‘कोटक८११’कडून ३ इन १ सुपर बँक खात्याचे अनावरण; बचत करा, खर्च करा, कर्ज घ्या आणि कमवा – सर्व एकाच ठिकाणी

News Service
  • कोटक८११ च्या ३ इन १ सुपर खात्याचा भाग म्हणून एक सुरक्षित को-ब्रँडेड क्रेडिट कार्डचे अनावरण करण्यासाठी ‘सुपर.मनी’बरोबर भागिदारी

मुंबई, ता. २९ ऑक्टोबर २०२५ : भारतातील आघाडीचे डिजिटल बँकिंग व्यासपीठ असलेल्या ‘कोटक८११’ने ‘३ इन १ सुपर खात्या’चे अनावरण केले. ज्यामध्ये बचत खाते, मुदत ठेव आणि सुपर.मनीचे सुरक्षित क्रेडिट कार्ड खातेधारकांना एकाच वेळी उपलब्ध होणार आहे.

‘३ इन १ सुपर बँक खाते’ ही योजना संपूर्ण भारतासाठी प्रस्तावित करण्यात आली आहे. हा सामान्य भारतीयांचा एक मोठा आणि वाढता वर्ग असून ज्यात त्यांना साधी, डिजिटल-जलद आर्थिक साधने/सुविधा हव्या आहेत. यात पगारदार व्यक्ती, डिजिटलस्नेही, विद्यार्थी, पहिल्यांदाच नोकरी करणारे आणि बरेच काही समाविष्ट आहे. हे असे वापरकर्ते आहेत जे छोटीशी सुरुवात करून, नियंत्रणात राहून आणि त्यांच्या पैशातून अधिक परतावा मिळवू इच्छितात. ‘३ इन १ सुपर खाते’ वापरण्यास सोपे उपाय त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाइन केले आहे.

‘कोटक८११’चे प्रमुख मनीष अग्रवाल म्हणाले, की ‘३ इन १ सुपर खाते’ बचत, खर्च आणि कर्ज घेणे एकाच ठिकाणी एकत्र उपलब्ध करते. हे अशा लोकांसाठी बनवले आहे जे कागदपत्रे किंवा गुंतागुंतीशिवाय पैसे अधिक चांगल्या प्रकारे गुंतवणूक करू इच्छितात. हे सोपे, सुरक्षित आणि दैनंदिन वापरासाठी डिझाइन केलेले आहे.’

‘३ इन १ सुपर खात्या’मध्ये तुम्हाला काय मिळते?

  • १,००० रुपयांपासून सुरुवात करा: मुदत ठेव (एफडी) योजनेत सहभागी व्ही आणि सुरुवात करा.
  • अधिक कमाई करा : तुमच्या ‘एफडी’वर व्याज + खर्चावर कॅशबॅक मिळवा.
  • क्रेडिटवर ‘यूपीआय’ वापरा : नेहमीप्रमाणे पैसे द्या आणि बक्षिसे मिळवा.
  • सुरक्षित ‘कोटक८११’-सुपर.मनी क्रेडिट कार्ड : उत्पन्नाच्या पुराव्याशिवाय तुमच्या ‘एफडी’च्या आधारावर खरेदीची संधी मिळवा.
  • कोणतेही कागदपत्रे नाहीत : १०० टक्के डिजिटल प्रक्रिया.
  • नियंत्रणात रहा : तुमचा ‘एफडी’ तुमची खर्च मर्यादा निश्चित करतो.

आमचे ग्राहक ‘कोटक८११’च्या डिजिटल-फर्स्ट वापरकर्त्यांशी जुळतात, ज्यांना गोष्टी सोप्या आणि फायदेशीर बनवायच्या आहेत. पैसे देण्याइतकेत ‘क्रेडिट’ व्यवहार सुलभ करण्यासाठी आम्ही विश्वासार्ह बँकिंग आणि डिजिटल-फर्स्ट उपक्रमाचे मिश्रण करत आहोत’, असे ‘सुपर.मनी’चे संस्थापक प्रकाश सिकारिया म्हणाले.

‘कोटक८११’चे सह-प्रमुख जय कोटक पुढे म्हणाले, की ‘कोटक८११’ हे संपूर्ण भारतातील विस्तृत प्रेक्षकांना सेवा देते जे आर्थिकदृष्ट्या पुढे जाण्यासाठी व्यावहारिक मार्ग शोधत आहेत. हे वापरकर्ते डिजिटल-जाणकार आहेत, परंतु ‘क्रेडिट’बाबत सावध आहेत. त्यांना नियंत्रण, स्पष्टता आणि मूल्य हवे आहे. ‘३ इन १ सुपर खाते’ अशा ग्राहकांसाठी पूर्णत: मिळतेजुळते असून, हे खाते सुरू करणे सोपे आहे, वापरण्यास सोपे आहे आणि लोकांना त्यांच्या पैशांबाबत आत्मविश्वास निर्माण करण्यास मदत करते’.

सुरुवात करण्यासाठी :
kotak811.com/3in1SuperAccount या संकेतस्थळाला भेट द्या किंवा super.money अॅप डाउनलोड करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button