XSR155 भारतात Rs. 1,49,990 मध्ये लाँच करण्यात आली; FZ-RAVE ची किंमत Rs. 1,17,218 आहे (All Prices Ex-Showroom, Delhi)
मुंबई, ११ नोव्हेंबर २०२५: इंडिया यामाहा मोटर (आयवायएम) प्रा. लि.ने आज भारतात त्यांचा जागतिक स्तरावर प्रशंसित आधुनिक रेट्रो स्पोर्ट ब्रँड नवीन XSR155 च्या लाँचची घोषणा केली. कंपनीने आपल्या पहिल्या ईव्ही – AEROX-E व EC-06 देखील लाँच केल्या, जे शाश्वत गतीशीलतेप्रती यामाहाच्या दीर्घकालीन दृष्टिकोनामधील प्रमुख पाऊल आहे. उत्साहामध्ये अधिक भर करत यामाहाने नवीन FZ-RAVE सह आपला FZ पोर्टफोलिओ मजबूत केला आहे. नवीन FZ-RAVE तरूण व डायनॅमिक राइडर्ससाठी डिझाइन करण्यात आली आहे. या सादरीकरणांसह यामाहाने प्रीमियम व डिलक्स मोटरसायकल विभागांमधील आपले नेतृत्व दृढ करणे सुरू ठेवले आहे, तसेच नवीन गतीशीलता श्रेणींमध्ये विस्तार करत आहे, जे ग्राहकांच्या सर्वसमावेशक पसंतींशी संलग्न आहेत.

नवीन XSR155 यामाहा प्रीमियम मोटरसायकल श्रेणीमधील च्या प्रभुत्वाच्या भावी उत्क्रांतीला सादर करते. स्टाइल व उत्कृष्टतेचा शोध घेत असलेल्या आजच्या राइडर्ससाठी डिझाइन करण्यात आलेल्या या मोटरसायकलध्ये आधुनिक रेट्रो स्पोर्ट संकल्पना आहे, तसेच कालातीत डिझाइन व आधुनिक रचनेचे संयोजन आहे, ज्यासह डिझाइन व कार्यक्षमतेमध्ये वरचढ असलेली मोटरसायकल डिझाइन करण्यात आली आहे. प्रतिसादात्मक हाताळणी व सर्वोत्तम राइडिंग अनुभवासह XSR155 ग्राहकांना सुधारित मोटरसायकलिंग अनुभव देते, ज्यामध्ये दैनंदिन सोयीसुविधेसह मोकळ्या रस्त्यावर राइड करण्याच्या रोमांचचे संयोजन आहे. या मोटरसायकलचे लाँच भारतातील सर्वात स्पर्धात्मक व झपाट्याने विकसित होत असलेल्या श्रेणीमध्ये यामाहाचे स्थान अधिक मजबूत करते, ज्यामधून भारतातील राइडर्सची जीवनशैली व महत्त्वाकांक्षांशी संलग्न असलेल्या मोटरसायकल्स डिझाइन करण्याप्रती कंपनीची कटिबद्धता दिसून येते.
आयवायएमचा भारतातील इलेक्ट्रिक वेईकल बाजारपेठेतील प्रवेश अधिक शाश्वत भविष्याच्या दिशेने त्यांच्या प्रवासामधील महत्त्वपूर्ण पाऊल आहे. ईव्ही श्रेणीमधील या प्रवेशासह पर्यावरणीय स्थिरता राखण्याप्रती, तसेच यामाहाला परिभाषित करणारा तोच उत्साह व कार्यक्षमता देण्याप्रती ब्रँडची कटिबद्धता दृढ झाली आहे.
