उत्तर प्रदेशचे माननीय मुख्‍यमंत्री योगी आदित्‍यनाथ यांनी गोरखपूरमध्‍ये सॅमसंग इनोव्‍हेशन कॅम्‍पस येथे भावी तंत्रज्ञान कौशल्‍ये शिकणाऱ्या तरूणांचा सत्‍कार केला

News Service
  • सॅमसंग इनोव्‍हेशन कॅम्‍पस तरूणांना एआय, आयओटी, बिग डेटा आणि कोडिंग अँड प्रोग्रामिंग अशा आवश्‍यक कौशल्‍यांसह सक्षम करतो.
  • या उपक्रम आता १० राज्‍यांमध्‍ये पसरला आहे, ज्‍याचा २०२५ मध्‍ये गेल्‍या वर्षीच्‍या तुलनेत सहा पट वाढ करत देशभरात २०,००० विद्यार्थ्‍यांना अपस्किल करण्‍याचा मनसुबा आहे.
  • यंदा उत्तर प्रदेशवर मुख्‍य लक्ष केंद्रित करण्‍यात आले आहे, जेथे राज्‍यातील ५,००० वि़द्यार्थ्‍यांना भावी तंत्रज्ञानांमधील प्रशिक्षण मिळेल.

भारत – नोव्‍हेंबर, २०२५ – सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रँडने आज त्‍यांचा प्रमुख तंत्रज्ञान शिक्षण उपक्रम ‘सॅमसंग इनोव्‍हेशन कॅम्‍पस (एसआयसी)’मध्‍ये प्रमुख टप्‍पा साजरा केला, जेथे गोरखपूरमध्‍ये १६०० तरूण सहभागींचा सत्‍कार केला.

योगी बाबा गंभीरनाथ प्रेक्षागृह सभागृहात आयोजित करण्‍यात आलेल्‍या समारोहामध्‍ये उत्तर प्रदेशचे माननीय मुख्‍यमंत्री योगी आदित्‍यनाथ यांनी उपस्थिती दाखवून कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्‍यांनी गुणवंत विद्यार्थ्‍यांना प्रमाणपत्रे दिली आणि भविष्‍याकरिता सुसज्‍ज शिक्षण व डिजिटल सर्वसमावेशकतेप्रती योगदानासाठी उपक्रमाचे कौतुक केले.

भारत सरकारच्‍या स्किल इंडिया व डिजिटल इंडिया मिशनशी संलग्‍न असलेला सॅमसंग इनोव्‍हेशन कॅम्‍पस तरूणांना आर्टिफिशियल इंटेलिजन्‍स (एआय), इंटरनेट ऑफ थिंग्‍ज (आयओटी), बिग डेटा आणि कोडिंग अँड प्रोग्रामिंगमधील आवश्‍यक कौशल्‍यांसह सक्षम करतो. कंपनीचा प्रमुख सीएसआर उपक्रम सॅमसंग इनोव्‍हेशन कॅम्‍पस आता १० राज्‍यांमध्‍ये पसरला आहे, ज्‍याचा २०२५ मध्‍ये गेल्‍या वर्षीच्‍या तुलनेत सहा पट वाढ करत देशभरात २०,००० विद्यार्थ्‍यांना अपस्किल करण्‍याचा मनसुबा आहे.

राष्‍ट्रीय स्‍तरावर या उपक्रमामध्‍ये ४४ टक्‍के महिला सहभागी आहेत, ज्यामधून सॅमसंगचा सर्वसमावेशक व समान स्किलिंगवरील फोकस दिसून येतो. उत्तर प्रदेशमध्‍ये यंदा ५००० विद्यार्थ्‍यांना प्रशिक्षण देण्‍यात येईल, जे राष्‍ट्रीय लक्ष्‍याच्‍या जवळपास २५ टक्‍के आहे, ज्‍यामुळे राज्‍य डिजिटल सक्षमीकरण आणि रोजगारासाठी सुसज्‍ज टॅलेंटला चालना देण्‍यामध्‍ये आघाडीवर असेल.

