भागीदारीमुळे ब्रॅण्डची ओम्नीचॅनेल पोहोच विस्तारली असून त्यामुळे ग्राहकांना गॅलेक्सी इनोव्हेशन्स अधिक वेगाने व अधिक सुलभतेने उपलब्ध होणार आहेत
भारत – डिसेंबर 2025 – भारताचा सर्वात मोठा कझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स ब्रॅण्ड सॅमसंगने आज प्रमुख शहरांमध्ये गॅलेक्सी श्रेणीतील उत्पादने झटपट उपलब्ध करून देण्यासाठी भारतात क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म्स पाया रचणारी कंपनी इन्स्टामार्टशी आपल्या भागीदारीची घोषणा केली.
या सहयोगातून सॅमसंग गॅलेक्सी स्मार्टफोन्स, टॅब्लेट्स, वेअरेबल्स आणि अॅक्सेसरीजची विस्तृत श्रेणी झटपट व सुलभतेने उपलब्ध होणार आहे. ग्राहक निवडक गॅलेक्सी उपकरणे इन्स्टामार्टवरून ऑर्डर करू शकतील व अवघ्या काही मिनिटांत ती घरपोच प्राप्त करू शकतील.
“सॅमसंगमध्ये, सर्वांना सहज उपलब्ध असणाऱ्या अर्थपूर्ण नवसंकल्पना आमच्यासाठी प्रेरणादायी ठरतात. इन्स्टामार्टसोबतची आमची भागीदारी म्हणजे आमचे ओम्नीचॅनेल धोरण अधिक दृढ करण्याच्या व यूजर्सना अगदी काही मिनिटांत गॅलेक्सी अनुभव उपलब्ध करून देण्याच्या दिशेने उचललेले आणखी एक पाऊल आहे. आम्ही आमची सर्वात पसंतीची उपकरणे यूजर्सच्या अधिक जवळ आणत आहोत.” सॅमसंग इंडियाच्या एमएक्स बिझनेस विभागाचे डायरेक्टर राहुल पाहवा म्हणाले.
“इन्स्टामार्टमध्ये आपल्या ग्राहकांच्या बदलत्या जीवनशैलींचा आगाऊ अंदाज बांधणे व त्यांच्याशी जुळवून घेणे हे नेहमीच आमचे लक्ष्य राहिले आहे. सॅमसंगबरोबर थेट भागीदारी करून आम्ही उच्च दर्जाची उपकरणे फक्त काही टॅप्स आणि 10 मिनिटांच्या अंतरावर असल्याची हमी देत आहोत व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात खरीखुरी सुलभता काय असते, याची नवी व्याख्या घडवित आहोत.” इन्स्टामार्टचे एव्हीपी मनेंदर कौशिक म्हणाले.
ही भागीदारी विविध विक्रीमाध्यमांमधील आपले कार्यक्षेत्र विस्तारण्याप्रती व वेग आणि सहजप्राप्यतेचे मोल असलेल्या ग्राहकांच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्याप्रती सॅमसंगने जपलेल्या कटिबद्धतेशी मेळ साधणारी आहे. इन्स्टामार्टशी भागीदारी करून सॅमसंगने आपली रिटेल परिसंस्था अधिक भक्कम बनवली आहे व वेगवेगळ्या किंमतगटांतील ग्राहकांना गॅलेक्सीच्या तंत्रज्ञानाचा सुलभतेने अनुभव घेता यावा, याची खातरजमा केली आहे.