पहिले मॉडेल AEROX-E कार्यक्षमता-केंद्रित ईव्ही आहे, ज्यामध्ये तडजोड न करता इलेक्ट्रिक पर्यायाचा शोध घेत असलेल्या राइडर्ससाठी यामाहाचा सिग्नेचर उत्साह आणि प्रतिसादात्मक हाताळणी आहे. दुसरे मॉडेल EC-06 मध्ये नवीन डिझाइन संकल्पना आहे, जी दैनंदिन राइडमध्ये स्मार्ट गतीशीलता, आरामदायीपणा आणि समकालीन डिझाइनला महत्त्व देणाऱ्या ग्राहकांसाठी डिझाइन करण्यात आली आहे. एकत्रित, AEROX-E व EC-06 कार्यक्षमतेचा शोध घेणारे राइडर्स आणि दैनंदिन वापरकर्त्यांना सेवा देण्याप्रती यामाहाच्या दृष्टिकोनाला सादर करतात, जे गतीशील, सहजसाध्य व शाश्वत असलेल्या पर्यायांसह भारतातील त्यांच्या प्रवासाच्या पुढील टप्प्यामध्ये ब्रँडच्या परिवर्तनाला चालना देतात.

कंपनीने नवीन FZ-Rave च्या लाँचची देखील घोषणा केली, ज्यासह त्यांचा लोकप्रिय FZ पोर्टफोलिओ अधिक प्रबळ झाला आहे. भारतातील तरूण राइडर्ससाठी डिझाइन करण्यात आलेल्या नवीन FZ-Rave मध्ये कामगिरी, कार्यक्षमता आणि दैनंदिन व्यावहारिकतेचे संतुलित संयोजन आहे. ही मोटरसायकल विश्वसनीयता व चपळतेबाबत FZ कुटुंबाचा वारसा पुढे नेते, शहरांमधील व नगरांमधील दैनंदिन राइडर्सच्या गरजांची पूर्तता करते, तसेच तिची विशिष्ट, आकर्षक स्टायलिंग कायम ठेवते.
या घोषणेबाबत मत व्यक्त करत यामाहा मोटर इंडिया ग्रुपचे अध्यक्ष श्री. इतारू ओतानी म्हणाले, ”भारत यामाहाच्या जागतिक विकास धोरणासाठी महत्त्वाची बाजारपेठ आहे. आम्ही या बाजारपेठेतील प्रीमियम व इलेक्ट्रिक गतीशीलता विभागांमध्ये मोठी क्षमता पाहतो. XSR ब्रँड, आमचे नवीन ईव्ही मॉडेल्स आणि FZ-Rave चे लाँच आमची उपस्थिती दृढ करण्यामधील आणि भारतातील सर्वसमावेशक गतीशीलता क्षेत्राशी संलग्न होण्यामधील निर्णायक पाऊल आहे. या लाँचेससह आम्ही कार्यक्षमता, डिझाइन व तंत्रज्ञानाचा शोध घेत असलेल्या राइडर्ससोबत आमचे संबंध दृढ करत आहोत, तसेच शाश्वत परिवहनाप्रती देशाच्या परिवर्तनाला प्रतिसाद देखील देत आहोत. आम्ही भारतात विविध ग्राहकांसाठी डिझाइन केलेल्या उत्पादनांच्या माध्यमातून मूल्य निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे, ज्याला भारताच्या ‘विकसित भारत’ दृष्टिकोनाचे पाठबळ आहे आणि यामाहाच्या जागतिक एन्व्हायरोन्मेंट प्लॅन २०५० द्वारे मार्गदर्शित आहे.”
यामाहा XSR155 चे पदार्पण – क्लासिक स्टायलिंग, आधुनिक रचना, अपवादात्मक राइडिंग अनुभव
XSR155 मधून मॉडर्न रेट्रो स्पोर्टसह नाविन्यतेला एकीकृत करण्याचे यामाहाचे तत्त्व दिसून येते, जी XSR सिरीजच्या प्रख्यात जागतिक वंशावळला पुढे घेऊन जाते. या मोटरसायकलमध्ये कालातीत डिझाइन व प्रगत तंत्रज्ञानाचे संयोजन आहे, ज्यासह वरचढ ठरणारी मोटरसायकल डिझाइन करण्यात आली आहे. सुरूवातीची ऑफर म्हणून Rs. 1,49,990 (एक्स-शोरूम-दिल्ली) किंमत असलेली ही मोटरसायकल तरूण व परिपक्व राइडर्सचे लक्ष वेधून घेते, जे विश्वासार्ह, उच्च-कार्यक्षम व स्टायलिश मोटरसायकलचा शोध घेतात, जी उत्साह व दैनंदिन उपयुक्तता देते.
