लंडन ते पुणे चा ‘शॉपफ्लोअर’: जागतिक स्तरावर शिक्षण घेतलेले तरुण देत आहेत रिटेल प्रशिक्षणाला पसंती

News Service

ज्या काळात भारतातील तरुणवर्ग जागतिक स्तरावरील कॉर्पोरेट नोकऱ्या आणि आकर्षक कार्यालयांच्या मागे धावत आहे, त्याच काळात भारतातील रिटेल शॉपफ्लोअरवरील करिअरच्या निवडीत एक आश्चर्यकारक बदल दिसत आहे- अगदी परदेशांतून शिकून आलेले पदवीधरही नोकरीसाठी सज्ज होण्याच्या उद्दिष्टाने प्रत्यक्ष रिटेल प्रशिक्षणाचा पर्याय निवडत आहेत.

त्यांच्याकडे दुसरा पर्याय उरलेला नाही हे यामागील कारण नाही. तर बरेच जण लवकर काहीतरी करण्याच्या प्रयत्नात आहेत: पदव्या दारे उघडून देतात पण एखादा उतावीळ, गोंधळलेला, ब्रॅण्ड्समध्ये तुलना करणारा आणि काही सेकंदांत उत्तराची अपेक्षा करणारा ग्राहक दारापुढे उभा राहिल्याची परिस्थिती हाताळण्यासाठी सज्ज करतातच असे नाही.

हे स्थित्यंतर सॅमसंगच्या ‘दोस्त सेल्स प्रोग्राम’मध्ये स्पष्ट दिसत आहे. तरुण व्यावसायिकांना अगदी सुरुवातीपासून व्यवसाय शिकवणारा एक रचनाबद्ध मार्ग म्हणून हा प्रोग्राम आता स्थिरावला आहे. २०२६ सालच्या विद्यार्थी समूहात हा बदल स्पष्टपणे दिसतो- या समूहातील सदस्य वेगवेगळ्या शैक्षणिक पार्श्वभूमीतून आले आहेत, यांत आंतरराष्ट्रीय विद्यापीठांतून पदवी घेतलेलेही आहेत. दीर्घकालीन करिअरसाठी पाया म्हणून प्रत्यक्ष रिटेल अनुभवाची निवड त्यांनी केली आहे.

तर दोस्त (डीओएसटी) नेमका काय आहे? साध्या शब्दांत सांगायचे तर हा रचनाबद्ध रिटेल कौशल्यविकास अभ्यासक्रम आहे, वर्गातील अध्ययन आणि प्रत्यक्ष दुकानात काम करण्याचा अनुभव यांच्या मिश्रणाद्वारे तो तरुणांना संघटित विक्रीच्या नोकऱ्यांचे प्रशिक्षण देतो. या अभ्यासक्रमातील विद्यार्थी ग्राहकांना हाताळणे, उत्पादन समजून घेणे, संवाद साधणे तसेच रिटेल ऑपरेशन्सची मुलभूत तत्त्वे शिकतात — एखादा नवशिका विक्रेता एकाच ठिकाणी चिकटून राहणार की पुढे जाणार हे याच कौशल्यांवर अवलंबून असते.

भारतातील रिटेल बाजारपेठ आता केवळ ‘विकण्यापुरती’ मर्यादित राहिलेली नाही, त्यात समस्यांवर तोडगा काढण्याचा भाग मोठा असतो. येणारा ग्राहक ऑनलाइन परीक्षणे, तुलनात्मक दर यांचा अभ्यास करून आलेला असतो आणि त्याची पक्की मते असतात. त्यामुळे शॉपफ्लोअर एग्झिक्युटिवलाही आता केवळ विक्रेता असणे पुरेसे राहिलेले नाही — त्याला वेगाने बदलत असलेल्या ग्राहक परिसंस्थेत मार्गदर्शकाचे, समस्या सोडवण्याचे तसेच विश्वास निर्माण करण्याचे काम करावे लागते.

अमरावती विद्यापीठातून एमबीएची पदवी प्राप्त केलेल्या आणि सध्या अमरावतीतच प्रशिक्षण घेत असणाऱ्या काझी फैझान अफरोझ अखलाक उझ झमाच्या (वय २७) मते हा अभ्यासक्रम वर्गातील शिक्षण कमी देतो आणि प्रत्यक्ष निर्णय घेण्याचे मार्गदर्शन अधिक करतो.

“प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष अनुभवाच्या माध्यमातून मी ग्राहकांशी संवाद कसा साधायचा, परिस्थितीचे व्यवस्थापन कसे करायचे आणि तत्काळ माहितीपूर्ण निर्णय कसे घ्यायचे हे शिकलो,” तो म्हणाला. “ग्राहकाचे वर्तन आणि उत्पादनातील भेद समजून घेणे यांमुळे मला संभाषण स्पष्टपणे व आत्मविश्वासाने सुरू करण्यात मदत झाली.”

मात्र या वर्षीच्या समूहातील सर्वांत लक्षणीय आहेत ते जागतिक स्तरावर शिक्षण घेतलेले विद्यार्थी. रशनीत कौर छाब्राने (२६) युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडन अर्थात यूसीएलमधून आर्किटेक्चरमधील पदव्युत्तर शिक्षण घेतले, तिचा विषय होता बायो-इंटिग्रेटेड डिझाइन. ती आता पुण्यात या अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत आहे.

हे सहसा टाकले जाणारे पाऊल नाही पण तिच्या मते हे पाऊल टाकणे आवश्यक होते.

