बॉलिवूड अभिनेत्री करिष्‍मा कपूर यांच्‍यासोबत हयातकडून नवीन ‘वर्ल्‍ड ऑफ हयात’ मोहिम लाँच

News Service

ही मोहिम अतिथींना अद्वितीय रिवॉर्ड्स आणि वैयक्तिकृत सन्‍मानाचा अनुभव घेण्‍याचे आवाहन करते, जे वर्ल्‍ड ऑफ हयातच्‍या सदस्‍यांना मिळतात

भारत, ऑक्टोबर 27, २०२५: – हयातने आज प्रख्‍यात बॉलिवूड अभिनेत्री करिष्‍मा कपूर यांच्‍यासोबत सहयोगाने नवीन ‘वर्ल्‍ड ऑफ हयात’ ब्रँड मोहिमेच्‍या लाँचची घोषणा केली आहे. ही मोहिम व्‍यक्‍तींची काळजी घेण्‍याच्‍या हयातच्‍या प्रेमळ उद्देशामध्‍ये सामावलेली आहे, ज्‍यामुळे त्‍यांना सर्वोत्तम अनुभव मिळू शकतो. ही मोहिम लॉयल्‍टी उपक्रम ‘वर्ल्‍ड ऑफ हयात’च्‍या उत्‍साहाला प्रकाशझोतात आणते. निष्‍ठेच्‍या मार्गदर्शक तत्त्वांवर डिझाइन करण्‍यात आलेला हा उपक्रम सदस्‍यांना अद्वितीय सुविधा देतो. निवड महत्त्वाची आहे, पण सन्‍मान देखील तितकाच महत्त्‍वाचा आहे.

एकत्रित, हयात आणि करिष्‍मा कपूर अतिथींना या नवीन मोहिमेच्‍या माध्‍यमातून ‘वर्ल्‍ड ऑफ हयात’चा अनुभव घेण्‍यास आमंत्रित करतात, जी पर्यटकांचे ‘वर्ल्‍ड ऑफ हयात’ (World of Hyatt,)चा भाग बनण्‍यास स्‍वागत करते. हा लॉयल्‍टी उपक्रम पॉइण्‍ट्सच्‍या माध्‍यमातून पहिल्‍या मुक्‍कामापासून मूल्‍य देतो, जेथे हे पॉइण्‍ट्स मोफत नाइट्स, अपग्रेड्स व अनुभवांसाठी रिडिम करता येऊ शकतात. सदस्‍याच्‍या स्‍तरावर वाढणारे फायदे आणि जगभरात ब्रँड्सच्‍या वाढत्‍या पोर्टफोलिओसह हा उपक्रम सर्वोत्तम रिवॉर्ड्ससह निवड देतो, ज्‍यामुळे प्रत्‍येक मुक्‍काम अधिक वैयक्तिक व लाभदायी होतो.

प्रवास अनेकदा घाईघाईने व आव्‍हानात्‍मक वाटू शकणाऱ्या विश्वामध्‍ये हयातचा विश्वास आहे की खरी लक्‍झरी शांतमय, हेतूपूर्ण क्षणांमध्‍ये सामावलेली आहे, जेथे अर्थपूर्ण सुविधा अतिथींना घरी असल्‍याचा अनुभव देतात. ‘वर्ल्‍ड ऑफ हयात’ लॉयल्‍टी उपक्रमापेक्षा अधिक समुदाय आहे, जो व्‍यक्तिमत्त्वाला प्रशंसित करतो.

या अर्थपूर्ण सहयोगामधून निवासापेक्षा अधिक सुविधांचा शोध घेणाऱ्या भारतातील आधुनिक पर्यटकांशी संलग्‍न होण्‍याची हयातची कटिबद्धता दिसून येते. ते उद्देश, संबंध व अनुभवांचा शोध घेतात, ज्‍यामधून त्‍यांच्‍या स्‍वत:च्‍या गाथा व महत्त्वाकांक्षा निदर्शनास येतात.