XSR ही जागतिक स्तरावर यामाहाची XSR वंशावळ आहे, जी क्लासिक स्टायलिश रंगसंगती व आधुनिक रचनेला एकत्र करत आधुनिक रेट्रो स्पोर्ट उत्साह व्यापून घेते. या मोटरसायकलमधील क्लासिक वक्राकार एलईडी हेडलाइट व टेललाइट, टीअरड्रॉप फ्यूएल टँक आणि पारंपारिकरित्या स्टाइल एलसीडी डिस्प्ले यामाहाच्या डिझाइन शैलीच्या कालातीत आकर्षकतेला दाखवतात. वजनाने हलकी व संतुलित फ्रेमसह १७-इंच व्हील्स मोटरसायकलला गतीशील आणि आत्मविश्वासू पवित्रा देतात. प्रत्येक राइडरसाठी सर्जनशील मुक्त राइडचा अनुभव देण्यामध्ये यामाहाच्या विश्वासाला सादर करत XSR155 चार रंगांमध्ये येते – मेटलिक ग्रे, विविड लाल, ग्रेईश ग्रीन मेटलिक आणि मेटलिक ब्ल्यू, तसेच दोन विशिष्ट अॅक्सेसरीज पॅकेजेस् देखील आहेत – स्क्रॅम्बलर व कॅफे रेसर.
XSR155 मध्ये १५५ सीसी लिक्विड-कूल्ड, ४-व्हॉल्व्ह इंजिनच्या शक्तीसह व्हेरिएबल व्हॉल्व्ह अॅक्च्युएशन (व्हीव्हीए) आहे, जे १३.५ केडब्ल्यू शक्ती आणि १४.२ एनएम टॉर्क देते. यामाहाच्या प्रमाणित डेल्टाबॉक्स फ्रेमवर डिझाइन करण्यात आलेल्या या मोटरसायकलमध्ये अॅल्युमिनिअम स्विंग आर्म, अपसाइड-डाऊन फ्रण्ट फोर्क्स, लिंक्ड-टाइप मोनोक्रॉस रिअर सस्पेंशन आणि ६-स्पीड ट्रान्समिशनसोबत असिस्ट व स्लिपर क्लच आहे, ज्यामधून अपवादात्मक राइड अनुभवासाठी योग्य ताकद-कठोरपणा संतुलन आणि कोणत्याही रस्त्यावर आरामदायी राइडिंग मिळते. तसेच, XSR155 मध्ये ड्युअल-चॅनेल एबीएस व ट्रॅक्शन कंट्रोल देखील आहे, ज्यामधून ग्राहाकंना सुरक्षित राइडची खात्री मिळते.
डिझाइन, कार्यक्षमता व दैनंदिन व्यावहारिकतेच्या विनासायास संयोजनासह XSR155 राइडर व मशिनला संलग्न करण्याप्रती यामाहाच्या मोटरसायकलिंग तत्त्वाच्या पैलूला सादर करते.
AEROX-E उच्च कार्यक्षम ईव्हीसह शहरी गतीशीलतेच्या भविष्याचा अनुभव घ्या
AEROX-E Performance EV यामाहाच्या उच्च-कार्यक्षम इलेक्ट्रिक स्कूटर श्रेणीमध्ये प्रवेशाला सादर करते, ज्यासह त्यांची जागतिक स्तरावर प्रशंसित मॅक्सी स्पोर्ट्स श्रेणी विस्तारित झाली आहे. प्रीमियम स्कूटर बाजारपेठेला नव्या उंचीवर घेऊन गेलेली Aerox 155 च्या प्रबळ यशावर आधारित AEROX-E ईव्ही क्षेत्रात या यशाला अधिक प्रबळ करण्यास सज्ज आहे.