”सॅमसंगमध्‍ये आमचा विश्वास आहे की, भारतातील तरूण भारताचे भविष्‍य घडवतील. सॅमसंग इनोव्‍हेशन कॅम्‍पसच्‍या माध्‍यमातून आम्‍ही तरूणांना टेक्निकल कौशल्‍यांचे ज्ञान देत आहोत, तसेच त्‍यांच्‍यामध्‍ये आत्‍मविश्वास, सर्जनशीलता आणि समस्‍या निवारण कौशल्‍ये देखील बिंबवत आहोत. हे गुण तरूणांना अर्थपूर्ण करिअर घडवण्‍यास आणि देशाच्‍या डिजिटल परिवर्तनाला आकार देण्‍यास मदत करतील. आम्‍हाला यंदा १० राज्‍यांमध्‍ये आणि हजारो वर्गांमध्‍ये दिसण्‍यात आलेल्‍या गतीमधून भारतीयांची अध्‍ययन व प्रगतीप्रती मोठी महत्त्वाकांक्षा दिसून येते. एआय व आयओटी असो किंवा बिग डेटा व कोडिंग अँड प्रोग्रामिंग असो ही भावी कौशल्‍ये असण्‍यासोबत आजच्‍या संधीची भाषा देखील आहेत. भारताच्‍या विकासगाथेमधील सहयोगी म्‍हणून सॅमसंग टॅलेंटमध्‍ये गुंतवणूक करत राहिल, स्‍थानिक परिसंस्‍थांना मजबूत करेल आणि सरकार व कौशल्‍य संस्‍थांसोबत सहयोगाने काम करत डिजिटली सक्षम नाविन्‍यता-केंद्रित आत्‍मनिर्भर भारत घडवेल,” असे सॅमसंग साऊथवेस्‍ट आशियाचे अध्‍यक्ष व मुख्‍य कार्यकारी अधिकारी जेबी पर्क म्‍हणाले.

”आमचे तरूण उत्तर प्रदेशच्‍या प्रगतीचा पाया आहेत आणि भारताच्‍या विकासगाथेमधील प्रेरक शक्‍ती आहेत. मला सॅमसंग सारख्‍या जागतिक कंपन्‍या त्‍यांची कौशल्‍ये व महत्त्वाकांक्षांमध्‍ये गुंतवणूक करण्‍यासाठी पुढे येत असल्‍याचे पाहून आनंद होत आहे. आर्टिफिशियल, बिग डेटा व आयओटी यांसारखे उदयोन्‍मुख तंत्रज्ञान शिकत विद्यार्थी भावी उद्योगांचे नेतृत्‍व करण्‍यास सक्षम होत आहेत. हा उपक्रम फक्‍त तंत्रज्ञानाचे शिक्षण देण्‍यापर्यंत मर्यादित नाही तर तरूणांसाठी उदरनिर्वाह, स्‍वावलंबीपणा व प्रतिष्‍ठेसाठी मार्ग देखील खुले करत आहे. या उपक्रमाच्‍या माध्‍यमातून सॅमसंग उत्तर प्रदेशला कुशल मनुष्‍यबळ व डिजिटल उत्‍कृष्‍टतेसाठी केंद्रामध्‍ये रूपांतरित करण्‍याच्‍या आमच्‍या दृष्टिकोनाला पाठिंबा देते. या तरूणांच्‍या यशामधून आत्‍मविश्वासपूर्ण, क्षमतापूर्ण आणि भविष्‍यासाठी सुसज्‍ज उत्तर प्रदेश दिसून येतो,” असे उत्तर प्रदेशचे माननीय मुख्‍यमंत्री योगी आदित्‍यनाथ म्‍हणाले.

सॅमसंगने विद्यार्थ्‍यांना मान्यताकृत प्रशिक्षण सहयोगींच्‍या माध्‍यमातून प्रशिक्षण देण्‍यासाठी नॅशनल स्किल डेव्‍हलपमेंट कॉर्पोरेशन (एनएसडीसी) अंतर्गत इलेक्‍ट्रॉनिक्‍स सेक्‍टर स्किल्‍स कौन्सिल ऑफ इंडिया (ईएसएससीआय) सोबत सहयोग केला आहे. २०२२ मध्‍ये भारतात सॅमसंग इनोव्‍हेशन कॅम्‍पस लाँच करण्‍यात आला आणि या उपक्रमाने २०२४ पर्यंत ६,५०० विद्यार्थ्‍यांना, तसेच २०२५ पर्यंत एकूण २६,५०० विद्यार्थ्‍यांना प्रशिक्षण दिले आहे. हा उपक्रम आपली उपस्थिती वाढवत आहे, जेथे वंचित व अर्ध-शहरी समुदायांवर मुख्‍य लक्ष केंद्रित करण्‍यात आले आहे.

तंत्रज्ञान शिक्षणाव्‍यतिरिक्‍त सहभागींना रोजगारक्षमता व कामाच्‍या ठिकाणी सुसज्‍जता दर्शवण्‍यासाठी सॉफ्ट स्किल्‍स प्रशिक्षण आणि प्‍लेसमेंट सपोर्ट मिळतो.

सॅमसंग सॉल्‍व्‍ह फॉर टूमारो उपक्रमासोबत सहयोगाने सॅमसंग इनोव्‍हेशन कॅम्‍पसमधून तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण करण्‍याप्रती, टॅलेंट समूह घडवण्‍याप्रती आणि भारतातील तरूणांना कनेक्‍टेड, नाविन्‍यता-संचालित भविष्‍यासाठी सुसज्‍ज करण्‍याप्रती सॅमसंगची दीर्घकालीन कटिबद्धता दिसून येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button