सॅमसंग वॉलेटने भारतातील महिंद्रा इलेक्ट्रिक ओरिजिन एसयूव्‍हींसाठी ‘डिजिटल कार की सपोर्ट’ सादर केले

News Service
  • महिंद्रा ईएसयूव्‍ही ड्राइव्‍ह करणाऱ्या गॅलेक्‍सी वापरकर्त्‍यांना आता डिजिटल कार की वापरत गॅलेक्‍सी स्‍मार्टफोनमधून प्रत्‍यक्ष त्‍यांच्‍या वेईकल्‍सपर्यंत पोहोचण्‍यासाठी सोपे सोल्‍यूशन उपलब्‍ध आहे
  • महिंद्रा ग्रुप सॅमसंग वॉलेटसह डिजिटल कार की वैशिष्‍ट्य एकीकृत करणारी पहिली भारतीय ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्‍युफॅक्‍चुरर (ओईएम) आहे

गुरूग्राम, भारत – ऑक्‍टोबर २९, २०२५ – सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रँडने आज सॅमसंग वॉलेटच्‍या माध्‍यमातून महिंद्रा इलेक्ट्रिक ओरिजिन एसयूव्‍हींमध्‍ये डिजिटल कार की सुसंगतता आणल्‍याची घोषणा केली, ज्‍यामुळे अधिकाधिक कारमालक विनासायासपणे त्‍यांच्‍या स्‍मार्टफोन्‍सचा वापर करत त्‍यांच्‍या वेईकल्‍स अनलॉक, लॉक व सुरू करू शकतात. प्रत्‍यक्ष गॅलेक्‍सी डिवाईसेसमध्‍ये डिझाइन करण्‍यात आलेली सॅमसंग वॉलेटची डिजिटल कार की वापरकर्त्‍यांना प्रत्‍यक्ष चावीशिवाय कनेक्‍टेड वेईकल्‍सना लॉक, अनलॉक व सुरू करते. वापरकर्ते मर्यादित कालावधीसाठी मित्र व कुटुंबाला त्‍यांची डिजिटल कार की शेअर देखील करू शकतात, ज्‍यामुळे आवश्‍यकतेनुसार उपलब्‍धतेचे व्‍यवस्‍थापन करता येते.

”आम्‍हाला महिंद्रा ईएसयूव्‍ही मालकांना सॅमसंग वॉलेटच्‍या माध्‍यमातून सॅमसंग डिजिटल कीची अविश्वसनीय सोयीसुविधा देण्‍याचा खूप आनंद होत आहे. सॅमसंग डिजिटल कार कीच्‍या उपलब्धतेचे विस्‍तारीकरण गॅलेक्‍सी परिसंस्‍थेमध्‍ये कनेक्‍टेड व सुरक्षित अनुभव देण्‍याप्रती आमच्‍या कटिबद्धतेचा महत्त्वपूर्ण भाग आहे. महिंद्रासोबत आमचा सहयोग अधिकाधिक गॅलेक्‍सी वापरकर्त्‍यांसाठी ड्रायव्हिंगसारखे दैनंदिन क्रियाकलाप विनासायास करण्‍याच्‍या दिशेने आणखी एक उत्‍साहवर्धक पाऊल आहे,” असे सॅमसंग इंडियाच्‍या सर्विसेस अँड अॅप्‍स बिझनेसचे वरिष्‍ठ संचालक मधुर चतुर्वेदी म्‍हणाले.

महिंद्रा अँड महिंद्रा लि.च्‍या ऑटोमोटिव्‍ह विभागाचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी आणि महिंद्रा इलेक्ट्रिक ऑटोमोबाइल लि.चे कार्यकारी संचालक नलिनीकांत गोलागुंता म्‍हणाले, ”आमच्‍या इलेक्ट्रिक ओरिजिन एसयूव्‍ही – एक्‍सईव्‍ही ९ई आणि बीई ६ यांनी प्रगत तंत्रज्ञान आणि भविष्‍यवादी डिझाइन्‍ससह ग्राहकांचे लक्ष वेधून घेतले आहे. आहाला सॅमसंग वॉलेटच्‍या माध्‍यमातून आणखी एक दर्जात्‍मक वैशिष्‍ट्य ‘डिजिटल कार की’ सादर करण्‍यासाठी सॅमसंगसोबत सहयोग करण्‍याचा आनंद होत आहे, ज्‍यासह प्रत्‍येक प्रवास अधिक विनासायास व सोईस्‍कर असण्‍याची खात्री मिळते. ही नवीन नाविन्‍यता भारतातील कारमालकांना प्रीमियम, सर्वोत्तम इलेक्ट्रिक एसयूव्‍हींच्‍या माध्‍यमातून अपवादात्‍मक मालकीहक्‍क अनुभव देण्‍याप्रती महिंद्राच्‍या कटिबद्धतेला अधिक दृढ करते.”

डिजिटल कार की असलेले डिवाईस हरवले किंवा चोरीला गेले तर वापरकर्ते सॅमसंग फाइंड सेवेद्वारे त्यांचे डिवाईस दुरून लॉक करू शकतात किंवा डिजिटल कार कीसह त्यांचा डेटा हटवू शकतात, ज्यामुळे त्यांच्या वेईकल्‍सचे अधिक संरक्षण होते. बायोमेट्रिक किंवा पिन-आधारित वापरकर्ता प्रमाणीकरण आवश्यकतांसह सॅमसंग वॉलेट वेईकल्‍सचे संरक्षण करते, प्रत्येक संवादात गोपनीयता आणि सुरक्षिततेची खात्री देते.

सॅमसंग वॉलेट वैविध्‍यपूर्ण प्‍लॅटफॉर्म आहे, जे गॅलेक्‍सी वापरकर्त्‍यांना एकाच सुरक्षित अॅप्लीकेशनमध्‍ये डिजिटल कीज, पेमेंट पद्धती, आयडेण्टिफिकेशन कार्डस् व्‍यवस्थित करण्‍याची सुविधा देते. सॅमसंग वॉलेटमध्‍ये सॅमसंग नॉक्‍समधील डिफेन्‍स-ग्रेड सिक्‍युरिटीद्वारे सुरक्षित विनासायास इंटरफेस आहे. ते गॅलेक्‍सी परिसंस्‍थेशी एकीकृत होते, वापरकर्त्‍यांना त्‍यांच्‍या दैनंदिन जीवनामध्‍ये शक्तिशाली कनेक्‍टीव्‍हीटी आणि उत्तम सुरक्षितता देते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button