मेटाने आय४सी आणि सेबीसोबत सहयोगाने अॅण्‍टी-स्‍कॅम मोहिम सुरू केली

News Service
  • कंपनीने सुरू केलेली अॅण्‍टी-स्‍कॅम मोहिम आता तिसऱ्या एडिशनमध्‍ये आहे, जेथे मोहिमेच्‍या जाहिरातीमध्‍ये नीना गुप्‍ता आहेत.
  • ही माहितीपूर्ण मोहिम विविध उपक्रमांच्‍या माध्‍यमातून वर्षभर राबवण्‍यात येणार आहे, तसेच प्रादेशिक क्रिएटर्ससोबत सहयोग करत व्‍यक्‍तींना ऑनलान घोटाळ्यांना प्रतिबंध करण्‍यास सक्षम करण्‍यात येईल.

नवी दिल्‍ली, मेटाने आज आपली अॅण्‍टी-स्‍कॅम मोहिम ‘स्‍कॅम से बचो’ सुरू केली. या नवीन डिजिटल जागरूकता मोहिमेमुळे लोकांना सामान्‍य ऑनलाइन घोटाळे ओळखण्‍यास, त्‍याबाबत प्रश्‍न विचारण्‍यास आणि तक्रार करण्‍यास मदत होईल. इंडियन सायबर क्राइन कोऑर्डिनेशन सेंटर (आय४सी) आणि सिक्‍युरिटीज अँड एक्‍स्‍चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) यांच्‍यासोबत सहयोगाने राबवण्‍यात येणाऱ्या या उपक्रमामध्‍ये प्रख्‍यात अभिनेत्री नीना गुप्‍ता आणि आघाडीचे डिजिटल क्रिएटर्स सामील झाले आहेत. या मोहिमेचा सतर्कता वाढवण्‍याचा आणि सुरक्षित ऑनलाइन पद्धतींना चालना देण्‍याचा मनसुबा आहे.

जाहिरात येथे पहा: https://www.facebook.com/share/v/17qUgqVsVP/?mibextid=wwXIfr

तिसऱ्या एडिशनमध्‍ये असलेल्‍या मेटाच्‍या प्रमुख अॅण्‍टी-स्‍कॅम मोहिमेमधून डिजिटल फसवणूका व घोटाळ्यांना प्रतिबंध करण्‍याप्रती मेटाची कटिबद्धता आणि सातत्‍यपूर्ण प्रयत्‍न दिसून येतात. या मोहिमेच्‍या माध्‍यमातून काही प्रचलित घोटाळ्यांच्‍या प्रकारांना प्रकाशझोतात आणण्‍यात येणार आहे, जसे आगाऊ शुल्काची मागणी करणाऱ्या खोट्या नोकरीच्या आऑऑफर, सरकारी किंवा कायदे अंमलबजावणी अधिकाऱ्यांचे सोंग घेऊन केले जाणारे डिजिटल अरेस्ट स्कॅम्स, आणि खात्रीशीर किंवा एका रात्रीत मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवणाऱ्या फसव्या गुंतवणूक योजना. या मोहिमेची जाहिरात हलक्‍या-फुलक्‍या, पण सावध करणाऱ्या स्‍वरूपात तयार करण्‍यात आली आहे, यामध्‍ये विनोदी क्षण व परिचित संदर्भाचा वापर करण्‍यात आला आहे, ज्‍यामधून संधी, अधिकार किंवा तत्परता दाखवत केले जाणारे घोटाळे निदर्शनास आणण्‍यात आले आहेत.
नीना गुप्‍ता यांच्‍यासह लोकप्रिय क्रिएटर्स सुकृती चतुर्वेदी, युवराज दुआ आणि श्रेयस मेंदिरत्ता असलेल्‍या या जाहिरातीमध्‍ये वास्‍तविक जीवनातील प्रसंग आणि दैनंदिन संवादांना दाखवण्‍यात आले आहे, ज्‍यामधून अनेक ऑनवलाइन घोटाळेबाज खोटी तत्‍परता, अधिकार किंवा विश्वास दाखवत करणाऱ्या ऑनलाइन घोटाळ्यांना निदर्शनास आणण्‍यात आले आहे. ही मोहिम व्‍यक्‍तींना स्‍वत:च्‍या व इतरांच्‍या संरक्षणासाठी कोणतीही कृती करण्‍यापूर्वी प्रश्‍न विचारण्‍याचे, उपलब्‍ध सुरक्षितता साधनांचा वापर करण्‍याचे आणि यंत्रणांकडे झालेल्‍या फसवणूकीची तक्रार करण्‍याचे आवाहन करते.

