मुंबई, 10th डिसेंबर, २०२५ – कॅन्सर केअर अधिक प्रमाणात उपलब्ध करून देण्याच्या दिशेने महत्वपूर्ण पाऊल उचलत कोटक महिंद्रा प्राइम लिमिटेड (केएमपीएल)ने टाटा मेमोरिअल सेंटरचा भाग अॅडवान्स्ड सेंटर फॉर ट्रीटमेंट, रिसर्च अँड एज्युकेशन इन कॅन्सर (एसीटीईआरसी) सोबत सहयोग केला आहे. या सहयोगांतर्गत नवी मुंबईमधील खारघर येथील त्यांच्या प्रोटोन थेरपी सेंटरमध्ये एसडीएक्स® व्हॉल्यूण्टरी ब्रेद होल्ड सिस्टम इन्स्टॉल करण्यात येईल. श्री. सूजर राजाप्पन (अध्यक्ष व पूर्ण वेळ संचालक, केएमपीएल), तसेच श्री. मुरलीधरन एस. (व्यवसाय प्रमुख, केएमपीएल) यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
हे प्रगत तंत्रज्ञान डॉक्टरांना अचूक रेडिएशन थेरपी देण्यास, तसेच रूग्णांना उपचारदरम्यान त्यांचा श्वास रोखून धरण्याकरिता मार्गदर्शन करण्यास मदत करेल, जे विशेषत: फुफ्फुसाचा कर्करोग, यकृताचा कर्करोग, स्वादुपिंडाचा कर्करोग आणि स्तनाचा कर्करोग यावरील उपचारासाठी महत्त्वाचे आहे, जेथे श्वासोच्छवासामुळे ट्यूमर्स स्थानांतरित होऊ शकतात. एसडीएक्स® सिस्टम फक्त ट्यूमरवर रेडिएशन जाण्याची खात्री देते, ज्यामुळे आरोग्यदायी अवयवांचे संरक्षण होते आणि उपचार निष्पत्ती वाढते.
ही सिस्टम का महत्त्वाची आहे?
• प्रोटोन थेरपी कर्करोगावरील सर्वात प्रगत उपचार आहे. हा सहयोग सर्वाधिक गरज असलेल्या रूग्णांना सर्वात प्रगत कॅन्सर उपचार उपलब्ध असण्याची खात्री देतो.
• एसडीएक्स® सिस्टम तंत्रज्ञान एसीटीआरईसीच्या प्रोटोन थेरपी सेटअपशी सुसंगत आहे, ज्यामुळै मोशन-सेन्सिटिव्ह कर्करोगांवर सुरक्षितपणे व प्रभावीपणे उपचार करण्यासाठी आवश्यक आहे.
• उदाहरणार्थ, या सिस्टमशिवाय यकृताचा कर्करोगासाठी प्रोटोन थेरपी श्वासोच्छवासादरम्यान अवयवाच्या हालचालीमुळे (जवळपास ३ सेमी) सुरक्षित असू शकत नाही.
• या अपग्रेडसह एसीटीआरईसी आता प्रोटोन-आधारित एसबीआरटी (स्टेरिओटॅक्टिक बॉडी रॅडिएशन थेरपी) देऊ शकते. ही अत्यंत अचूक, उच्च डोस उपचार पद्धत जगण्याची शक्यता वाढवते आणि दुष्परिणाम कमी करते.
समान आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याप्रती कटिबद्धता
एसीटीआरईसी दरवर्षाला ३५,००० हून अधिक रूग्णांवर उपचार करते, ज्यापैकी बहुतांश आर्थिकदृष्ट्या कमकुवत पार्श्वभूमींमधील असतात. हा सहयोग सर्वाधिक गरज असलेल्या रूग्णांना सर्वात प्रगत कर्करोग उपचार सेवा उपलब्ध असण्याची खात्री देतो.