९.४ किलोवॅट (पीक पॉवर), उच्च प्रवेगासाठी ४८ एनएम टॉर्क इलेक्ट्रिक मोटर आणि ड्युअल डिटेचेबल ३ किलोवॅट तास बॅटरीद्वारे समर्थित, AEROX-E कार्यक्षम पॉवर व्यवस्थापनासह त्वरित प्रवेग प्रदान करते. असाधारण कामगिरीसाठी ड्युअल बॅटरी उच्च ऊर्जा प्रकारच्या सेलद्वारे समर्थित आहेत. यात सहज काढण्यासाठी आणि घरी चार्जिंगसाठी एर्गोनॉमिक ग्रिप्स देखील आहेत. यात अनेक रायडिंग मोड्स – इको, स्टँडर्ड आणि पॉवर – देखील आहेत – ज्यामध्ये ‘बूस्ट’ फंक्शनचा समावेश आहे ज्यामुळे रायडर्सना जलद प्रारंभ आणि मजबूत पिक-अपसाठी जलद प्रवेग मिळतो. अतिरिक्त रायडिंग सोयीसाठी EV मध्ये रिव्हर्स मोड देखील मिळतो. AEROX-E ची प्रमाणित श्रेणी 106 किलोमीटर आहे.
खऱ्या मॅक्सी स्पोर्ट्स स्कूटरचा मुख्य डीएनए टिकवून ठेवत, AEROX-E मध्ये यामाहाच्या ” हार्ट-शेकिंग स्पीडस्टर ” डिझाइन तत्वज्ञानाचे मूर्त रूप आहे जे त्याच्या अभिमानी शरीराच्या आकार, अॅथलेटिक प्रमाण आणि विशिष्ट ‘X’ सेंटर मोटिफद्वारे आहे. ट्विन एलईडी क्लास डी हेडलाइट्स, एलईडी फ्लॅशर्स, 3D-इफेक्ट एलईडी टेललाइट आणि टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशनसह मोठी रंगीत TFT स्क्रीन. Y-कनेक्ट मोबाइल अॅप कनेक्टिव्हिटी मल्टी-इन्फॉर्मेशन डिस्प्ले (MID) आणि देखभाल स्मरणपत्रे आणि शेवटचे पार्क केलेले स्थान यासारख्या स्मार्ट कनेक्टिव्हिटी वैशिष्ट्यांना अनुमती देते ज्यामुळे राइडिंगचा अनुभव वाढतो. या अत्याधुनिक पॉवरट्रेन आणि बॅटरी तंत्रज्ञानाव्यतिरिक्त, AEROX-E मधील एर्गोनॉमिक्समध्ये बदल करण्यात आले आहेत जेणेकरून वाहनाच्या गतिशीलतेला समर्थन मिळेल आणि मजेदार राइडिंग अनुभव मिळेल.
आजच्या शहरी अचीव्हर्सच्या गरजांची पूर्तता करत AEROX-E Performance EV निपुण, उद्योजकीय राइडर्ससाठी डिझाइन करण्यात आली आहे, जे विशिष्टता, उच्च कार्यक्षमता आणि जीवनशैली अभिव्यक्तीला महत्त्व देतात. ही वेईकल प्रीमियम, दर्जा उंचावणाऱ्या राइडचा आनंद देते, ज्यामधून यश, व्यक्तिमत्त्व व पर्यावरणीय जबाबदारी दिसून येते. या वेईकलमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानासह यामाहाची सिग्नेचर डिझाइन आणि रोमांचक कार्यक्षमतेचे संयोजन आहे.
स्मार्ट की सिस्टम आणि सोईस्कररित्या स्थित एक्स्टर्नल चार्जिंग पोर्टसह AEROX-E Performance EV मध्ये यामाहाची डिझाइन शैली व कार्यक्षमतेसह अत्याधुनिक इलेक्ट्रिक तंत्रज्ञान आहे, जे प्रीमियम ईव्ही श्रेणीमध्ये साहसी नवीन मापदंड स्थापित करतात.