मेटासोबत सहयोगाने घोटाळ्यांबाबत जागरूकतेला चालना देण्‍याची गरज व्‍यक्‍त करत सिक्‍युरिटीज अँड एक्‍स्‍चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी)चे अध्‍यक्ष श्री. तुहिन कांता पांडे म्‍हणाले, ”मोठ्या प्रमाणात डिजिटल प्‍लॅटफॉर्म्‍सचा वापर करत आर्थिक घोटाळे करण्‍याच्‍या प्रमाणात वाढ झाली आहे, जेथे कायदेशीर खोटे दावे आणि मोठ्या प्रमाणात परतावा देण्‍याचे खोटे आश्वासन देत लोकांची दिशाभूल केली जात आहे. नागरिकांनी याबाबतीत सतर्क राहिले पाहिजे आणि आर्थिक गुंतवणूकीबाबत कोणताही निर्णय घेण्‍यापूर्वी सेबी-नोंदणीकृत कंपन्‍यांशी संपर्क साधला जात असल्‍याची खात्री घेतली पाहिजे. मेटाची अॅण्‍टी-स्‍कॅम मोहिम आर्थिक फसवणूकीच्‍या वाढत्‍या प्रमाणादरम्‍यान लोकांमध्‍ये जागरूकतेचा अधिकाधिक प्रसार करण्‍यासाठी महत्त्वाची आहे. यासारखे जनजागृती करणारे उपक्रम अशा फसवणूकांचा प्रभाव कमी करण्‍यासाठी आणि गुंतवणूकदारांचे हित व लोकांनी मेहनतीने कमावलेल्‍या पैशाचे संरक्षण करण्‍यासाठी महत्त्वाचे आहेत.

या मोहिमेसोबत सहयोगाबाबत मत व्‍यक्‍त करत अभिनेत्री नीना गुप्‍ता म्‍हणाल्‍या, ”आजचे स्‍कॅम्‍स धोकादायक वाटत नाहीत, तर अनुकूल, तातडीचे व पटणारे वाटतात. मला मेटाच्‍या अॅण्‍टी-स्‍कॅम उपक्रमाला पाठिंबा देण्‍याचा अभिमान वाटतो, कारण ऑनलाइन घोटाळ्यांपासून स्‍वत:चे व प्रियजनांचे संरक्षण करण्‍यासाठी जागरूकता हे पहिले व प्राधान्‍य पाऊल आहे. ही माहितीपूर्ण जाहिरात व्‍यक्‍तींना कोणतीही कृती करण्‍यापूर्वी थांबून विचार करण्‍याची, प्रश्‍न विचारण्‍याची आणि सत्‍यापन करण्‍याची आठवण करून देते, तसेच मेटाच्‍या सेफ्टी टूल्‍सचा वापर करण्‍याची आठवण करू देते, जे तुम्‍हाला तुमच्‍या सुरक्षिततेवर नियंत्रण ठेवण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहेत. मी आशा करते की हा संदेश भारतातील लाखो व्‍यक्‍तींपर्यंत पोहोचेल, तसेच लोकांना संशयास्‍पद स्थितींचा सामना करताना अधिक आत्‍मविश्वास व सुसज्‍ज असल्‍याचे वाटण्‍यास मदत होईल.

स्‍कॅम से बचो मोहिमेच्‍या नवीन एडिशनच्‍या माध्‍यमातून मेटा डिजिटल सुरक्षिततेबाबत माहिती सहजसाध्य, सर्वसमावेशक व कृतीशील करण्‍यासाठी क्रिएटर्स आणि सरकारी भागधारकांसोबत सक्रियपणे सहयोग करत आहे. या मोहिमेमधून घोटाळ्यांबाबत तक्रार करण्‍याच्‍या महत्त्वाला देखील सादर करण्‍यात आले आहे, तसेच वापरकर्त्‍यांना फसवणूक झाल्‍यास राष्‍ट्रीय सायबरक्राइम हेल्‍पलाइन १९३० वर संपर्क साधण्‍याचे आवाहन करण्‍यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button