- पहिल्या टप्प्यात १० सरकारी शाळांमधील ३००० हून अधिक विद्यार्थ्यांना फायदा होणार.
- राज्यातील द्वितीय व तृतीय श्रेणीच्या जिल्ह्यांमधील शिक्षण परिसंस्थेत परिवर्तन घडवून आणण्याचा मनसुबा.
- डिजिअरिवू इयत्ता १२वीच्या विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन देखील करेल.
- तामिळनाडू सरकारचे माननीय शालेय शिक्षण मंत्री थिरू डॉ. अनबिल महेश पोयमोझी यांच्या हस्ते लाँच करण्यात आले.
चेन्नई, भारत – नोव्हेंबर १९, २०२५ – सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँडने युनायटेड नेशन्स ग्लोबल कॉम्पॅक्ट नेटवर्क इंडिया (यूएन जीसीएनआय) सोबत सहयोगाने आज शिक्षण उपक्रम ‘डिजिअरिवू – तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे सक्षमीकरण’ लाँच केला. या शिक्षण उपक्रमाचा तामिळनाडूमधील डिजिटल आणि विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी व गणित (एसटीईएम) शिक्षण दृढ करण्याचा मनसुबा आहे.

या उपक्रमाच्या माध्यमातून सॅमसंग शालेय पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करेल, एसटीईएम व डिजिटल अध्ययन सक्षम करेल, शिक्षकांना प्रशिक्षित करेल आणि तामिळनाडू येथील कांचीपुरम व राणीपेट जिल्ह्यांतील १० सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला साह्य करेल, ज्यामुळे ३००० हून अधिक विद्यार्थ्यांना फायदा होईल. डिजिअरिवूचा भाग म्हणून सॅमसंग बहुआयामी, समुदाय-केंद्रित मॉडेल सादर करेल, ज्यासह द्वितीय व तृतीय श्रेणीच्या जिल्ह्यांमधील शिक्षण परिसंस्थेमध्ये परिवर्तन घडून येईल.
हा उपक्रम यूएन जीसीएनआयचे संशोधन, तसेच राज्य सरकार-संचालित शाळा, श्रीपेरूंबुदूर उत्पादन प्लांटमधील सॅमसंगचे कर्मचारी व प्रांतांमधील समुदाय सदस्यांकडून माहितीच्या आधारावर डिझाइन करण्यात आला आहे, ज्यामुळे खात्री मिळते की, हस्तक्षेप प्रत्यक्ष गरजांची पूर्तता करतात.
प्रमुख फोकस क्षेत्रांमध्ये बिल्डिंग अॅज लर्निंग एड (बीएएलए) डिझाइन्सच्या माध्यमातून शाळांमधील विद्यमान शिक्षण परिसंस्था अपग्रेड करणे, शालेय विद्यार्थ्यांमध्ये डिजिटल अध्ययनाला चालना देण्यासाठी साहित्य प्रदान करणे यांचा समावेश आहे. हा उपक्रम एसटीईएम थीम्स व शिक्षक-प्रशिक्षण सत्रांवर क्रियाकलाप-आधारित अध्ययन देईल. सॅमसंग देखील स्पोर्ट्स किट्स प्रदान करेल आणि तामिळ, इंग्रजी व स्पर्धात्मक परीक्षांची पुस्तके असलेले ग्रंथालय स्थापित करेल. हा उपक्रम इयत्ता १२वी च्या विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन देईल, शिक्षण तज्ञ प्रवक्ता सिरीज देईल आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी आरोग्य जागरूकता शिबिरे राबवेल. या उपक्रमांतर्गत शाळांमध्ये समुदाय सदस्यांसोबत महत्त्वाचे दिवस व कार्यक्रम देखील साजरे केले जातील.
कोट्टुपुरममधील द अण्णा सेन्टेनरी लायब्ररीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या लाँच इव्हेण्टला तामिळनाडू सरकारचे माननीय शालेय शिक्षण मंत्री थिरू डॉ. अनबिल महेश पोयमोझी आणि कांचीपुरम व राणीपेटच्या जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थिती दाखवून कार्यक्रमाची शोभा वाढवली. यासह राज्यातील एसटीईएम शिक्षण दृढ करण्याप्रती आणि डिजिटल समावेशनाला चालना देण्याप्रती राज्याची कटिबद्धता अधिक दृढ झाली आहे.
