भारतातील मुंबई, बेंगळुरू, अहमदाबाद, कोलकाता, दिल्ली या पाच शहरांमध्ये रोडशो आयोजित करण्यात येणार, ज्यामध्ये ४१ प्रदर्शक सहभाग घेतील आणि नवीन उत्पादन ऑफरिंग्ज पाहायला मिळतील, ज्यासह भारतातील व्यापारी सहयोगींसाठी दक्षिण आफ्रिकेमधील पर्यटन क्षेत्राच्या प्रगतीला गती मिळेल
राष्ट्रीय, ३० जानेवारी २०२६: भारतातील बाजारपेठेप्रती आपली दीर्घकालीन कटिबद्धता अधिक दृढ करत साऊथ आफ्रिकन टूरिझमने आज अॅन्युअल इंडिया मल्टी-सिटी रोडशोच्या २०२६ एडिशनची घोषणा केली. हा उपक्रम भारतातील आघाडीचे पर्यटन व्यापार प्रदर्शन आऊटबाऊंड ट्रॅव्हल मार्ट (ओटीएम) मुंबई २०२६ येथे त्याच्या सहभागासह सुरू होईल, ज्यासह उद्योगामधून अधिकाधिक सहभाग व सहयोगासाठी मंच स्थापित होईल. अधिक व्यावसायिक प्रवास मागणी आणि मित्र-नातेवाईकांच्या भेटीसाठी (व्हीएफआर) दक्षिण आफ्रिकेतून भारतात मोठ्या प्रमाणात येणारे पर्यटक, तसेच दोन्ही देशांमधील दृढ व्यावसायिक संबंध आणि लोकांमधील संबंध पाहता हा रोडशो पर्यटन भागीदारी दृढ करण्यासाठी आणि दोन्ही देशांमधील प्रवासाला चालना देण्यासाठी प्रमुख व्यासपीठ म्हणून काम करेल. साऊथ आफ्रिकन टूरिझमचा व्यापार सहभाग आणि सातत्यपूर्ण बाजारपेठ विकासावर लक्ष केंद्रित करत साऊथ आफ्रिकन टूरिझम रोडशो २०२६ मुंबईमध्ये ५ ते ७ फेब्रुवारी २०२६ पर्यंत आयोजित करण्यात येईल. यानंतर भारतातील चार इतर शहरे बेंगळुरू, अहमदाबाद, कोलकाता व दिल्ली येथे ९ ते १२ फेब्रुवारी २०२६ पर्यंत आयोजित करण्यात येईल, ज्यामुळे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामधील पर्यटन संबंध अधिक दृढ होतील.
दक्षिण आफ्रिकेसाठी प्रमुख स्रोत बाजारपेठ भारत दक्षिण आफ्रिकेमधील पर्यटन वाढ धोरणामध्ये महत्त्वपूर्ण आहे. २०२६ रोडशो भारतातील व्यापारी भागधारकांना अधिक व्यवसाय नेटवर्किंग संधी, पर्यटन स्थळांची सखोल माहिती आणि दक्षिण आफ्रिकेमधील पर्यटन उद्योगाच्या प्रमुखांसोबत प्रत्यक्ष संवाद साधण्याची संधी देईल. आपल्या २२व्या एडिशनमध्ये हा रोडशो भारतासाठी नवीन बाजारपेठ धोरण सादर करेल, पर्यटकांच्या सर्वसमावेशक पसंती, उदयोन्मुख पर्यटन विभाग आणि नवीन प्रादेशिक अनुभवांना निदर्शनास आणेल. साऊथ आफ्रिकन टूरिझमचे आशिया, ऑस्ट्रेलेशिया व मिडल ईस्टसाठी प्रादेशिक महाव्यवस्थापक श्री. गकोबनी मॅनकोटीवा या उपक्रमाचे नेतृत्व करतील. या उपक्रमाचा गेल्या वर्षांमध्ये मिळालेल्या यशस्वी गतीला अधिक वाढवण्याचा मनसुबा आहे.
भारतातील व्यापारी ग्राहकांसोबत सहयोग दृढ करत या रोडशोमध्ये दक्षिण आफ्रिकेसह ८ एसएमएमईंमधील ४१ हून अधिक प्रदर्शक सहभाग घेतील, ज्यामधून सर्वसमावेशक विकास आणि उत्पादन विविधतेवरील साऊथ आफ्रिकन टूरिझमचा सतत फोकस दिसून येईल. उल्लेखनीय बाब म्हणजे सहभागी प्रदर्शकांपैकी १७.१ प्रदर्शक नवीन उत्पादने व अनुभव सादर करतील, ज्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या पर्यटन क्षेत्रातील नवीन दृष्टिकोन आणि कमी ज्ञात असलेली पर्यटन स्थळे प्रकाशझोतात येतील.