यामाहा मोटरकडून EC-06 चे अनावरण – भारतातील नवीन इलेक्ट्रिफाईंग अनुभव
आंतरशहरी गतीशीलतेसाठी डिझाइन करण्यात आलेली EC-06 ग्राहकांसाठी फर्स्ट- व लास्ट-माइल कनेक्टीव्हीटी वाढवते. स्टायलिश व व्यावहारिक प्रवास पर्यायाचा शोध घेत असलेल्या राइडर्सवर लक्ष्य करणाऱ्या या स्कूटरमध्ये यामाहाचे मुलभूत डीएनएसह आधुनिक डिझाइन शैलींचे संयोजन आहे. या वेईकलचा स्थिर पवित्रा व सुधारित डिझाइन फोकस सर्वांचे लक्ष वेधून घेतात, तसेच वाहतूकीमध्ये सहजपणे नेव्हिगेट होण्याची खात्री देतात. होरिझोण्टल कोअर डिझाइन संतुलन व अचूकता देते. EC-06 चे आकर्षक, डायनॅमिक स्टायलिंग व शार्प बॉडी लाइन्स तरूण व प्रगतीशील ग्राहकांच्या गरजांची पूर्तता करतात, जे त्यांच्या दैनंदिन राइडमध्ये कार्यक्षमता व व्यक्तिमत्त्वाला महत्त्व देतात.
जागतिक दृष्टिकोनासह भारतात डिझाइन करण्यात आलेल्या EC-06 मध्ये साधेपणासह कार्यक्षमता आहे, जी रस्त्यावर विशिष्ट उपस्थिती देते. ६.७ केडब्ल्यू (सर्वोच्च शक्ती) निर्माण करणाऱ्या ४.५ केडब्ल्यू इलेक्ट्रिक मोटरची शक्ती, तसेच ४ केडब्ल्यूएच उच्च क्षमतेची फिक्स बॅटरी असलेली EC-06 दैनंदिन वापरासाठी शाश्वत मायलेज देते. EC-06 १६० किलोमीटरची प्रमाणित रेंज देते.
EC-06 शहरामध्ये व आंतरशहरी स्थितींमध्ये प्रभावी अॅक्सेलरेशनसाठी त्वरित टॅार्कसह सुलभ व प्रतिसादात्मक राइडिंग अनुभव देते. राइडर्स तीन राइडिंग मोड्समधून निवड करत कामगिरी व कार्यक्षमता ऑप्टिमाइज करू शकतात, तसेच रिव्हर्स मोड खडतर ठिकाणी सोयीसुविधा देते. फिक्स बॅटरीला चार्जिंग करणे सोपे व युजर-अनुकूल आहे, जेथे प्रमाणित घरगुती प्लग-इन पर्याय जवळपास ९ तासांमध्ये स्कूटरला पूर्णपणे चार्ज करते, ज्यामधून दैनंदिन प्रवासासाठी कमी डाऊनटाइम आणि अधिक गतीशीलतेची खात्री मिळते.
या मॉडेलमध्ये फ्रण्ट व रिअर डिस्क ब्रेक्स, कलर्ड एलसीडी डिस्प्ले आणि एलईडी हेडलाइट्स व टेललाइट्स आहेत. अधिक डिजिटल एकीकरणासाठी या वेईकलमध्ये बिल्ट-इन टेलिमॅटिक्स युनिटसह सिम देखील आहे, ज्यामुळे रिअल-टाइम कनेक्टीव्हीटी आणि डेटा उपलब्धता मिळते. या वेईकलच्या सीटखाली २४.५ लिटर स्टोरेज देखील आहे, ज्यामुळे सामान ठेवण्यासाठी मोठी जागा मिळते.
आजच्या तरूण, तंत्रज्ञान-प्रेमी ट्रेण्डसेटर्सच्या गरजांची पूर्तता करत EC-06 नाविन्यता, स्टाइल व शाश्वततेचा अवलंब करणाऱ्या राइडर्सचे लक्ष वेधून घेते. ही वेईकल स्मार्ट, विश्वसनीय व विशिष्ट गतीशीलता सोल्यूशन्स देते, ज्यामधून त्यांचे व्यक्तिमत्त्व आणि पर्यावरणाप्रती जागरूक मानसिकता दिसून येते.
