत आहे. या प्रवासामध्‍ये मुख्‍य बाब म्‍हणजे बॉटलिंग सहयोगी, किराणा स्‍टोअर्स आणि लास्‍ट-माइल सहयोगींसोबत त्‍यांचा अतूट सहयोग, जे मागणी अधिक असताना देखील सहजपणे पेये उपलब्‍ध करून देतात. आपल्‍या लोकली युअर्स कॅम्‍पेन (Locally Yours campaign)च्‍या माध्‍यमातून कोका-कोला इंडिया अज्ञात हिरोंना प्रशंसित करत आहे, जे त्‍यांच्‍या वितरण नेटवर्कचे आधारस्‍तंभ आहेत. 

कोका-कोला इंडिया व साऊथवेस्‍ट आशियाचे भारतातील कार्यसंचालनांचे उपाध्‍यक्ष सुंदीप बजोरिया म्‍हणाले, ”आयसीसी विमेन्‍स वर्ल्‍ड कप क्रीडा इव्‍हेण्‍टपेक्षा अधिक आहे, तो प्‍लॅटफॉर्म आहे, जो लाखो महिलांना, विशेषत: तरूणींना मोठी स्‍वप्‍ने पाहण्‍यास प्रेरित करतो. कोका-कोला इंडियामध्‍ये आम्‍हाला महिला क्रिकेटर्सना पाठिंबा देण्‍याचा अभिमान वाटतो, ज्या क्रिकेटच्‍या भविष्‍याला आकार देत आहेत, तसेच समुदायांना सक्षम देखील करत आहे. आमची कटिबद्धता हायड्रेशनपलीकडे आहे, जी संधी निर्माण करण्‍याबाबत आहे, तसेच या स्‍पर्धेचा प्रभाव स्‍टेडियमपलीकडे देखील दूरवर पोहोचण्‍याची खात्री घेण्‍याबाबत आहे.”

कोका-कोला इंडिया व साऊथवेस्‍ट आशियाचे डेव्‍हलपिंग मार्केट्समधील फ्रँचायझी ऑपरेशन्‍सचे उपाध्‍यक्ष करण आचपाल म्‍हणाले, ”आयसीसीसोबत आमचा सहयोग खेळाला आणि समुदायाला प्रशंसित करण्‍याबाबत आहे, जे खेळाला प्रत्‍यक्षात आणतात. ‘लोकली युअर्स’च्‍या माध्‍यमातून आम्‍ही दैनंदिन नायकांना म्‍हणजेच रिटेलर्स व किराणा स्‍टोअर्सच्‍या मालकांना प्रकाशझोतात आणतो, जे चाहत्‍यांना रिफ्रेश व कनेक्‍टेड ठेवतात. भारतात विमेन्‍स वर्ल्‍ड कपचे आयोजन करण्‍यात आले असल्‍यामुळे ते स्‍टेडियमपासून रस्‍त्‍यांपर्यंत उत्‍साह घेऊन जाण्‍यास मदत करत आहेत, ज्‍यामुळे प्रत्‍येक कानाकोपऱ्यात क्रिकेटचा आनंद पसरत आहे.” 

हिंदुस्‍तान कोका-कोला बेव्‍हरेजस् प्रा. लि.चे मुख्‍य व्‍यावसायिक अधिकारी विनय नायर म्हणाले, ”स्‍टेडियममधील प्रत्‍येक उत्‍साहामागे ते शक्‍य करणाऱ्या व्‍यक्‍तींचा समूह असतो. बॉटलिंग सहयोगी म्‍हणून आम्‍ही यजमानी शहरांमधील क्रिकेटप्रेमींना संपूर्ण स्‍पर्धेदरम्‍यान आमची पेये उपलब्‍ध असण्‍याची खात्री घेण्‍यावर लक्ष केंद्रित केले आहे. शेवटच्‍या अंतरापर्यंत प्रबळ पुरवठा साखळी निर्माण करत आणि स्‍थानिक व्‍यवसायांना पाठिंबा देत आम्‍हाला विमेन्‍स वर्ल्‍ड कपदरम्‍यान समुदायांना रिफ्रेश ठेवण्‍याचा अभिमान वाटतो.”

कोका-कोलाचा खेळासोबतचा वारसा दीर्घकाळापासून आहे, जो चाहत्‍यांना एकत्र आणतो, आवडीला चालना देतो आणि मैदानावर व मैदानाबाहेर क्षणांना उत्‍साहित करतो. क्रिकेट ते जागतिक स्‍पर्धांपर्यंत ब्रँड नेहमी व्‍यक्‍तींना एकत्र आणणाऱ्या प्‍लॅटफॉर्म्‍ससोबत राहिला आहे. आयसीसीसोबत त्‍यांचा सहयोग प्रायोजकत्‍वापेक्षा अधिक आहे, ते क्रीडा, समुदायाची क्षमता आणि प्रत्‍येक खेळाला उत्‍साहवर्धक अनुभव करण्‍याच्‍या कोका-कोलाच्‍या अतूट विश्वासाचे साजरीकरण आहे.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button