पनापक्कम, रानीपेट, तामिळनाडू, ९ फेब्रुवारी २०२६: टाटा मोटर्स पॅसेंजर वेईकल लिमिटेड (टीएमपीव्ही) ही भारतातील आघाडीची कार्स व एसयूव्हींची उत्पादक आणि तिची उपकंपनी जग्वार लँड रोव्हर ऑटोमोटिव्ह पीएलसी. (जेएलआर) यांनी आज तामिळनाडूमधील रानीपेट जिल्ह्यातील पनापक्कम येथे त्यांच्या नवीन उत्पादन प्लांटच्या कार्यसंचालनाची घोषणा केली. या विद्यमान सुविधेमधून नेक्स्ट-जनरेशन वेईकल्सचे उत्पादन करण्यासाठी ग्रीनफिल्ड प्लांटच्या विकासाचा पहिला टप्पा दिसून येतो. या वेईकल्समध्ये टीएमपीव्ही व जेएलआर या दोन्ही ब्रँड्सच्या ईव्हींचा देखील समावेश आहे. प्लांटमधून लॉंच करण्यात येणारी पहिली वेईकल जेएलआरची स्थानिक पातळीवर उत्पादित करण्यात आलेली रेंज रोव्हर इवोक आहे. हे मॉडेल आधुनिक लक्झरी आणि अपवादात्मक कारागिरीसाठी जागतिक स्तरावर प्रसिद्ध आहे.

तामिळनाडूचे माननीय मुख्यमंत्री थिरू एम.के. स्टॅलिन आणि टाटा सन्स व टाटा मोटर्स पॅसेंजर्स वेईकल्सचे अध्यक्ष श्री. एन. चंद्रशेखरन यांच्या हस्ते या प्लांटचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रतिष्ठित मंत्री, लोकप्रतिनिधी, वरिष्ठ सनद अधिकारी, शासकीय अधिकारी आणि टीएमपीव्ही, जेएलआर व टाटा ग्रुपमधील वरिष्ठ प्रमुख हे देखील उपस्थित होते.
टाटा मोटर्स पॅसेंजर वेईकल्स – जेएलआर प्लांटचे उद्घाटन करत तामिळनाडूचे माननीय मुख्यमंत्री थिरू एम.के. स्टॅलिन म्हणाले, ”टाटा ग्रुपने राष्ट्रनिर्मितीमध्ये दीर्घकाळापासून महत्त्वाची भूमिका बजावली आहे आणि तामिळनाडूसोबत सखोल, ऐतिहासिक सहयोग आहे. या नवीन उत्पादन प्लांटमध्ये कार्यसंचालनाची सुरूवात आणि रानीपेटमधील पनापक्कम येथे पहिल्या रेंज रोव्हर इवोकच्या लाँचसह राज्याला जागतिक दर्जाच्या ऑटोमोटिव्ह उत्पादनाचा विस्तार होताना पाहण्याचा अभिमान वाटतो. तामिळनाडू सरकार या महत्त्वपूर्ण टप्प्याचे स्वागत करते आणि उद्योगांना पाठिंबा देत राहिल. या प्लांटच्या उद्घाटनासह रोजगार निर्माण होतील, नाविन्यतेला चालना मिळेल आणि उत्पादन व गतीशीलतेसाठी भारतातील आघाडीचे केंद्र म्हणून आमच्या राज्याचे स्थान अधिक दृढ होईल.”
याप्रसंगी मत व्यक्त करत टाटा सन्स व टाटा मोटर्स पॅसेंजर्स वेईकल्स लि.चे अध्यक्ष श्री. एन. चंद्रशेखरन म्हणाले, ”पनापक्कम येथे आमच्या प्व्लांटचे उद्धाटन शाश्वत व भविष्याकरिता सुसज्ज उत्पादनामध्ये भारताच्या नेतृत्वाला गती देण्याप्रती टाटा ग्रुपच्या प्रवासामधील महत्त्वपूर्ण टप्पा आहे. आम्हाला तामिळनाडूसोबत आमचा दीर्घकालीन सहयोग अधिक दृढ करण्याचा देखील अभिमान वाटतो. हे राज्य औद्योगिक उत्कृष्टता, नाविन्यता आणि सर्वसमावेशक विकासाला चालना देत आहे. या नवीन प्लांटसह आम्ही भारतातील व जगभरातील ग्राहकांसाठी अपवादात्मक दर्जा, कारागिरी व तंत्रज्ञान असलेल्या वेईकल्स उत्पादन करण्यास उत्सुक आहोत.”