”सॅमसंगचा नेहमी विश्वास आहे की, तंत्रज्ञानाने सर्वत्र तरूणांसाठी उपलब्धता, संधी व आत्मविश्वास वाढवल्यास ते अधिक शक्तिशाली बनतात. डिजिअरिवूच्या माध्यमातून आम्ही डिजिटली-सक्षम शिक्षण वातावरण निर्माण करत आहोत, ज्यामुळे तामिळनाडूमधील विद्यार्थ्यांना भविष्यासाठी सुसज्ज कौशल्ये निर्माण करण्यास, त्यांची जिज्ञासूवृत्ती वाढविण्यास आणि भारतातील झपाट्याने विकसित होत असलेल्या डिजिटल अर्थव्यवस्थेमध्ये पूर्णपणे सहभाग घेण्यास मदत होईल. आम्ही तंत्रज्ञान सादर करण्यासोबत शिक्षकांचे सक्षमीकरण, समुदायांची प्रगती करण्यावर देखील लक्ष केंद्रित केले आहे. तसेच आम्ही खात्री घेत आहोत की, पार्श्वभूमीकडे न पाहता प्रत्येक मुलाला दर्जेदार डिजिटल शिक्षणामधून फायदा होऊ शकतो. डिजिअरिवू ‘पॉवरिंग डिजिटल इंडिया’ आणि भारतातील भावी टॅलेंट समूहाला निपुण करण्याप्रती आमच्या विद्यमान कटिबद्धतेमधील आणखी एक महत्वपूर्ण पाऊल आहे,” असे सॅमसंग चेन्नई प्लांटचे व्यवस्थापकीय संचालक एसएच यून म्हणाले.
”डिजिअरिवूमधून निदर्शनास येते की, व्यवसाय व समाज उद्देशासह एकत्र आल्यास अर्थपूर्ण सहयोग उत्तम कामगिरी करू शकतो. यूएन ग्लोबल कॉम्पॅक्ट नेटवर्क इंडियामध्ये आम्हाला तामिळनाडू येथील सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांकरिता एसटीईएम शिक्षण आणि डिजिटल उपलब्धता प्रगत करण्यासाठी सॅमसंगसोबत सहयोग करण्याचा अभिमान वाटतो. या उपक्रमामधून यूएनच्या सस्टेनेबल डेव्हपमेंट गोल्स (एसडीजी)चा उत्साह दिसून येतो, तसेच खात्री मिळते की, भारताच्या डिजिटल भविष्यामध्ये कोणतेही मूल मागे राहणार नाही,” असे यूएन जीसीएनआयचे कार्यकारी संचालक रत्नेश झा म्हणाले.
डिजिअरिवू व्यतिरिक्त सॅमसंग सॅमसंग इनोव्हेशन कॅम्पस (एसआयसी) उपक्रमाच्या माध्यमातून तामिळनाडूमधील तरूणांना कुशल करत आहे. यंदा एसआयसी अंतर्गत सॅमसंग तामिळनाडूमधील ५,००० विद्यार्थ्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इंटरनेट ऑफ थिंग्ज, बिग डेटा आणि कोडिंग अँड प्रोग्रामिंग अशा उच्च मागणी असलेल्या भावी तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये प्रशिक्षण देत आहे. आघाडीच्या प्रशिक्षण व कौशल्य संस्थांसोबत सहयोगाने हा उपक्रम राबवला जात आहे, ज्यासह तामिळनाडूमधील विद्यार्थी उद्योग-संबंधित टेक्निकल कौशल्ये आत्मसात करण्यास आणि त्यांची रोजगारक्षमता वाढवण्यास सक्षम होत आहेत. एसआयसीच्या माध्यमातून सॅमसंग राज्यातील तरूण विद्यार्थ्यांना झपाट्याने विकसित होत असलेल्या भावी तंत्रज्ञान अर्थव्यवस्थेमध्ये करिअर घडवण्यासाठी सक्षम होण्यासाठी मदत करत आहे.