“या अभ्यासक्रमातील वैविध्यामुळे- मग ते वैविध्य वयोगटांचे असो, पार्श्वभूमीचे असो किंवा अनुभवाचे असो, मला मानवी दृष्टीकोनातून व्यवसाय समजून घेण्यात खूपच मदत झाली,” तिने सांगितले. “भारतात रिटेल क्षेत्र नातेसंबंधांमध्ये व संस्कृतीबद्दल असलेल्या समजूतीमध्ये खोलवर रुजलेले आहे. विश्वास उभा करणे आणि ग्राहकांसोबत व्यक्तिगत नाते जोडणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे, हाच धडा घेऊन मी जागतिक बाजारपेठांत जाणार आहे.”

अनेक तरुण व्यावसायिक ज्याचा शोध घेत आहेत, ते तिच्या अनुभवातून दिसून येते: खरा आत्मविश्वास शॉपफ्लोअरवर जोपासला जातो- वर्गात बसून तो मिळत नाही. कोणत्याही पूर्वतयारीशिवाय कराव्या लागणाऱ्या संभाषणांतून तो येतो, संभाव्य आक्षेपांबाबत आधीच अंदाज बांधून तो येतो आणि आपल्या नियंत्रणाबाहेरील ताणाच्या स्थिती हाताळून तो येतो.

या समूहातील आंतरराष्ट्रीय शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांमध्ये तुषारचाही समावेश होतो. तुषारने सिडनी येथील युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नोलॉजीमधून मेकॅनिकल इंजिनीअरिंगची पदवी घेतली आहे. त्याने या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला यातूनच तरुणांचा दृष्टीकोन स्पष्ट होतो — प्रत्यक्ष घेतला जाणारा अनुभव हा करिअरला वेग देणारा घटक ठरू शकतो, ते केवळ तात्पुरत्या काळासाठी करावयाचे काम नसते.

व्यक्तीगत प्रवासांच्या पलीकडे जात ‘दोस्त सेल्स’सारखे अभ्यासक्रम भारतातील वर्तमान संकल्पनेनुसार रोजगारक्षमतेतील ढोबळ स्थित्यंतर स्पष्ट करतात. सर्व क्षेत्रांतील कंपन्या नेहमीच ‘भविष्यकाळासाठी सज्ज प्रतिभे’बाबत बोलत असल्या तरी परिस्थिती खरोखर आव्हानात्मक आहे, अनेक पदवीधर शैक्षणिकदृष्ट्या अर्हताधारक आहेत पण अतितणावपूर्ण ग्राहक परिसंस्थेत काम करणे, कामगिरीवर आधारित नोकऱ्या करणे आणि जलद गतीने तत्काळ समस्या सोडवणे यांसाठी ते पूर्णत: सज्ज नाहीत.

अशा परिस्थितीत रचनाबद्ध रिटेल कौशल्यविकास अभ्यासक्रम अधिक व्यापक सामाजिक प्रभाव साध्य करू शकतात- शिक्षणाचे रूपांतर अनुभवात आणि अनुभवाचे रूपांतर संधीत करू शकतात. अनेक तरुण भारतीयांसाठी, विशेषत: कुटुंबातील पहिल्या पिढीतील व्यावसायिकांसाठी शॉपफ्लोअर ही केवळ एक कामाची जागा नसते, तर आत्मविश्वास कमावण्याची, करिअरला आकार देण्याची तसेच महत्त्वाकांक्षा प्रत्यक्षात आणण्याची जागा असते.

“उद्योगक्षेत्रातील पहिल्याच पाच महिन्यांच्या प्रशिक्षण अभ्यासक्रमाच्या माध्यमातून रिटेल परिसंस्थेतील नोकरीसाठी सज्ज प्रतिभेची तातडीची गरज ‘दोस्त’ पूर्ण करत आहे. अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्यांच्या संख्येत यावर्षी मोठी वाढ झाली आहे, जागतिक विद्यापीठांमधून शिक्षण घेतलेले विद्यार्थी प्रवेश घेत आहेत यातूनच या अभ्यासक्रमाचे वाढते महत्त्व स्पष्ट होते. डिजिटल रूपांतरणामुळे रिटेल क्षेत्राला नवीन आकार मिळत असतानाच, दोस्त भविष्यकाळासाठी सुसज्ज कुशल मनुष्यबळाच्या बांधणीत मदत करत आहे,” असे सॅमसंग नैऋत्य आशियाच्या सीएसआर व कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स विभागाचे प्रमुख शुभम मुखर्जी म्हणाले.

भारताची संघटित रिटेल अर्थव्यवस्था वाढत असतानाच, उत्पादनाविषयीच्या ज्ञानाची सांगड ग्राहकांमध्ये विश्वास निर्माण करण्याच्या कलेसोबत घालू शकणाऱ्या व्यावसायिकांना असलेली मागणीही वाढत आहे. आणि जागतिक स्तरावर शिक्षण घेतलेले तरुण भारतीयांमध्ये अगदी तळापासून सुरुवात करणे ‘कमी दर्जाचे’ मानण्याचे प्रमाण कमी होत चालले आहे.

त्याकडे आता चतुराई म्हणून बघितले जात आहे. कारण आजच्या अर्थव्यवस्थेत उच्च हुद्दयाच्या नोकरीतून शिकण्याचा सर्वांत वेगवान मार्ग सापडेलच असे नाही.

काहीवेळा स्वत:ला सिद्ध करण्यातून, एका वेळी एक ग्राहक हाताळण्यातून हा प्रवास सुरू होतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button