पनापक्कम प्लांट बाबत
टीएमपीव्हीच्या पनापक्कम प्लांटमध्ये प्रगत उत्पादन तंत्रज्ञान आणि कुशल कर्मचारीवर्ग यांचे उत्तम संयोजन आहे, ज्यामधून जागतिक दर्जाचे वेईकल्स उत्पादित होण्यास वितरित होण्याची खात्री मिळते.
तामिळनाडूमधील शॉपफ्लोअर टेक्निशियन्सची वैविध्यपूर्ण टीम या प्लांटचे कार्यसंचालन पाहते, जे टाटा मोटर्सच्या लक्ष्य उपक्रमामध्ये देखील सामील आहेत. लक्ष्य हा ‘शिकण्यासह कमवा’ उपक्रम आहे, जो शॉपफ्लोअरवरील प्रतिभावान कर्मचाऱ्यांना इंजीनिअरिंग व व्यवस्थापन पदांपर्यंत प्रगती करण्यास मदत करतो. राज्यभरात पॉलिटेक्निक पदवीधरांच्या प्रखर मूल्यांकनामधून निवडण्यात आलेल्या या टीमधील टेक्निशियन्सनी जेएलआर सुविधांमध्ये पाच महिन्यांचे प्रखर, प्रत्यक्ष प्रशिक्षण पूर्ण केले आहे, तसेच त्यांना जागतिक दर्जाचे कार्यसंचालन व टेक्निकल निपुणतेसह सुसज्ज करण्यात आले आहे.
काम करण्यासोबत प्रतिष्ठित युनिव्हर्सिटीमधून कंपनी-प्रायोजित बी.टेक पदवी मिळवण्याच्या संधीसह ते स्वत:चे वैयक्तिक प्रगती करण्यासोबत व्यावसायिक निपुणता मिळवू शकतात, तसेच स्वत:च्या कुटुंबाची काळजी देखील घेऊ शकतात. त्यांच्या प्रवासामधून निदर्शनास येते की, केंद्रित कौशल्य व स्थानिक टॅलेंट विकास प्रगत उत्पादनाला चालना देऊ शकते आणि दीर्घकालीन आर्थिक व सामाजिक प्रभाव घडवून आणू शकतात.
कार्यसंचालनांना सुरूवात झाली असताना टप्प्याटप्प्याने वेईकल उत्पादनामध्ये वाढ करण्यात येईल, ज्यासह पुढील ५ ते ७ वर्षांमध्ये प्लांटची वार्षिक उत्पादन क्षमता २५०,००० वेईकपर्यंत पोहोचेल. यामुळे भारतातील व आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमधील गरजांची पूर्तता होईल.
एकूण, टीएमपीव्हीचा विकासाबाबत आपल्या दीर्घकालीन महत्त्वाकांक्षांना पाठिंबा देण्यासाठी या उत्पादन प्लांटला अत्याधुनिक करण्यामध्ये जवळपास ९,००० कोटी रूपयांची गुंतवणूक करण्याचा मनसुबा आहे. या प्लांटमध्ये ५,००० हून अधिक प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार संधी निर्माण करण्याची क्षमता आहे, तसेच कौशल्य वाढीला चालना देईल आणि प्रबळ सहाय्यक परिसंस्थेच्या विकासाला साह्य करेल.
पनापक्कम प्लांट टीएमपीव्हीच्या शाश्वतता-केंद्रित तत्त्वाला देखील दृढ करते, जेथे प्लांटमध्ये प्रत्येक टप्प्यावर पर्यावरणपूरक जागरूक कार्यसंचालनाचा समावेश आहे. हा प्लांट पूर्णपणे अक्षय ऊर्जेवर कार्यरत असण्यासाठी, वॉटर पॉझिटिव्ह असण्यासाठी आणि ऑटोमोटिव्ह क्षेत्रात हरित उत्पादनाकरिता नवीन मानक स्थापित करण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे. उच्च दर्जाच्या शाश्वत पद्धतींसह डिझाइन करण्यात आलेला हा प्लांट कार्यक्षमतेला प्राधान्य देतो, उत्सर्जन कमी करतो आणि जागतिक पर्यावरणीय मापदंडांचे काटेकोरपणे पालन करतो.