किंवा भारतभरातील किराणा स्टोअर्स डिजिटल होत आहेत, कोक बडी आघाडीवर आहे
किंवा किराणा मालकांनी सुलभतेला प्राधान्य दिले, कोक बडी पसंतीचे रिटेल अॅप बनले
भारत, १० नोव्हेंबर २०२५: भारतातील किराणा स्टोअर्स दैनंदिन व्यापार आणि ग्राहक उपलब्धतेसाठी दीर्घकाळापासून महत्त्वाचे राहिले आहेत. या स्टोअर मालकांसाठी सामानाचा साठा करण्यापासून यादीचे व्यवस्थापन करण्यापर्यंत आणि झपाट्याने विकसित होत असलेल्या रिटेल क्षेत्रात ग्राहकांना सेवा देण्यापर्यंत प्रत्येक मिनिट महत्त्वाचा आहे. त्यांना साह्य करण्यासाठी कोका-कोला इंडियाने स्मार्ट, एआय-सक्षम डिजिटल प्लॅटफॉर्म ‘कोक बडी’ डिझाइन केला आहे, जो प्रत्यक्ष किरकोळ विक्रेत्यांना सोयीसुविधा आणि कार्यक्षमता देतो.

लाँच झाल्यापासून कोक बडीने भारतातील कोणत्याही एफएमसीजी ईबी२बी रिटेल प्लॅटफॉर्मच्या तुलनेत झपाट्याने विस्ताराची नोंद केली आहे आणि १० लाखांहून अधिक किरकोळ विक्रेते या प्लॅटफॉर्मचा वापर करत आहेत. या अॅपने उद्योगामधील अग्रणी सहभाग दर देखील संपादित केला आहे, जेथे किरकोळ विक्रेते त्यांची आवडती कोका-कोला उत्पादने खरेदी करण्यासाठी दर महिन्याला वारंवार ऑर्डर्स करत आहेत, ज्याला पारदर्शक ऑफर्स, एआय समर्थित सूचना आणि युजर-अनुकूल इंटरफेसचे पाठबळ आहे. या झपाट्याने झालेल्या वाढीमधून दैनंदिन कार्यसंचालन सोपे करण्याप्रती आणि किरकोळ विक्रेत्यांचा आत्मविश्वास व त्यांच्यासोबतचे संबंध प्रबळ करण्याप्रती प्लॅटफॉर्मची क्षमता दिसून येते.
स्टोअर मालक आदित्य अरोरा (Aditya Arora, a store owner) म्हणाले, ”आम्ही १९८० पासून ग्राहकांना सेवा देत आहोत आणि मी जवळपास १५ ते १७ वर्षांपासून माझ्या वडिलांसोबत काम करत आहे. एमबीए पदवीधर असण्यासह मला समजले आहे की, तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल तर काळासह विकसित होणे आवश्यक आहे. कोक बडी अॅपने आमच्या व्यवसाय करण्याच्या पद्धतीमध्ये बदल घडवून आणला आहे, आमच्या कामामध्ये पारदर्शकता आणली आहे. मी कोका-कोलाकडून डिल्स व सेवांसह अॅपच्या माध्यमातून कधीही ऑर्डर्स सहजपणे करू शकतो. या अॅपने आमच्या दैनंदिन स्टोअर चालवण्याच्या पद्धतीमध्ये सुलभता आणली आहे.”
स्टोअर मालक प्रदीप म्हणाले, ”मी गेल्या तीन वर्षांपासून कोका-कोलासोबत काम करत आहे आणि नियमितपणे कोक बडी अॅप वापरत आहे. हे अॅप मला सहजपणे ऑर्डर्स करण्यास आणि नवीन उत्पादनांबाबत अपडेटेड राहण्यास मदत करते. मला विशेषत: ‘सजेस्टेड ऑर्डर’ वैशिष्ट्य आवडते, जे माझ्या मागील खरेदींच्या आधारावर उत्पादनांची शिफारस करते. यामुळे माझे दुकान सहजपणे चालवता येते.”