याप्रसंगी मत व्यक्त करत श्री. मॅनकोटीवा म्हणाले, ”भारत साऊथ आफ्रिकन टूरिझमसाठी महत्त्वपूर्ण विकास स्रोत आहे. आमच्या रोडशोजसाठी मिळालेल्या प्रतिसादामधून सतत पसंतीचे पर्यटन स्थळ म्हणून दक्षिण आफ्रिकेप्रती वाढती आवड आणि विश्वास दिसून आला आहे. या रोडशोच्या माध्यमातून आमचा भारतातील व्यापारी सहयोगींना पर्यटन स्थळांबाबत अधिक माहिती, नवीन उत्पादनांबाबत माहिती आणि धोरणात्मक साधनांसह सक्षम करण्याचा मनसुबा आहे, ज्यामुळे भारतामधून पर्यटक आगमनांमध्ये वाढ होईल.”
भारत प्रमुख स्रोत बाजारपेठ असण्यासोबत दोन्ही देशांमधील दीर्घकाळापासून असलेले पर्यटन व व्यापारी संबंध अधिक प्रबळ करण्यामध्ये महत्त्वपूर्ण भागीदार देखील आहे. पर्यटनाबाबत उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्याला प्राधान्य दिले जात आहे. इलेक्ट्रॉनिक ट्रॅव्हल ऑथोरायझेशन (ईटीए) सिस्टम आणि ट्रस्टेड टूर ऑपरेटर स्किम (टीटीओएस) यांसारखे उपक्रम भारतातील पर्यटकांसाठी व्हिसा प्रक्रिया सुलभ व गतीशील करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. विमान कनेक्टिव्हिटी सुधारण्याबाबत, तसेच भारत आणि दक्षिण आफ्रिका दरम्यान थेट विमान सेवा सुरू करण्याच्या शक्यतेवर देखील चर्चा सुरू आहे.
२०२६ कडे वाटचाल करत साऊथ आफ्रिकन टूरिझम पर्यटक विभागांना प्राधान्य देण्यावर लक्ष केंद्रित करेल, ज्यामध्ये साहसप्रेमी, लक्झरी पर्यटक, कुटुंबासोबत सुट्टीचा आनंद घेणारे आणि माइस विभागाचा समावेश आहे. भारताचे आऊटबाऊंड ट्रॅव्हल प्रोफाइल सतत बदलत आहे प्रामुख्याने ३१ ते ५० वर्षे वयोगटातील कामकरी प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ दिसून येत आहे. हे प्रवासी आता फक्त फिरण्यापेक्षा उत्तम व संस्मरणीय अनुभव देणाऱ्या पर्यटनाला अधिक पसंती देत आहेत. माइस आणि व्यावसायिक प्रवास हे विभाग धोरणात्मकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे आहेत, जेथे भारतातून येणाऱ्या एकूण पर्यटकांच्या संख्येत त्यांचा मोठा वाटा आहे, यामधून विश्रांतीसाठी आणि व्यवसायासाठी उत्तम पर्यटन स्थळ म्हणून दक्षिण आफ्रिकेची लक्षवेधकता दिसून येते.
प्रवासामध्ये उत्तम सोयीसुविधा, व्यापारी सहभाग आणि पर्यटन स्थळांबाबत सविस्तर माहिती याबाबत स्थिर प्रयत्न, तसेच दक्षिण आफ्रिकेमध्ये २०२७ एकदिवसीय विश्वचषकाचे आयोजन यांसारख्या जागतिक उपक्रमांच्या पाठबळासह दक्षिण आफ्रिका आपल्या वैविध्यपूर्ण पर्यटन ऑफरिंग्ज दाखवण्यासाठी आणि भारतासह जगभरातील बाजारपेठांमधील पर्यटकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी उत्तमरित्या सज्ज आहे. सातत्यपूर्ण व्यापारी सहभाग, ग्राहकांपर्यंत पोहोच आणि नाविन्यपूर्ण विपणन उपक्रमांच्या माध्यमातून साऊथ आफ्रिकन टूरिझम आपली उपस्थिती वाढवत आहे, तसेच भारतातील दीर्घकालीन उपस्थिती अधिक दृढ करत आहे.