कालातीत मोहकता, निष्‍ठा आणि सखोल भावनिकतेसाठी प्रसिद्ध करिष्‍मा कपूर या कथानकासाठी नैसर्गिक आवाज आहेत. त्‍यांचा सहयोग हयातमध्‍ये संकल्‍पनेला अधिक दृढ करतो, जेथे प्रत्‍येक अतिथीचा आदर केला जातो, काळजी घेतली जाते आणि समुदायामध्‍ये स्‍वागत केले जाते, ज्‍यामुळे ते अधिक उत्‍साहपूर्ण क्षणांचा आनंद घेऊ शकतात.
हयात इंडिया व एसडब्‍ल्‍यूएच्‍या कमर्शियलच्‍या आरव्‍हीपी कादंबिनी मित्तल म्‍हणाल्‍या, ”सर्व लॉयल्‍टी उपक्रम अतिथींना अनेक फायदे जिंकण्‍याची संधी देतात, पण ‘वर्ल्‍ड ऑफ हयात’ला इतरांपेक्षा वेगळे ठरवणारी बाब म्‍हणजे आमचा काळजी घेण्‍याचा उद्देश. अतिथींना आम्‍ही ऑफर करणारे फायदे आवडतात, जसे पॉइण्‍ट्स जिंकण्‍याची क्षमता, जे कॉम्‍प्‍लीमेण्‍टरी रूम नाइट्स, सूट अपग्रेड्स व क्‍लब लाऊंज उपलब्‍धतेसाठी रिडिम करता येऊ शकतात. यासोबत आमच्‍या लॉयल्‍टी उपक्रमाचे इतर फायदे देखील आहेत, ज्‍यामुळे अतिथी पुन्‍हा-पुन्‍हा आम्‍हाला भेट देत राहतात आणि आम्‍ही त्‍यांना अधिक उत्तम सुविधा देतो. ‘वर्ल्‍ड ऑफ हयात’ गाथेमध्‍ये करिष्‍मा कपूर यांचे स्‍वागत करण्‍यासह आम्‍हाला काळजी घेण्‍याचा आमचा उद्देश अधिक उत्‍साही, संबंधित व प्रेरणादायी पद्धतीने सादर करता येत आहे. हा सहयोग म्‍हणजे फक्‍त मोहिम नाही तर पर्यटकांना आमच्‍यासाठी संलग्‍न होण्‍याचे, आमच्‍या सुविधेचा अनुभव घेण्‍याचे आणि हयातसह अधिक उत्‍साहपूर्ण क्षणांचा आनंद घेण्‍याचे आमंत्रण आहे.”

करिष्‍मा कपूर म्‍हणाल्‍या, ”मला ‘वर्ल्‍ड ऑफ हयात’सोबत सहयोग करण्‍याचा आनंद होत आहे, जेथे वैयक्तिक काळजी घेण्‍यासोबत संस्‍मरणीय अनुभव मिळतात. लक्‍झरीला अधिक नव्‍या उंचीवर घेऊन जात हे मुक्‍कामापेक्षा अधिक असून क्षण तयार करण्‍याबाबत आहे, जेथे तुम्‍हाला घरी असल्‍यासारखे वाटेल. मी अनुभवांना साजरे करण्‍यास उत्‍सुक आहे, जे पर्यटनाला सदैव स्‍मरणात राहणाऱ्या क्षणांमध्‍ये बदलतात.”

ही मोहिम आता डिजिटल व सोशल प्‍लॅटफॉर्म्‍सवर, तसेच ऑफलाइन चॅनेल्‍सवर सुरू आहे, जेथे पर्यटकांना ‘वर्ल्‍ड ऑफ हयात’च्‍या दृष्टिकोनाच्‍या माध्‍यमातून हृदयस्पर्शी आदरातिथ्‍य आणि वैयक्तिक संबंधाचा अनुभव घेण्‍याचे आवाहन करण्‍यात येत आहे.

‘वर्ल्‍ड ऑफ हयात’च्‍या माध्‍यमातून ऑफर्स व अनुभवांबाबत अधिक माहितीसाठी किंवा मोफत सुविधेकरिता साइन अप करण्‍यासाठी भेट द्या: hyatt.com.

हयात हॉटेल्स कॉर्पोरेशन आणि/किंवा त्यांच्या एक किंवा अधिक सहयोगी कंपन्यांना संदर्भित करण्यासाठी या प्रसिद्धी पत्रकामध्‍ये ‘हयात’ हा शब्द वापरला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button