हेन्‍केल आणि रोटरीने प्रोजेक्‍ट हार्मोनीच्‍या माध्‍यमातून पीओपी गणेशमूर्तीच्‍या पुनर्वापराला चालना दिली

News Service

नवी मुंबई: हेन्‍केल इंडियाने रोटरी क्‍लब ऑफ नवी मुंबई – जॉय ऑफ गिव्हिंगसोबत सहयोगाने आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्‍या (एनएमएमसी) पाठिंब्‍यासह प्रोजेक्‍ट हार्मोनी अंतर्गत अत्‍यंत प्रभावी चक्रिय पुनर्वापर उपक्रमाच्‍या माध्‍यमातून पर्यावरण संवर्धनाच्‍या दिशेने पुढाकार घेतला आहे. हा उपक्रम धार्मिक परंपरांमधून मिळणाऱ्या साहित्याचे रूपांतर समुदायासाठी दीर्घकाळ टिकणाऱ्या मालमत्तेत करतो, ज्यामुळे शाश्वत विकासाचा एकात्मिक दृष्टिकोन अधिक प्रबळ होत आहे.
या उपक्रमाचा भाग म्हणून नेरूळ येथे २०२५ च्या गणेश विसर्जनानंतर गोळा करण्‍यात आलेले साहित्य जबाबदारीने जमीन आणि जलस्रोतांमध्ये विघटन होण्‍यापासून रोखण्यात आले. नवी मुंबई महानगरपालिकेच्‍या अधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत व सहयोगाने हे साहित्य अधिकृत पुनर्वापर केंद्रात प्रक्रियेसाठी पाठवण्यात आले. या प्रक्रियेद्वारे १००० किलोपेक्षा जास्त प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी)वर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्यात आला आणि त्यापासून दिघा येथील नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ३०० अभ्यासाचे टेबल तयार करण्यात आले. यामुळे पर्यावरणाच्‍या प्रदूषणाला प्रतिबंध होण्‍यासोबत विद्यार्थ्यांसाठी टिकाऊ शैक्षणिक पायाभूत सुविधा निर्माण झाल्या आहेत.

२०२४ मध्‍ये लाँच करण्‍यात आलेला प्रकल्‍प ‘हेन्‍केल अँड रोटरी: मदर नेचर अॅण्‍ड यू’ हा प्रोजेक्‍ट हार्मोनी म्‍हणून ओळखला जातो. हा हेन्‍केल इंडियाचा प्रमुख पर्यावरणीय सीएसआर उपक्रम आहे. सहयोग आणि कर्मचाऱ्यांच्‍या स्‍वयंसेवेवर आधारित या उपक्रमामध्‍ये कॉर्पोरेट कौशल्‍य, नागरिकांचा पाठिंबा व सहयोगी एकत्र येतात, ज्‍यामधून विकासात्‍मक, प्रत्‍यक्ष पर्यावरणीय आणि सामाजिक प्रभाव घडवून आणला जातो.

या उपक्रमाबाबत मत व्‍यक्‍त करत हेन्‍केल इंडियाचे कंट्री प्रेसिडण्‍ट एस. सुनिल कुमार म्‍हणाले, ”प्रोजेक्‍ट हार्मोनीमधून शाश्वततेला मूर्त निष्‍पतींमध्‍ये बदलण्‍याप्रती आमची कटिबद्धता दिसून येते. पीओपी गणेशमूर्तींना शैक्षणिक साधनांमध्‍ये बदलत आम्‍ही चक्रिय, समुदाय-केंद्रित कृतीच्‍या माध्‍यमातून शहरातील कचरा समस्‍यांचे निराकरण करत आहोत.”

पीओपी गणेशमूर्तींचे पुनर्चक्रण: प्रदूषणापासून उद्देशापर्यंत
हा उपक्रम भारताचे रिसायकल मॅन म्हणून प्रसिद्ध असलेले डॉ. बिनीश देसाई यांच्या सहयोगाने, तसेच पुष्पम आणि न्युटेरा यांच्या माध्यमातून त्यांच्या मालकीच्या पीओपी रिसायकलिंग तंत्रज्ञानाचा वापर करून राबवण्यात आला. मल्हार कळंबे यांच्या नेतृत्वांतर्गत बीज प्लीज इंडियाच्या स्वयंसेवक टीमने विसर्जनानंतर गणेशमूर्ती गोळा करण्‍याच्‍या प्रक्रियेत मोलाची मदत केली. न्युटेराच्या प्रक्रिया आणि गुणवत्ता निरीक्षणांतर्गत पुष्पममधील महिला-संचलित हस्तनिर्मित उत्‍पादनाच्‍या माध्‍यमातून गोळा करण्‍यात आलेल्‍या साहित्‍याचे शैक्षणिक साहित्यात रूपांतर करण्यात आले. हा उपक्रम पवित्र गणेशमूर्तींच्या साहित्याच्‍या पुनर्वापराला चालना देतो आणि सांस्कृतिक संवेदनशीलता जपून पर्यावरणीय जबाबदारीची खात्री देतो.

न्‍युटेराचे संस्‍थापक डॉ. बिनीश देसाई म्‍हणाले, ”योग्‍य उद्देश व नाविन्‍यतेसह विसर्जन करण्‍यात येणाऱ्या गणेशमूर्तींचा पुनर्वापर करत दीर्घकालीन मूल्‍य निर्माण करता येऊ शकते. जबाबदार रिसायकलिंग खात्री देते की, उत्‍सवानंतर देखील समाजाला भक्‍तीचा फायदा मिळत राहिल.”

२२ जानेवारी २०२६ रोजी माघी गणेश जयंतीच्‍या मूहूर्तावर राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालय, रबाळे येथे वितरण समारोहाचे आयोजन करण्‍यात आले, जे भक्‍तीचे रूपांतरण उद्देश-केंद्रित शैक्षणिक मदतीमध्‍ये होण्‍याचे प्रतीक ठरले.
रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्‍ट ३१४२ चे २०२५-२६ चे डिस्ट्रिक्‍ट गव्‍हर्नर हर्ष माकोल म्‍हणाले, ”या उपक्रमामधून निदर्शनास येते की रोटरी, हेन्‍केल, नागरी प्रशासन आणि शाश्वतता सहयोगी यांच्‍यामधील दृढ सहयोग एकत्रितपणे पर्यावरणाच्‍या होणाऱ्या नुकसानाला थांबवू शकतो आणि समुदायावर अनुकूल प्रभाव निर्माण करू शकतो.”

प्रोजेक्‍ट हार्मोनीच्‍या माध्‍यमातून हेन्‍केल इंडिया आणि रोटरी क्‍लब ऑफ नवी मुंबई – जॉय ऑफ गिव्हिंग नवी मुंबई महानगरपालिका व सहयोगींसोबत सहयोगाने दाखवून देत आहे की चक्रिय उपाययोजना आणि सहयोग शहरातील अधिक शुद्ध, अधिक स्थिर परिसंस्‍था निर्माण करू शकतात, तसचे समुदायाच्‍या विकासाला पाठिंबा देऊ शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button