विकासाव्यतिरिक्त कोक बडी किराणा स्टोअर्ससाठी व्यवसाय वाढीला देखील चालना देत आहे. हे प्लॅटफॉर्म दुकानदारांना कधीही ऑर्डर करण्याची, डिलिव्हरीजवर देखरेख ठेवण्याची आणि वास्तविक किंमत व प्रमोशन्सची माहिती मिळवण्याची सुविधा देते, जे सर्व एकाच मोबाइल अॅप्लीकेशनच्या माध्यमातून उपलब्ध होतात. दैनंदिन निर्णय घेण्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा समावेश करत प्लॅटफॉर्म मागील खरेदी पद्धती आणि हंगामी मागणीच्या आधारावर उत्पादनांची शिफारस करते, ज्यामुळे किरकोळ विक्रेत्यांना साठा संपणे टाळण्यास, अपव्यय कमी करण्यास आणि जलद, डेटा-आधारित निर्णय घेण्यास मदत होते. परिणामी किरकोळ विक्रेत्यांसाठी सोपे स्टोअर व्यवस्थापन आणि भारतातील ग्राहकांसाठी कोका-कोला पेयांची चांगली उपलब्धता होते.
कोका-कोला इंडिया आणि साऊथवेस्ट आशियाच्या डिजिटल अॅक्सेलरेशन ऑफिसचे उपाध्यक्ष अंबुज देव सिंग म्हणाले, ”डिजिटल सक्षमीकरण रिटेल विकासाला नव्या उंचीवर घेऊन जात आहे आणि आसपासचे किराणा असो किंवा स्थानिक सुपरमार्केट असो कोक बडी प्रत्येक किरकोळ विक्रेत्याला सहजपणे कोका-कोला उत्पादनांची ऑर्डर करण्याची आणि त्यावर देखरेख करण्याची सुविधा देण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे. प्रत्येक परस्परसंवादामधून अर्थपूर्ण माहिती मिळते, जे आम्हाला किरकोळ विक्रेत्यांना अधिक कार्यक्षमपणे सेवा देण्यास सुविधा देते, तसेच ग्राहकांना पाहिजे असलेली आमची पेये सहजपणे उपलब्ध होण्याची खात्री मिळते.”
कोक बडीमध्ये दैनंदिन कार्यसंचालन सोपे करण्यासाठी व्यावहारिक टूल्स आहेत. किरकोळ विक्रेत्यांना सक्रिय प्रमोशन्स, सूट, नवीन लाँचेस् आणि योजनांबाबत रिअल-टाइम नोटिफिकेशन्स मिळतात, ज्यामधून ते कधीच संधी चुकवणार नाहीत याची खात्री मिळते. प्लॅटफॉर्मचे वॉईस सर्च वैशिष्ट्य उपलब्धता वाढवते, ज्यामुळे सहजपणे व त्वरित उत्पादने शोधता येतात. तसेच, दुकानदार त्यांच्या डिलिव्हरीजवर देखरेख ठेवू शकतात, ऑर्डर हिस्ट्रीचे पुनरावलोकन करू शकतात आणि ऑर्डर स्थितीबाबत अपडेट्स मिळवू शकतात, ज्यासह प्रक्रियेमध्ये संपूर्ण पारदर्शकता व नियंत्रण मिळते.
कोक बडी किराणा स्टोअर्सच्या ग्राहकांसोबत परस्परसंवाद साधण्याच्या पद्धतीमध्ये परिवर्तन घडवून आणत आहे. किरकोळ विक्रेत्यांसाठी ते २४x७ उपलब्धता व पारदर्शकतेची खात्री देते. ग्राहकांसाठी ते आत्मविश्वास देते की, कोका-कोला पोर्टफोलिओमधील त्यांचे आवडते पेय नेहमी उपलब्ध असते.