डॉ. राहुल कृष्णर्ती, प्रोफेसर, डिपार्टमेंट ऑफ रॅडिएशन ऑन्कोलॉजी, जीआय डीएमजी, टीएमसी, मुंबई म्हणाले, ”एसडीएक्स सिस्टम मोशन-व्यवस्थापित रॅडिएशन उपचारापीसाठी गेम-चेंजर आहे. यकृताचा कर्करोग व स्वादुपिंडाचा कर्करोग यावर उपचार करताना श्वासोच्छवासामुळे ट्यूमरचे स्थान बदलत राहते, ज्यामुळे अचूक उपचार करणे आव्हनात्मक होऊन जाते. या अपग्रेडसह आम्ही आता रूग्णांना प्रोटोन-आधारित एसबीआरटी (स्टेरिओटॅक्टिक बॉडी रॅडिएशन थेरपी) देण्यास सुसज्ज आहोत, अन्यथा त्यांना मर्यादित पर्याय उपलब्ध होते. या उपचारासह जगण्याची शक्यता वाढण्यासोबत कर्करोगाचा त्रास कमी होतो.”
एसीटीआरईसीचे संचालक डॉ. पंकज चतुर्वेदी म्हणाले, ”एसडीएक्स® व्हॉल्युण्टरी ब्रेद होल्ड सिस्टम एसीटीआरईसीच्या प्रोटोन थेरपी सेटअपशी सुसंगत असलेले एकमेव तंत्रज्ञान आहे, ज्यामुळे मोशन-सेन्सिटिव्ह कर्करोगांवर सुरक्षितपणे व प्रभावीपणे उपचार करण्यासाठी महत्त्वाचे आहे. मी रेडिएशन ऑन्कोलॉजी विभागाचे अभिनंदन करतो, जे सतत त्यांचे तंत्रज्ञान अपग्रेड व अपडेट करत सर्वाधिक गरज असलेल्या रूग्णांना सर्वात अत्याधुनिक उपचार पर्याय देण्याचा प्रयत्न करते. टीएमसीच्या वतीने मी हे सामाजिक कार्य ओळखण्यासह त्याप्रती योगदान देण्यासाठी कोटक महिंद्रा प्राइम लिमिटेडचे आभार व्यक्त करतो. मी आमच्या कॅम्पसमध्ये खुल्या मनाने त्यांचे स्वागत करतो आणि भावी संधींसह आमच्या रूग्णांना व राष्ट्रनिर्मितीमधील आमच्या प्रयत्नांमध्ये मदत करण्यास उत्सुक आहे. एसडीएक्स® व्हॉल्युण्टरी ब्रेद होल्ड सिस्टम स्मार्ट ब्रेद-होल्डिंग कोच सारखी आहे, जी रूग्ण व डॉक्टरांना एकत्रित काम करत सुरक्षितपणे अत्यंत अचूक रेडिएशन थेरपी देण्यास मदत करते. हे लहान परिवर्तन कर्करोगावरील उपचारामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणेल.”
उद्देशासह सीएसआर
हा उपक्रम केएमपीएलच्या आरोग्यसेवेवरील फोकस क्षेत्रांतर्गत कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलटी (सीएसआर) कटिबद्धतेचा भाग आहे. केएमपीएल दर्जेदार आरोग्यसेवा, तसेच पायाभूत सुविधेमधील अपग्रेड्स आणि प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञान उपलब्ध करून देणाऱ्या प्रकल्पांना पाठिंबा देते.
”केएमपीएलमध्ये आमचा विश्वास आहे की, सर्वाधिक गरज असलेल्या व्यक्तींना जागतिक दर्जाच्या आरोग्यसेवा उपलब्ध असल्या पाहिजेत. टाटा मेमोरिअल सेंटरसोबत या सहयोगाच्या माध्यमातून आम्हाला त्यांच्या एसीटीआरईसीला प्रत्येक रूग्णाला जागतिक दर्जावर प्रशंसित त्यांच्या कॅन्सर केअर सेवा देण्यामध्ये साह्य करण्याचा अभिमान वाटतो,” असे कोटक महिंद्रा प्राइम लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी शाहरूख तोडीवाला म्हणाले.