महाराष्‍ट्रातील ठाणे, पालघर सह तीन नवीन जिल्‍ह्यांमध्‍ये स्‍वदेस फाऊंडेशनने आपला विस्‍तार केला

News Service
  • १ दशलक्षहून अधिक ग्रामीण नागरिकांच्‍या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणणार
  • ३ नवीन भौगोलिक क्षेत्रांमध्‍ये विस्‍तारासह स्‍वदेस ग्रामीण भागाच्‍या परिवर्तनाप्रती विकासात्‍मक, समुदाय-केंद्रित दृष्टिकोनाच्‍या माध्‍यमातून महाराष्‍ट्रातील पाच जिल्‍ह्यांमध्‍ये तळागाळापासून बदल घडवून आणत आहे

मुंबई, भारत, 17 डिसेंबर: स्‍वदेस फाऊंडेशन या सर्वांगीण, समुदाय-केंद्रित, ग्रामीण सक्षमीकरणाप्रती कटिबद्ध असलेल्‍या संस्‍थेने महाराष्‍ट्रातील आपली उपस्थिती वाढवण्‍याची घोषणा केली आहे. रायगड व नाशिकमध्‍ये मोठ्या प्रमाणात उत्तम कामगिरी केल्‍यानंतर फाऊंडेशन आता नवीन प्रातांमध्‍ये आपल्‍या समुदाय-केंद्रित मॉडेलचा विस्‍तार करत आहे. हे नवीन प्रांत आहेत पालघरमधील जव्‍हान व मोखाडा, ठाणेमधील शहापूर आणि नंदूरबारमधील महत्त्वाकांक्षी जिल्‍हा अक्‍कलकुवा, तसेच नाशिकमधील काळवण आणि दिंडोरी. या विस्‍तारीकरणामध्‍ये जवळपास २.३३ लाख ग्रामीण कुटुंबांना आणि जवळपास १.२ दशलक्ष व्‍यक्‍तींना उत्तम सेवा दिल्‍या जातील, ज्‍यासह संस्‍थेची सामाजिक प्रभाव घडवून आणण्‍याची क्षमता वाढेल. संबंधित जिल्‍हा परिषदांनी अधिकृतरित्‍या स्‍वागत केलेल्‍या स्‍वदेस टीमने सर्वसमावेशक पायाभूत सर्वेक्षण सुरू केले आहे, जे प्रत्‍येक समुदायासाठी गरजेनुसार विकासात्‍मक उपाययोजना डिझाइन करण्‍याच्‍या दिशेने पहिले पाऊल आहे. यासह, फाऊंडेशन आता महाराष्‍ट्रातील ५ जिल्‍ह्यांमध्‍ये आणि १७ तालुक्‍यांमध्‍ये ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात परिवर्तनाला गती देईल.

स्‍वदेस फाऊंडेशन दर पाच वर्षांनी समुदाय-केंद्रित परिवर्तनाच्‍या माध्‍यमातून भारतातील ग्रामीण भागामधील एक दशलक्ष व्‍यक्‍तींना दारिद्र्यामधून बाहेर काढण्‍याच्‍या आपल्‍या मिशनप्रती कटिबद्ध आहे. ११,६०० हून अधिक सामुदायिक स्‍वयंसेवकांच्‍या नेटवर्कच्‍या माध्‍यमातून संस्‍था आतापर्यंत १.१ दशलक्ष व्‍यक्‍तींपर्यंत पोहोचली आहे, तसेच ६००,००० व्‍यक्‍तींच्‍या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणला आहे. संस्‍थेच्‍या एकीकृत विकास मॉडेलने जल, स्‍वच्‍छता, आरोग्‍य, शिक्षण व आर्थिक विकासामध्‍ये १.३ दशलक्षहून अधिक अद्वितीय उपाययोजना राबवल्‍या आहेत आणि उदरनिर्वाह उपक्रमांच्‍या माध्‍यमातून देशाच्‍या जीडीपीमध्‍ये १.२६ बिलियन रूपयांचे योगदान दिले आहे.

या विस्‍तारीकरणाबाबत मत व्‍यक्‍त करत स्‍वदेस फाऊंडेशनचे सह-संस्‍थापक झरीना व रॉनी स्‍क्रूवाला म्‍हणाले, ”आमच्‍या समुदाय-केंद्रित, सर्वांगीण मॉडेलचा प्रभाव अद्वितीय राहिला आहे, जो प्रत्‍यक्ष व मानसिक दारिद्र्यतेचे निराकरण करतो, महत्त्वाकांक्षा जागृत करतो आणि सामुदायिक स्थिरता दृढ करतो. या मॉडेलने आम्‍हाला दाखवून दिले आहे की, व्‍यक्‍तींचा स्‍वत:वर विश्वास असेल तर अशक्‍य गोष्‍टी देखील शक्‍य होतात. महाराष्‍ट्र सरकारचा सतत पाठिंबा, आमच्‍या देणगीदारांचे उदार कार्य आणि आमच्‍या सामुदायिक मोहिमांसह आम्‍ही आमचे कार्य आता ५ जिल्‍ह्यांमधील १७ तालुक्‍यांपर्यंत विस्‍तारत आहोत. यामुळे आम्‍हाला सर्वात गरीब व सर्वात वंचित समुदायांपर्यंत, तसेच अधि‍काधिक आदिवासी लोकांपर्यंत पोहोचण्‍यास मदत होईल. महाराष्‍ट्र सरकारसोबत आमच्या १,००० ड्रिम व्हिलेज एलओआयशी बांधील राहत आम्‍ही आता ठाणे, पालघर व नंदूरबार येथे ड्रिम व्हिलेजेस् निर्माण करण्‍यास उत्‍सुक आहोत, तसेच आम्‍ही रायगड व नाशिकमधील कार्य सुरूच ठेवू.”

कोकण विभागाचे विभागीय आयुक्‍त विजय सुर्यवंशी म्‍हणाले, ”मी पालघर व ठाणेमध्‍ये स्‍वदेस फाऊंडेशनचे स्‍वागत करतो. या फाऊंडेशनने त्‍यांच्‍या ड्रिम व्हिलेज मॉडेलच्‍या माध्‍यमातून रायगड आणि नाशिकमध्‍ये उल्‍लेखनीय कामगिरी केली आहे. हे मॉडेल प्रत्‍येक वर्षासह सुरेखरित्‍या विकसित झाले आहे. या गावांनी उत्तम प्रगती दाखवली आहे, तसेच आपल्‍या प्रयत्‍नांमध्‍ये प्रथम समुदायाला प्राधान्‍य दिले आहे. मी इतर जिल्‍ह्यांमधील गावांना देखील फाऊंडेशनच्‍या मार्गदर्शनांतर्गत, तसेच प्रत्‍यक्ष परिवर्तनाला चालना देणाऱ्या समुदायांची सहयोगात्‍मक ताकद व नेतृत्‍वाच्‍या माध्‍यमातून प्रगत होताना पाहण्‍यास उत्‍सुक आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button