पार्ले ॲग्रोने भारतीय लस्सी मार्केटमध्ये एका नवीन युगाचे पदार्पण करत स्मूध लस्सी लॉंच केली.

News Service

पेट पॅकेजिंग मध्ये उपलब्ध एकमेव राष्ट्रीय लस्सी ब्रॅंड म्हणून उठून दिसलेल्या याची किंमत  रु २०~ आहे

राष्ट्रीय, नोव्हेंबर २०२४: भारतीय पेय मार्केटमध्ये नवसंशोधनास चालना देण्यासाठी प्रसिध्द  पार्ले ॲग्रोने स्मूध लस्सी लॉंच केली, त्यांच्या वाढत्या डेअरी उत्पादनांच्या प्रकारांत भारतीय दूध प्रकाराची पुन्हा व्याख्या करण्यास सुसज्ज अशी नवी जोड.  लस्सी प्रकारातील सर्वात मोठ्या अशा या उत्तेजक लॉंचला विस्तृत बहु-चॅनल मोहिमेचा पाठिंबा मिळाला व  याचा ब्रॅन्ड अंबॅसॅडर वरुण धवन आहे.

स्मूध लस्सीद्वारे, पार्ले ॲग्रोने,  लस्सी या पेयास आनंद व मग्नतेच्या अधिक उंचीवर नेऊन ठेवले. दह्याच्या ५०% अंशामुळे, ही लस्सी खूपच घट्ट व क्रीमी बनते आणि स्वादिष्ट, आनंददायक व समाधानकारक लस्सीपानाचा आनंद देते. ताजीतवानी व आरामदायक अशी गुलाबाची हलकीशी चव असणारी स्मूध लस्सी अभिजात व पारंपारिक लस्सीची चव देऊ करते  झटपट स्नॅक, कौटुंबिक मेळावा, पाहुणचार किंवा नुसतेच ताजे करणार्‍यासाठी पिक-अप म्हणून, अशा आरामदायक क्षणांसाठी परिपूर्ण असे हे पेय आहे.

त्याच्या पॅकेजिंगमुळे स्मूध लस्सी आणखीच एकमेव बनते. पार्ले ॲग्रो ही अत्त्युत्कृष्ट जंतूविरहित पेट पॅकेजिंगमध्ये २० रुपयांत १८० मिलिलीटर अशा प्रतिस्पर्धात्मक किंमतीत लस्सी देऊ करणारी राष्ट्रीय स्तरावरील एकमेव कंपनी आहे. याचे नवसंशोधित पॅकेजिंग लस्सी ट्रान्स फॅट्स आणि प्रिझर्व्हेटिव्ह्ज विरहित आहे  याची खात्री करते आणि त्या बरोबरच संपूर्ण आणि दर्जेदार सेवनासाठी सहा महिन्याचे शेल्फ लाईफ देऊ करते. त्याचे चैतन्यपूर्ण आणि आधुनिक डिझाइन नेत्राकर्षक आणि आवडणारे असून त्यामुळे ते गजबजाट असलेल्या मार्केटमध्ये उठून दिसते. या व्यतिरिक्त, त्याच्या तारुण्यपूर्ण रूप आणि सोयिस्कर आकारामुळे ते ये-जा करताना सेवनासाठी आदर्श ठरते.

पार्ले ॲग्रो त्यांची स्मूध लस्सीची ३६० अंश मोहिम,  त्यांचा ब्रॅन्ड अंबॅसॅडर वरुण धवनच्या भूमिकेने धडाक्यात सुरू केली. सर्वोच्च लस्सी अनुभवाच्या शोधातील ग्राहक आणि तो अनुभव देणारा दुकानदार अशा धवनच्या दोन्ही  भूमिका, या स्मूध लस्सीचा उत्तम दर्जा आणि तोंडाला पाणी आणणारी चव उजेडात आणतात. हे स्मूध लस्सीचा क्रीमी पोत, आनंददायक स्वाद आणि ताजेपणा देणारे गुण यांवर भर देते.

स्मूध लस्सीच्या लॉंचवर वक्तव्य करताना पार्ले ॲग्रोच्या सह-व्यवस्थापकीय संचालिका नादिया चौहान म्हणाल्या, ” लस्सी हे भारतीय संस्कृतीत रुजलेले पेय असून त्यात लक्षणीय मार्केट क्षमता आहे. स्मूध लस्सी हे अभिजात पेयाचे आमचे  तसेच  नवसंशोधित रूप असून आम्ही आधुनिकतेसह परंपरेचा मिलाप करत एक अत्त्युत्कृष्ट, मलाईदार व समृध्द असे उत्पादन सादर करत आहोत, दर्जा, चव आणि पोषण  व आरोग्य मूल्यावर ध्यान केंद्रित करत ग्राहकांच्या अपेक्षा ओलांडण्यासाठी आम्ही स्मूध लस्सी काळजीपूर्वकतेने बनवली आहे  वरुण धवनसह आमची मोहिम, स्मूध लस्सीने ग्राहकांशी सूर जुळवण्यासाठी, गजबजलेल्या लस्सी मार्केट मध्ये उठून दिसणारा पर्याय म्हणून स्थान निर्माण करण्यासाठी तयार करण्यात आली आहे. या मार्गाद्वारे, उत्पादन अधिक ठळकपणे उठून दिसणे आणि पेयाशी संबंधित नाविन्यपूर्ण संशोधनात आमचे अग्रगण्य स्थान बळकट करणे ही आमची उद्दिष्टे आहेत.

पेयाच्या या क्षेत्रात उद्योगाचे मापदंड उंचावण्याबरोबरच, भारतातील बर्‍याच मोठ्या व  बहुतांशी असंघटित अशा  ३००० कोटी+ (अंतर्गत अंदाजांच्या आधारे) आकाराच्या किरकोळ लस्सी बाजारपेठेत स्मूध लस्सी सादर करणे हे पार्ले ॲग्रोचे धोरणात्मक पाऊल आहे. पॅकेज न केलेल्या लस्सींंचे प्रकार प्रचंड तर आहेतच पण त्या बरोबरच पॅकेज्ड क्षेत्रात राष्ट्रीय उपस्थितीचा अभाव आहे. पार्ले ॲग्रो, स्मूध लस्सीच्या माध्यमातून भारतातील “लस्सी प्रकारांना” आकार देऊन व त्यांचा विकास करून आपल्या नेतृत्वाचा लाभ घेऊ इच्छितात.

स्मूध लस्सी संपूर्ण देशभर उपलब्ध असून ती शहरी आणि ग्रामिण अशा दोन्ही ग्राहकांसाठी सहजपणे मिळण्याची खात्री आहे.

खालील लिंकवर स्मूध वरील टीव्हीसी पहा.

पार्ले ॲग्रोने भारतीय लस्सी
पार्ले ॲग्रोने भारतीय लस्सी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button