स्पोर्टी, स्मार्ट आणि स्ट्रीट-रेडी: नवीन यामाहा FZ-RAVE
यामाहा FZ-RAVE भारतातील १५०सीसी श्रेणीमध्ये नवीन मापदंड स्थापित करते. या वेईकलमध्ये व्यावहारिकता व उत्साहाचा शोध घेत असलेल्या तरूण राइडर्ससाठी आक्रमक स्टायलिंग आणि शहरासाठी अनुकूल कार्यक्षमतेचे संयोजन आहे. यामाहाच्या प्रीमियम FZ लाइनमधून प्रेरणा घेत FZ-RAVE मध्ये आकर्षक फुल-एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्पसह एकीकृत पोझिशन लाइट, शिल्पाकृती फ्यूएल टँक, कॉस्मेटिक एअर व्हेण्ट्स आणि सुसंगत एक्झॉस्ट आहे, जे वेईकलला भारतातील रस्त्यांवर लक्षवेधक उपस्थिती देतात. या वेईकलच्या आधुनिक डिझाइनला पूरक सिंगल-पीस सीट आणि आकर्षक टेल लॅम्प आहे, जे वेईकलला आकर्षक व स्पोर्टी लुक देतात, ज्यामुळे ही वेईकल वाहतूकीमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेते, तसेच दैनंदिन प्रवासामध्ये आणि लांबच्या प्रवासामध्ये राइडरला आरामदायीपणा देते. नवीन FZ-RAVE ची किंमत Rs. 1,17,218 (एक्स-शोरूम दिल्ली) आहे.
भारतातील रस्त्यावर आधीच धावत असलेल्या २.७५ दशलक्षहून अधिक FZ-S मोटरसायकल्सच्या वारसाला अधिक पुढे घेऊन जात FZ-RAVE यामाहाच्या तरूण राइडर्ससोबत असलेल्या व्यापक सहभागामधून मिळालेले अभिप्राय व माहितीसह डिझाइन करण्यात आली आहे. FZ-RAVE चे रंग व ग्राफिक्स – मॅट टायटन व मेटलिक ब्लॅक सखोल संशोधन करत आणि प्रत्यक्ष ग्राहकांसोबत चर्चा करत विचारपूर्वक डिझाइन करण्यात आले आहेत, ज्यामधून ते समकालीन भारतीयांची आवड व पसंतीची पूर्तता करण्याची खात्री मिळते.
FZ-RAVE मध्ये विश्वसनीय १४९सीसी सिंगल-सिलिंडर, एअर-कूल्ड इंजिनची शक्ती आहे, जे ९.१ केडब्ल्यू शक्ती निर्माण करते. इंजिन एकसमान अॅक्सेलरेशन, प्रतिसादात्मक कामगिरी आणि अद्वितीय इंधन कार्यक्षमता देते, ज्यामुळे भारतातील विविध राइडिंग स्थितींसाठी अनुकूल आहे. ५-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स अचूक शक्ती वितरणाची खात्री देते, तर सिंगल-चॅनेल एबीएस आणि फ्रण्ट व रिअर डिस्क ब्रेक्स सुरक्षितता वाढवतात, ज्यामुळे अचानक थांबल्यास किंवा आव्हानात्मक रस्त्यांवर सुरक्षिततेची खात्री मिळते.
१३-लिटर फ्यूएल टँक आणि 136 Kg Kerb वजनासह FZ-RAVE मध्ये स्थिरता, गतीशीलता व रेंजचे संतुलन आहे, ज्यामुळे भारतातील तरूण राइडर्ससाठी योग्य पर्याय आहे. यामाहाची प्रमाणित FZ रचना आणि लाखो राइडर्सकडून मिळवलेल्या अभिप्रायांना एकत्र करत FZ-RAVE बाजारपेठेत FZ ब्रँडची उपस्थिती वाढवते, ज्यामधून आजच्या पिढीशी संलग्न होणाऱ्या मोटरसायकल्स डिझाइन करण्याप्रती यामाहाची कटिबद्धता दिसून येते.