कोलकाता येथील सुप्रसिद्ध समकालीन चित्रकर्ती स्वाती रॉय यांचे ‘व्हॉयेज’ हे एकल चित्र प्रदर्शन नेहरू सेंटर कलादालन, डॉ. आणि बेझंट रोड, वरळी, मुंबई ४०००१९ येथे १९ ते २५ नोव्हेम्बर, २०२४ ह्या दरम्यान भरणार आहे. ते तेथे सर्वांना रोज सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत विनामूल्य बघता येईल. ह्या प्रदर्शनात तिने जलरंगात (Gauche) तंत्रशैलीचा वापर करून आर्ट पेपरवर तयार केलेली विविधलक्षी चित्रे ठेवण्यात येतील.
स्वाती रॉय यांचे कलाशिक्षण गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ आर्ट अँड क्राफ्ट, कोलकाता येथे डिप्लोमा इन फाईन आर्ट्स व त्यानंतर डिप्लोमा इन इंडियन स्टाईल – ड्रॉइंग व पेंटिंग – पर्यंत झाले. नंतर तिने भारतातील अनेक शहरातील सुप्रसिद्ध कलादालनातून एकल व सामूहिक चित्रप्रदर्शनातून आपली कलात्मक चित्रे रसिकांपुढे सादर केलीत. अकॅडेमी ऑफ फाईन आर्टस्, कोलकाता, ललित कला अकादमी नवी दिल्ली,जहांगीर आर्ट गॅलरी, मुंबई, इंडिया हॅबिटॅट सेंटर नवी दिल्ली, ललित ग्रेट ईस्टर्न कोलकाता, आर्टिस्ट सेंटर मुंबई, लीला आर्ट गॅलरी, मुंबई, बिर्ला अकादमी ऑफ आर्ट अँड कल्चर कोलकाता, रामकृष्ण मिशन चित्रप्रदर्शन, गोलपार्क, कोलकाता, चित्रम आर्ट गॅलरी, कोचीन, सिनेगॉग आर्ट, कोचीन वगैरे बरीच नामवंत कलादालनातून आपली चित्रे प्रदर्शनातून सर्वांपुढे मांडलीत. तसेच सृष्टी आर्ट कॅम्प कोलकाता, कोलकाता मेट्रोपोलिटन आर्ट फेअर कोलकाता, बंगला देश – डाका कॉन्टेम्पररी आर्ट शो – बिर्ला अकादमी ऑफ आर्ट अँड कल्चर , कोलकाता, मान्सून आर्ट शो – लीला आर्ट गॅलरी, मुंबई, इंडियन नॅशनल फॉर्म ऑफ आर्ट अँड कल्चर कोलकाता, गव्र्हनमेन्ट कॉलेज ऑफ आर्ट अँड कल्चर, कोलकाता येथे आयोजित केलेले विविध कॅम्पस वर्कशॉप वगैरेमध्ये तिने सक्रिय भाग घेऊन कलाक्षेत्रात आपले बहुमूल्य योगदान दिले आहे. ती बिर्ला अकादमी ऑफ आर्ट अँड कल्चर कोलकाता येथे ‘फँटसी’ ह्या कलाप्रवर्तक संस्थेची फाउंडर मेम्बर, व कोलकाता येथील बंगाल कोलकाता REFI आर्टिस्ट असोशिनं तर्फे कोलकाता येथे आयोजित कॅम्प, प्रदर्शन व वर्कशॉप PTTI आर्टिस्ट अससोसिएन येथे आयोजित कॅम्प प्रदर्शन व वर्कशॉप प्रदर्शन ह्यात तिचा नेहमी सक्रिय सहभाग आहे. तिला आय.आय.टी. खरगपूर येथे आयोजित स्प्रिंग कला महोत्सव साऊथ कोलकाता स्काऊट अँड गाईड असोशिनं तर्फे आयोजित कलाविषयक उपक्रमांसाठी सन्माननीय ज्युरी म्हणून तिला बोलावले होते व तिचा गौरव केला गेला. तिची चित्रे अनेक नामवंत कलासंग्राहकांकडे संग्रही आहेत. त्यात भारतातील व विदेशातील बऱ्याच प्रसिद्ध संग्राहकांचा समावेश होतो.
प्रस्तुत चित्र प्रदर्शनात ठेवण्यात येणारी स्वाती रॉय यांची कलात्मक चित्रे जलरंगात आर्ट पेपरवर बनविलेली असून त्यात तिने गॉचे ह्या तंत्रशैलीचा वापर केला आहे. तिला निसर्ग, त्याचे विविध वैभव आणि वेगवेगळ्या ऋतूत व वातावरणात बहरणार ते सौंदर्य आणि त्याचा संवेदनशील मानवी मनावर होणारा परिणाम ह्याची आवड आहे व तिची चित्रे ह्या संकल्पनेवर आधारित आहे. सूक्ष्म निरीक्षण व तीव्र अवलोकनशक्ती ह्यांचा योग्य वापर करून मनःपटलावर तयार होणाऱ्या निसर्गवैभवाच्या स्मृती व संवेदना ह्यातून कलात्मक समन्वय मांडून तिने एक्सप्रेशनिस्ट, फॉर्म्यालिझम, व रिप्रेझेंन्टेन्शन्यालिझम वगैरेसारख्या अनेक कलात्मक तंत्र शैलीचा उपयोग करून साधलेली चित्रनिर्मिती अवर्णनीय आहे. ह्यात बाह्य निरीक्षणासोबत तिने केलेल्या संवेदनशील भावनोत्कटतेचा विचार समाविष्ट केला आहे. त्यामुळे ही बोलकी चित्रे मुख्य सामान्य जनता, त्यांचे भावविश्व, जीवनशैली, त्यांचा जीवनातील संघर्ष वगैरे संकल्पनांशी निगडित आहेत.